SSC 10th Result 2024 Website Link: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे या आठवड्याच्या सुरुवातीलाच इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला. त्यापाठोपाठ आता दहावीच्या निकालाची उत्सुकता सुद्धा वाढली आहे. बारावीच्या निकालानंतर साधारण ८- १० दिवसांमध्ये दरवर्षी दहावीचा सुद्धा निकाल जाहीर केला जातो. विद्यार्थी व पालकांची उत्सुकता पाहता सोशल मीडियावर तारखांबाबत खोटी माहिती देणाऱ्या अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. यासंदर्भात काही दिवसांपूर्वी बोर्डाने एक अधिसूचना जारी करत १० वी व १२ वी च्या निकालांच्या तारखा mahahsscboard.in वर जाहीर केल्या जातील असे स्पष्ट केले होते. निकालाची तारीख ही मूळ निकालाच्या एक दिवस आधी जाहीर होईल. सकाळी साधारण ११ वाजता निकालाच्या बाबतची एकूण आकडेवारी बोर्डाचे अधिकारी पत्रकार परिषदेत सांगतील तर १ वाजल्यापासून विद्यार्थी आपले गुणपत्रक पाहू शकतील. आता हा निकाल जेव्हा येईल तेव्हा पाहायचा, कुठे व कसा हे जाणून घेऊया..
१० वीच्या निकालाच्या तारखेबाबत मोठी माहिती; महाराष्ट्र बोर्डाचं निकालाचं नियोजन कसं आहे? कुठे व कधी पाहाल, दहावीचे मार्क्स?
सकाळी साधारण ११ वाजता निकालाच्या बाबतची एकूण आकडेवारी बोर्डाचे अधिकारी पत्रकार परिषदेत सांगतील तर १ वाजल्यापासून विद्यार्थी आपले गुणपत्रक पाहू शकतील. आता हा निकाल जेव्हा येईल तेव्हा पाहायचा, कुठे व कसा हे जाणून घेऊया..
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 23-05-2024 at 11:23 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big update on ssc results date maharashtra board 10th marksheet will be available on mahresult nicin how to download 10th std marksheet svs