Board Exams 2025 Preparing Tips : महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी ते एप्रिल २०२५ दरम्यान होणार आहेत. तसेच CBSE, ICSE, ISC च्या बोर्ड परीक्षाही त्याचदरम्यान असतात. सध्या शाळांमध्ये दहावी, बारावी बोर्डाच्या पूर्व परीक्षा सुरू आहेत. त्याद्वारे विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेचा पॅटर्न समजून सांगितला जातो. या बोर्डाच्या परीक्षेच्या प्रत्येक पेपरमध्ये विद्यार्थ्यांना १० ते १५ मिनिटांचा अधिकचा वेळ दिला जातो. महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना १० मिनिटांचा, तर CBSE, ICSE बोर्ड परीक्षेत १५ मिनिटांचा अधिकचा वेळ दिला जातो. ज्याचा योग्य वापर केल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान सर्व प्रश्नांची उत्तर व्यवस्थित सोडवता येतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बोर्डाच्या परीक्षेत मिळणाऱ्या अधिकच्या वेळेला ‘गोल्डन टाइम’, असे म्हणतात. परीक्षा सुरू होण्यापूर्वी म्हणजेच या कालावधीतच विद्यार्थी अर्धा पेपर सोडवू शकतात. बोर्डाच्या परीक्षेत टॉप येण्यासाठी फक्त विषयांचा अभ्यास करणेच महत्त्वाचे नसते, तर त्यावेळी वेळेचे नियोजन करणेही महत्त्वाचे असते. परीक्षा केंद्रात गेल्यापासून तुम्ही काय करता आणि वेळेचा सदुपयोग कसा करता याला फार महत्त्व आहे. मिळालेल्या अधिकच्या १० ते १५ मिनिटांच्या वाचनाच्या वेळेत नेमके काय करायचे हे आधी जाणून घ्या.

परीक्षेपूर्वी १०, १५ मिनिटे अधिक का दिली जातात (Board Exam Preparation Tips)

सीबीएसई, महाराष्ट्र आणि इतर बोर्डाच्या १० वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या कालावधीत प्रत्येक पेपर सुरू होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी १० ते १५ मिनिटे वेळ दिला जातो. यादरम्यान विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेत विचारलेले सर्व प्रश्न नुसते वाचण्याऐवजी नीट समजून घ्यायचे असतात. या वेळेत तुम्ही पेपर लिहिण्यासाठी एक स्ट्रॅटेजीदेखील तयार करू शकता. म्हणजे ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नीट येत आहेत, ती आधी लिहायची. त्यामुळे तुमचा विचार करून लिहिण्यासाठी लागणारा वेळ वाया जाणार नाही. त्यानंतर तुम्हाला अवघड वाटत असलेले प्रश्न सोडवा. या १० ते १५ मिनिटांत तुम्ही पुढील तीन तासांत प्रश्नपत्रिका कशी सोडवणार याचा ढोबळ आराखडा तुमच्या मनात तयार करा.

बोर्डाच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका मिळण्यापूर्वीच संपूर्ण प्रश्नपत्रिका अचूक सोडवण्याचा आराखडा तयार करा. त्यासाठी ही १५ मिनिटं फार उपयोगी ठरतील. (Study Tips for Students Preparing for the 2025 Board Exams)

१) परीक्षा केंद्रात प्रवेश करताच एक दीर्घ श्वास घ्या. तुमचे हृदय आणि मन शांत करा. मनातील सर्व विचार दूर करू. फक्त परीक्षेसाठी पुढील तीन तासांसाठी रणनीती तयार करा.

२) आता तुमची प्रश्नपत्रिका तपासा. कोणताही प्रश्न किंवा पेज कमी नाही ना किंवा लिहिलेले प्रश्न अस्पष्ट तर दिसत नाहीत ना हे तपासा. त्यामुळे पेपर लिहिताना तुम्हाला पुढे अडचणी येणार नाही; अन्यथा नंतर पाहिल्यास गडबड होईल आणि लिहिण्यासाठी वेळ कमी पडेल.

३) लांबलचक उत्तरांचे प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि समजून घ्या. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हे प्रश्न सोपे आणि अवघड अशा दोन वर्गांत विभागू शकता.

४) प्रश्नपत्रिकेच्या प्रत्येक प्रश्नासाठी वेळ विभाजित करा. त्यामुळे संपूर्ण पेपर तीन तासांत सोडवण्यास मदत होईल.

५) प्रश्नपत्रिकेवरच एक शब्द किंवा MCQ सारखे प्रश्न पेन्सिलच्या साह्याने आधीच सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे परीक्षेत दीर्घोत्तरी प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी तुम्हाला अधिक वेळ मिळेल. तसेच, तुम्ही लहान प्रश्नही लगेच लिहून मोकळे व्हाल.

६) सोप्या वाटणाऱ्या इतर प्रश्नांची उत्तरे किंवा त्यातील महत्त्वाचे मुद्दे पेन्सिलच्या साह्याने तुमच्या प्रश्नपत्रिकेवर लिहा; जेणेकरून ते तुम्ही नंतर तपशीलवार लिहू शकता. पण, प्रश्नपत्रिकेवर काहीही लिहायचे असल्यास कृपया पर्यवेक्षकाची परवानगी घ्यावी.