BMC Recruitment 2024 : मुंबई महापालिकेत नोकरी करु इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे, ती म्हणजे मुंबई महानगपालिकेने रिक्त पदांवर भरती प्रक्रिया राबवण्याचे जाहीर केले आहे. मुंबई महापालिकेच्या नगर अभियंता मध्यवर्ती कार्यालयाकडून ६९० पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेनं कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत), दुय्यम अभियंता(स्थापत्य), दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) या चार पदांसाठी भरती प्रक्रियेसंदर्भातील जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे मुंबई महापालिकेत नोकरी करण्याची ज्यांना इच्छा असल्यास मूळ जाहिरात वाचून अर्ज सादर करावेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अर्ज कधी दाखल करता येणार?

मुंबई महापालिकेतील अभियंता पदासाठी अर्ज सादर करण्यासाठी ११ नोव्हेंबर ते २ डिसेंबर हा कालावधी देण्यात आला आहे. याभरतीसंदर्भातील सविस्तर जाहिरात उमेदवारांना ११ नोव्हेंबरला मुंबई महापालिकेच्या वेबसाईटवर सविस्तर जाहिरात प्रसिद्ध होईल. या भरती प्रक्रियेसंर्भातील अधिक माहिती देखील 11 नोव्हेंबरला उपलब्ध होईल.

शैक्षणिक पात्रता?

मुंबई महापालिकेनं सध्या या पदांसाठी शैक्षणिक पात्रता किंवा अधिक माहिती दिलेली नाही. मात्र, मुंबई महापालिकेच्या वेबसाईटवरील जुन्या पत्रकानुसार कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारानं दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर तीन वर्षांची स्थापत्य, कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी,पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंगमधील पदविका उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. दहावीच्या परीक्षेत मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेलं असणं आवश्यक आहे. याशिवाय एमएसआयटी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

हेही वाचा >> पुण्यात नोकरीची सुवर्णसंधी; पुण्यातील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी’ संस्थेत विविध पदांसाठी भरती; कसा कराल अर्ज जाणून घ्या

रिक्त पदे

१. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदासाठी एकूण २५० जागा भरल्या जाणार आहेत. हे पद गट क मध्ये येते. या पदासाठी निवड होणाऱ्या उमेदवारांना ४१,८०० ते १,३२,३०० आणि भत्ते या वेतनश्रेणीनुसार पगार मिळेल.

२. कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) हे पद गट क मध्ये येते. या पदाच्या एकूण १३० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदावर भरती झालेल्या उमेदवाराला महिना ४१,८०० ते १,३२,३०० आणि भत्ते या वेतनश्रेणीनुसार वेतन मिळेल.

३. दुय्यम अभियंता (स्थापत्य) हे पद गट ब मध्ये येते. या पदाच्या २३३ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारास ४४,९०० ते १,४२,४०० आणि भत्ते या वेतनश्रेणीनुसार वेतन मिळेल.

४. यानंतर दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) या पदाच्या ७७ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. हे पद गट ब मध्ये येतं. या पदावर भरती झालेल्या उमेदवारास महिना ४४,९०० ते १,४२,४०० आणि भते या वेतणश्रेणीनुसार वेतन मिळेल.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc recruitment 2024 brihanmumbai municipal corporation city engineer 690 seats check all details srk