MCGM BMC Recruitment 2024 : मुंबई महानगरपालिकेत नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे, ती म्हणजे मुंबई महानगरपालिकेने ६०० हून अधक रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्याचे जाहीर केले आहे. मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत), दुय्यम अभियंता (स्थापत्य), दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) या चार पदांच्या जवळपास ६९० रिक्त जागा या भरती प्रक्रियेद्वारे भरल्या जाणार आहेत. २ डिसेंबर २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ज्या उमेदवारांना या भरती प्रक्रियेत अर्ज करायचा आहे, त्यांनी अधिकृत प्रसिद्धी पत्रक वाचून आपला अर्ज सादर करावा.

रिक्त जागांची संख्या

१) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – २५०
२) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत) – १३०
३) दुय्यम अभियंता (स्थापत्य) – २३३
४) दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) – ७७

रिक्त पदांबाबत तपशील

१) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदासाठी एकूण २५० जागा भरल्या जाणार आहेत. हे पद गट क मध्ये येते. या पदासाठी निवड होणाऱ्या उमेदवारांना ४१,८०० ते १,३२,३०० आणि भत्ते या वेतनश्रेणीनुसार पगार मिळेल.

२) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) हे पद गट क मध्ये येते. या पदाच्या एकूण १३० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदावर भरती झालेल्या उमेदवाराला महिना ४१,८०० ते १,३२,३०० आणि भत्ते या वेतनश्रेणीनुसार वेतन मिळेल.

३) दुय्यम अभियंता (स्थापत्य) हे पद गट ब मध्ये येते. या पदाच्या २३३ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारास ४४,९०० ते १,४२,४०० आणि भत्ते या वेतनश्रेणीनुसार वेतन मिळेल.

४) यानंतर दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) या पदाच्या ७७ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. हे पद गट ब मध्ये येतं. या पदावर भरती झालेल्या उमेदवारास महिना ४४,९०० ते १,४२,४०० आणि भते या वेतणश्रेणीनुसार वेतन मिळेल.

महत्त्वाच्या तारखा

मुंबई महानगरपालिकेतील या रिक्त पदांसाठी उमेदवार ११ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत अर्ज करू शकतात.

उमेदवारांसाठी ११ नोव्हेंबरला मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाइटवर भरती प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती उपलब्ध होईल.

महत्त्वाच्या लिंक्स

मुंबई महानगरपालिकेची अधिकृत वेबसाइट

www.mcgm.gov.in

अधिकृत जाहिरात

drive.google.com/file