BMC Bharti 2024: बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे लोकमान्य टिळक महानगरपालिका सामान्य रुग्णालय आणि लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय, सायन मुंबई काही रिक्त पदांची भरती होणार आहे. या भरती मोहिमेंर्गत वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, सपोर्ट स्टाफ, स्तनपान पर्यवेक्षक सह प्रशिक्षक” या पदांसाठी भरती केली जाईल. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पदे भरण्यासाठी एकूण०५ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई आहे. ही पदे पूर्ण कंत्राटी पद्धतीने असतील. या पदाच्या भरतीसाठी मुलाखत घेण्यात येईल. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या नमूद पत्त्यावर त्यांचे अर्ज पाठवू शकतात. अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०२४ आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

BMC Vacancy 2024 : पदाचा तपशील
पदाचे नाव – पद संख्या
वैद्यकीय अधिकारी – ०१
स्टाफ नर्स – ०२
सहाय्यक कर्मचारी – ०१
स्तनपान पर्यवेक्षक सह प्रशिक्षक – ०१

हेही वाचा – RBI Recruitment 2024: बँकेत अधिकारी होण्याची संधी; ‘ही’ कागदपत्रे ठेवा जवळ; अर्ज करताना फक्त ‘या’ स्टेप्स करा फॉलो 

Educational Qualification For BMC Notification 2024 : शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव – शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी- एमबीबीएस डिग्री
स्टाफ नर्स – जीएनएम/ बेसिक बीएससी नर्सिंग / एमएसएसी नर्सिंग
सहाय्यक कर्मचारी- दहावी पास
स्तनपान पर्यवेक्षक सह प्रशिक्षक – कोणत्याही शाखेतून पदवीधर, बीएसएसी होम सायन्स अँड न्युट्रिशन, बीएससी नर्सिंग,

हेही वाचा – RRC WCR Apprentice 2024 : रेल्वेमध्ये नोकरीची संधी! ३३१७ अप्रेंटीस पदांवर होणार भरती, जाणून घ्या कसा करावा अर्ज

Salary Details For BMC Recruitment 2024 – पगार
पदाचे नाव- वेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारी- ६०,०००/‐ दर महिना
स्टाफ नर्स- २००००/- दर महिना
सहाय्यक कर्मचारी – १५५००/‐ दर महिना
स्तनपान पर्यवेक्षक सह प्रशिक्षक ४०,००० /‐ दर महिना

अर्ज पाठविण्याचा पत्ता – डीन, लोकमान्य टिळक महानगरपालिका सामान्य रुग्णालय आणि लोकमान्य टिळक नगरपालिका मेडिकल कॉलेज, सायन, मुंबई</p>

अधिकृत वेबसाईट – https://www.mcgm.gov.in/

अधिसुचना – https://www.mcgm.gov.in/irj/go/km/docs/documents/MCGM%20Department%20List/Chief%20Personnel%20Officer/Recruitment%20Notice/CLMC%20%26%20NRC%20Advertisement%20%26%20Application%20form.pdf

BMC Recruitment 2024 – ऑफलाइन अर्ज कसा पाठवावा? (How To Apply)

अर्ज सादर करण्याच्या सूचना:

१.अधिकृत वेबसाइटवरून अर्ज मिळवा.
२, सर्व आवश्यक माहिती देऊन अर्ज पूर्णपणे भरा.
३ दिलेल्या पत्त्यावर अर्ज सबमिट करा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – डीन, लोकमान्य टिळक महानगरपालिका सामान्य रुग्णालय आणि लोकमान्य टिळक नगरपालिका मेडिकल कॉलेज, सायन, मुंबई

टीप:

  • अपूर्ण अर्ज फेटाळले जातील.

तुमचा अर्ज विचारात घेतला जाईल याची खात्री करण्यासाठी कृपया सूचनांचे काळजीपूर्वक पालन करा.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc bharti 2024 recruitment for various posts by mumbai municipal corporation 60000 per month can be earned know how to apply snk