BOI PO Recruitment 2023: बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, बँक ऑफ इंडियाने (Bank of India Recruitment) भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार बँकेत ५०० पदांची भरती करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार बँक ऑफ इंडियाच्या bankofindia.co.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करु शकतात.
या भरतीसाठी तुम्ही आजपासूनच उमेदवारी अर्ज करू शकता. तर ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत २५ फेब्रुवारी २०२३ ही असेल आहे. ही भरती प्रक्रिया ५०० रिक्त जागा भरण्यासाठी केली जात आहे. या ५०० जागांपैकी ३५० जागा या सामान्य बँकिंग स्ट्रिममध्ये क्रेडिट ऑफिसरच्या पदासाठी आहेत तर स्पेशलिस्ट स्ट्रिममधील IT ऑफिसरच्या पदासाठी १५० जागा असणार आहेत.
हेही वाचा- केंद्र आणि राज्य सरकारच्या या विभागात बंपर भरती, रेल्वे मंत्रालयाने घेतला हा मोठा निर्णय
वयोमर्यादा –
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय हे २० ते २९ वर्षांच्या दरम्यान असावे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे.
अर्ज शुल्क –
बँक ऑफ इंडिया भरती २०२३ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. ते शुल्क सामान्य/ EWS/ OBC उमेदवारांसाठी अर्ज शुल्क हे ८५० रुपये आहे. तर, SC/ST/PWD उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १७५ रुपये इतके आहे.
BOI भरती २०२३ साठी अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या –
- bankofindia.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- होमपेजवर गेल्यानंतर करिअर टॅबवर क्लिक करा.
- त्यानंतर “Recruitment of Probationary in JMGS-I upon passing Post Graduate Diploma in Banking & Finance(PGDBF) Project No. 2022-23/3 Notice dated 01.02.2023” यावर क्लिक करा.
- Fregsiter करा आणि पुढे जा.
- अर्जासाठी आवश्यक असणारी फी भरा.
- सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट घ्या.
वरील पद्धतीने तुम्ही या भरतीसाठी अर्ज भरु शकता. यासह अधिकच्या माहितीसाठी आणि कोणत्याही शंकेचे निरसन करण्यासाठी तुम्ही बॅंकेची अधिकृत बेवसाईट bankofindia.co.in ला भेट द्या.