Bank Of Baroda Recruitment 2023: बॅंकेमध्ये काम करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. देशातील प्रमुख बॅंकांपैकी एक असलेल्या बॅंक ऑफ बडोदामध्ये लवकरच मेगा भरती केली जाणार आहे. या बॅंकेमध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर, आयटी ऑफिसर आणि अन्य रिक्त पदांसाठी नव्या उमेदवारांनी नियुक्त केले जाणार आहे. या भरतीमध्ये सामील होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे लागतील. भरतीसंबंधित सविस्तर माहिती बॅंक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॅंक ऑफ बडोदामध्ये एकूण ६७७ जागांसाठी भरतीचे आयोजन केले जाणार आहे. भरतीद्वारे स्पेशालिस्ट ऑफिसर जागेसाठी १५७ उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. या पदावर काम करण्याची इच्छा असणारे उमेदवार १७ मे पर्यंत ऑनलाइन अर्ज भरु शकतात. आधी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ एप्रिल होती. परंतु काही कारणांमुळे अंतिम तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. ही नियुक्ती कॉर्पोरेट अ‍ॅन्ड इंस्टीट्यूशन क्रेडिट या विभागाद्वारे केली जाईल. याव्यतिरिक्तस एमएसएसई व्हर्टिकल विभागामध्येही विविध पदांसाठी १२ उमेदवारांना नोकरी दिली जाणार आहे.

बॅंक ऑफ बडोदाद्वारे केल्या जाणाऱ्या या मेगाभरतीमध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर या जागेव्यतिरिक्त अन्य पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ मे आहे. या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याऱ्या उमेदवारांना वयाची अट पाळावी लागणार आहे. प्रत्येक पदांसाठी वयाटी मर्यादा वेगवेगळी आहे. २६ ते ४२ या वयोगटातील उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

बॅंक ऑफ बडोदाच्या उपलब्ध असलेल्या रिक्त जागा –

उपाध्यक्ष (BU Profitability & Expense Management (1 UR Vacancy) in Finance Function) – ८ जागा

विशेष अधिकारी (Finance work on regular basis) – ४ जागा

एमएसएमई विभागात कराराच्या आधारावर विविध पदांसाठी भरती – ८७ जागा

कॅश मॅनेजमेंट विभागात कराराच्या आधारावर विविध पदांसाठी भरती – ५३ जागा

आणखी वाचा – टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसतर्फे ‘या’ पदांसाठी होणार भरती; 16 मे पूर्वी भरा अर्ज, जाणून घ्या सविस्तर

रिसीव्हेबल मॅनेजमेंट विभागात कराराच्या आधारावर विविध पदांसाठी भरती – १४५ जागा

रिसीव्हेबल मॅनेजमेंट वर्टिकल विभागात विविध पदांसाठी भरती – १५९ जागा

आयटी अधिकारी /व्यावसायिकांची भरती – ५२ जागा

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bob recruitment 2023 apply now for 677 post in bank of baroda know more details yps