Bikaji foods owner Shivratan Agarwal: कष्ट, अखंड मेहनत व सातत्याने शून्यातून आपण विश्व निर्माण करू शकतो, असं म्हणतात. एका लहानशा गोष्टीपासून मोठा व्यवसाय उभारण्यासाठी परिश्रम, जिद्द आणि कुटुंबाची साथ असावी लागते. आज आपण अशाच एका हरहुन्नरी व्यक्तीच्या यशाची कहाणी जाणून घेणार आहोत, ज्याने आजोबांच्या एका छोट्याशा दुकानाचं एका मोठ्या ब्रॅंडमध्ये रुपांतर केलं.

हल्दीरामची सुरूवात

बिकानेरी भुजियाची कहाणी १९३७ मध्ये सुरू झाली, जेव्हा मारवाडी कुटुंबातील भिकाराम चांदमल यांनी बिकानेरमध्ये चहा आणि स्नॅक्सचे एक छोटेसे दुकान उघडले. त्यांचा नातू गंगा बिशन अग्रवाल, ज्यांना घरी लाडात हल्दीराम म्हटले जायचे, ते त्यांच्याबरोबर दुकानात जायचे. कालांतराने त्या दुकानाचे नाव “हल्दीराम” ठेवण्यात आले.

Ratan Tata Passed Away Ratan Tata Death Harsha goenka Sundar Pichai Tribute tweet
Ratan Tata Death: “घड्याळाची टिकटीक थांबली…” हर्ष गोयंका यांची मन हेलावणारी पोस्ट; पिचाई म्हणाले, ‘भारताला…’
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Nirmit Parekh startup
Success Story : ॲपलमधील नोकरी सोडून सुरू केला स्वतःचा व्यवसाय; मेहनतीच्या जोरावर उभी केली ९००० करोडची कंपनी
Success Story Of Uthaya Kumar In Marathi
Success Story : इस्रोचा ड्रीम जॉब सोडून सुरू केला टॅक्सीचा व्यवसाय; वाचा यशस्वी उद्योजक उथया कुमार यांचा प्रवास
Ashwin Desai Success Story
Success Story: स्वप्नांपुढे सारे फिके! एका लहान खोलीत राहण्यापासून ते करोडोंची कंपनी उभारण्यापर्यंतचा यशस्वी प्रवास
Success story of Ankurjeet Singh who lost his eyesight still passed IIT and upsc became IAS officer
लहानपणीच गमावली दृष्टी पण हार मानली नाही, आधी IIT मग UPSC उत्तीर्ण होऊन झाले IAS; वाचा अंकुरजीत सिंग यांचा प्रेरणादायी प्रवास
Success Story of Raj Navani
success story : बाबांकडून प्रेरणा तर पाच लाखांचं कर्ज, ‘सॉरी मॅडम’ नावाने दुकान उघडून आज कोटींची करतायत उलाढाल; वाचा राज यांचा प्रवास
Success Story Of Ajay Tewari
Success Story : मर्चंट नेव्ही ऑफिसर ते उद्योजक; वाचा आयटी व्यवसायातील सल्ले देणाऱ्या अजय तिवारी यांची गोष्ट

हेही वाचा… रतन टाटांच्या एका भेटीने आयुष्य बदललं; परदेशातून परतलेल्या जोडप्यानं मायदेशी कसा उभारला कोटींचा बिझनेस, वाचा

हल्दीराम यांचे वयाच्या ११ व्या वर्षापासून स्वतःची कंपनी सुरू करण्याचे स्वप्न होते. त्यांचे हे स्वप्न अखेरीस पूर्ण झाले आणि ‘हल्दीराम’ हा एक प्रसिद्ध ब्रँड बनला. भिकाराम यांचा मुलगा मूलचंद अग्रवाल यांना चार मुले होते. त्यांची बहीण सरस्वती यांच्यासोबत मिळून त्यांनी कौटुंबिक व्यवसायाचा विस्तार केला.

हेही वाचा… अवघ्या २७व्या वर्षीच अब्जाधीश, ३ महिन्यातच उभारली कोटींची कंपनी, वाचा कोण आहे ‘हा’ भारतीय उद्योगपती?

शिवरतन अग्रवाल यांचं स्वप्न साकार (Bikaji owner Shivratan Agarwal)

तथापि, कौटुंबिक व्यवसायाची विभागणी झाल्यानंतर, मूलचंद यांचा मुलगा शिवरतन अग्रवाल यांनी भुजियामध्ये विशेष प्राविण्य मिळवून बिकानेरमध्ये “शिवदीप फूड प्रॉडक्ट्स” सुरू केले; यामुळे बिकानेरी भुजिया ब्रँड, बिकाजीच्या निर्मितीची पायाभरणी झाली, जी आता भारतातील आघाडीच्या स्नॅक कंपन्यांपैकी एक आहे.

Photo Courtesy- bikaji

फक्त आठवीपर्यंत शिकलेल्या शिवरतन अग्रवाल यांनी भुजियाच्या उत्पादनात क्रांती घडवून आणली. आधी जे स्नॅक हाताने बनवावे लागत होते त्याचे परिश्रम वाचले, कारण त्यांनी स्नॅक बनवण्याची मशीन आणली. त्यांच्या या शोधामुळे बिकाजीचा जागतिक स्तरावर विस्तार झाला.

हेही वाचा… परिस्थिती नव्हती पण जिद्द होती, शून्यातून कसं निर्माण केलं कोटींचं साम्राज्य? जाणून घ्या वेलुमणी यांचा प्रेरणादायी प्रवास

आज बिकाजी फूड्स २५० हून अधिक उत्पादने ऑफर करते, जी ३० पेक्षा जास्त देशांमध्ये विकली जातात. बिकानेरी भुजिया विशेषतः आखाती देशांमध्ये लोकप्रिय आहे आणि अमेरिका, जर्मनी, स्पेन, फ्रान्स आणि इतर अनेक राष्ट्रांमध्ये निर्यात केली जाते. जगभरात आपला ब्रॅंड पोहोचवणाऱ्या शिवरतन अग्रवाल यांचा हा प्रवास नक्कीच अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल.