Mumbai Mahanagar Palika Bharti 2023: मुंबई महानगरपालिकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. महापालिकने कार्यकारी सहाय्यक (लिपिक) पदाच्या जागा भरण्यासाठी (लिपिक) भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. मुंबई महानगरपालिका भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ सप्टेंबर २०२३ ही आहे. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा,पगार आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
मुंबई महानगरपालिका भरती २०२३
पदाचे नाव – कार्यकारी सहाय्यक (लिपिक)
एकूण पदसंख्या – ३
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य कला किंवा समकक्ष शाखेचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान ४५% गुणांसह उत्तीर्ण असावा
नोकरी ठिकाण – मुंबई</strong>
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – राजावाडी रुग्णालय, घाटकोपर (पूर्व)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ सप्टेंबर २०२३
निवड प्रक्रिया – मुलाखती
मुलाखतीची तारीख – २६ सप्टेंबर २०२३
अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in
असा करा अर्ज –
- या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- दिलेल्या तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
भरती संबिधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1Nl6lpaZz7xgeWbaploUa4NJF06T8xYtg/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.