MCGM BMC Bharti 2024 : मुंबई महापालिकेत नोकरी करु इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे, ती म्हणजे मुंबई महानगपालिकेने रिक्त पदांवर भरती प्रक्रिया राबवण्याचे जाहीर केले आहे. मुंबई महानगरपालिका ‘करनिर्धारण आणि संकलन’ विभागातील गट क मधील ‘विभाग निरीक्षक’ संवर्गातील रिक्त पदे भरण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन अर्ज पाठवू शकतात. अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख १९ ऑक्टोबर २०२४ आहे. केवळ ऑनलाईन पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जातील. पण या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी भरती प्रक्रियेसंबंधीत अधिकृत जाहिरात वाचावी, त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करावा.

BMC Vacancy 2024 : पदाचा तपशील आणि संख्या

पदाचे नाव – विभाग निरीक्षक (Ward Inspector)

Best time for Job Hunting
Best time for Job Hunting : कोणत्या महिन्यांमध्ये नोकरी शोधावी? जाणून घ्या, नोकरी शोधण्याची सर्वोत्तम वेळ
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
IDBI Bank SO Recruitment 2024
आयडीबीआय बँकेत नोकरीची संधी; महिन्याला पगार एक लाखांपेक्षा जास्त, जाणून घ्या कसा करायचा अर्ज
Aadhaar Card Update Deadline is 14 September 2024
Aadhaar Card Update : १४ सप्टेंबरपर्यंत आधारकार्ड अपडेट करा नाहीतर भरावा लागेल इतका दंड; जाणून घ्या ,आधार कार्ड ऑनलाईन कसे अपडेट करावे?
RRB NTPC Recruitment 2024 notification soon know about Eligibility, how to apply and more
RRB NTPC Recruitment 2024: रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी! पुढील महिन्यात मोठी भरती; जाणून घ्या किती रिक्त जागा भरणार
pimpri pradhan mantri awas yojana marathi news
डुडुळगावातील पंतप्रधान आवास योजनेच्या ११९० सदनिकांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; कोणाला आणि कधीपर्यंत करता येणार अर्ज?
panvel municipal corporation,
हरकतींसाठी महिन्याची मुदत द्या, पनवेल प्रारूप आराखड्याबाबत शेकापची महापालिकेकडे मागणी
Mumbai latest marathi news
विश्लेषण: गर्भश्रीमंत मुंबई महापालिकेवर मुदतठेवी मोडण्याची वेळ का येते?

पद संख्या१७८

शैक्षणिक पात्रता (BMC Recruitment 2024 Education Qualification)

उमेदवार कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. उमेदवाराकडे मराठी आणि इंग्रजी टंकलेखनाचे प्रत्येकी ३० शब्द मिनिट वेगाचे शासनाचे व्यावसायिक प्रमाणपत्र असावे.

वयोमर्यादा (BMC Recruitment 2024 Age Limit)

खुला वर्ग – १८ ते ३८ वर्षे
मागास प्रवर्ग – १८ ते ४३ वर्षे
दिव्यांग प्रवर्ग – १८ ते ४५ वर्षे

वेतन (BMC Recruitment 2024 Salary)

उमेदवारांना दर महिना २९, २०० ते ९२, ३०० दरम्यान पगार असेल.

नोकरीचे ठिकाण (BMC Recruitment 2024 Placement)

तसेच या पदावर निवड झाल्यास नोकरीचे ठिकाण हे मुंबई शहर असेल.

अर्ज आणि अर्ज शुल्क (BMC Recruitment 2024 Application Fees)

खुला प्रवर्ग – १००० रुपये
मागासवर्गीय/ अनाथ – ९०० रुपये

नोकरीसंदर्भात उमेदवारास अधिक माहिती हवी असल्यास बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. अथवा नोकरीची अधिसूचना वाचावी. वेबसाइट, तसेच अधिसूचना वर नमूद केलेली आहे.

महत्वाच्या लिंक (BMC Recruitment 2024 Notification)

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी थेट लिंक

BMC MCGM Recruitment 2024

अधिकृत वेबसाईट

Municipal Corporation of Greater Mumbai

अधिकृत जाहिरात

MCGM Bharti PDF