महाराष्ट्र सरकारी नोकरीसाठी इच्छुकांसाठी मोठी बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने एक्झिक्युटिव्ह असिस्टंट पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. BMC ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, एकूण १८४६ पदांच्या भरतीसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. नियुक्तीनंतर, या पदांसाठी विहित प्रक्रियेद्वारे निवडलेल्या उमेदवारांना प्रति महिना २५५००-८१,१०० रुपये (पे मॅट्रिक्स-M15 + लागू भत्ते) या घोषित वेतनश्रेणीनुसार वेतन दिले जाईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

BMC Recruitment 2024: अर्ज कुठे आणि कसा करायचा?

बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे करण्यात येत असलेल्या एक्झिक्युटिव्ह असिस्टंट पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार BMC च्या अधिकृत वेबसाइट portal.mcgm.gov.in वरील भरती विभागात सक्रिय केलेल्या लिंकला भेट देऊन किंवा अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रियेअंतर्गत, उमेदवारांना प्रथम नोंदणी करावी लागेल आणि नंतर नोंदणीकृत तपशीलांसह लॉग इन करून, उमेदवार आपला अर्ज सबमिट करू शकतील. मंगळवार, २० ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजल्यापासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार ९ सप्टेंबरच्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतील.

BMC Recruitment 2024: अधिसूचना लिंक https://cdn.digialm.com//per/g01/pub/726/EForms/image/ImageDocUpload/12/1113152940247967827083.pdf
-BMC Recruitment 2024:
अर्जाची थेट लिंक – https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32839/90687/Index.html

उमेदवारांनी नोंद घ्यावी की या भरतीसाठी अर्ज करताना, उमेदवारांना विहित शुल्क १००० रुपये ऑनलाइन माध्यमातून भरावे लागतील. राखीव वर्गातील उमेदवारांसाठी शुल्क फक्त ९००रुपये आहे.

BMC Recruitment 2024: कोण करू शकते अर्ज


बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे एक्झिक्युटिव्ह असिस्टंट पदाच्या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छूक उमेदवार कोणत्याही मान्यत प्राप्त बोर्डातून मॅट्रिक परीक्षा उतीर्ण व्हायरला पाहिजे. तसेच उमेदवारांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी ३८ वर्षांपेक्षा जास्त असू नये. राखीव वर्गातील उमेदवारांना जास्तीच्या वयोमर्यादेत सुट देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc recruitment 2024 application process starts from today august 20 for 1846 executive assistant clerk vacancies snk