BMC Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सध्या ‘अनुज्ञापन निरीक्षक’ म्हणजेच लायसन्स इन्स्पेक्टर [License Inspector] या पदावर मोठ्या संख्येने भरती होणार आहे. या भरतीसाठी किती जागा उपलब्ध आहेत, तसेच नोकरीचे ठिकाण कुठे असेल याबद्दलची माहिती पाहा. नोकरीसाठी अर्ज कसा करायचा आणि अर्जाची अंतिम तारीख व शैक्षणिक पात्रता यांबद्दल जाणून घ्या.
BMC Recruitment 2024 : पद आणि पदसंख्या
अनुज्ञापन निरीक्षक या पदासाठी एकूण ११८ रिक्त पदांवर भरती होणार आहे.
BMC Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता
अनुज्ञापन निरीक्षक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची परीक्षा उत्तीर्ण असलेली पदवी असणे आवश्यक आहे.
BMC Recruitment 2024 : नोकरीचे ठिकाण व वयोमर्यादा
अनुज्ञापन निरीक्षक या पदासाठी नोकरीचा अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी ४३ वर्षे अशी वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.
तसेच या पदावर निवड झाल्यास नोकरीचे ठिकाण हे मुंबई शहर असेल.
BMC Recruitment 2024 – बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकृत वेबसाइट
https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous
BMC Recruitment 2024 – अधिसूचना –
https://portal.mcgm.gov.in/irj/go/km/docs/documents/MCGM%20Department%20List/Chief%20Personnel%20Officer/Recruitment%20Notice/recruitment%20of%20inspector.pdf
BMC Recruitment 2024 : वेतन
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अनुज्ञापन निरीक्षक या पदावर भरती झालेल्या उमेदवारास २९,२०० – ९२,३०० रुपये इतके वेतन देण्यात येईल.
BMC Recruitment 2024 : अर्ज आणि अर्ज शुल्क
वर नमूद केलेल्या पदावर उमेदवारास अर्ज करावयचा असल्यास तो ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
मात्र, ऑनलाइन अर्ज २० एप्रिल २०२४ पासून स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे. अर्जाची अंतिम तारीख ही १७ मे २०२४ अशी आहे याची नोंद घ्यावी.
अर्जाचे शुल्क किती असेल ते जाणून घ्या.
जे उमेदवार ओपन किंवा खुल्या वर्गाचे आहेत त्यांच्यासाठी सर्व करांसहित १,०००/- रुपये इतके अर्ज शुल्क असेल. जे उमेदवार मागास वर्गातून अर्ज करणार आहेत त्यांच्यासाठी सर्व करांसहित ९००/- रुपये इतके अर्ज शुल्क असेल.
अनुज्ञापन निरीक्षक पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी सर्व माहिती वाचून अर्ज भरावा.
नोकरीसंदर्भात उमेदवारास अधिक माहिती हवी असल्यास बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. अथवा नोकरीची अधिसूचना वाचावी. वेबसाइट, तसेच अधिसूचना वर नमूद केलेली आहे.