Bank of Maharashtra Recruitment 2023 : बँकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत क्रेडिट ऑफिसर पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून मागवले जात आहेत. या पदांसाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात. बँक ऑफ महाराष्ट्र भरती २०२३ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बँक ऑफ महाराष्ट्र भरती २०२३ –

पदाचे नाव – क्रेडिट ऑफिसर स्केल – II, क्रेडिट ऑफिसर स्केल – III

एकूण रिक्त पदे – १००

शैक्षणिक पात्रता –

क्रेडिट ऑफिसर स्केल – II : ६० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + बँकिंग/ फायनान्स/ बँकिंग आणि फायनान्स/ मार्केटिंग/ फॉरेक्स/ क्रेडिट विषयात MBA किंवा PGDBA/ PGDBM/ CA/ CFA/ ICWA + ३ वर्षे अनुभव.

क्रेडिट ऑफिसर स्केल – III : ६० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + बँकिंग/ फायनान्स/ बँकिंग आणि फायनान्स/ मार्केटिंग/ फॉरेक्स/ क्रेडिट विषयात MBA किंवा PGDBA/ PGDBM/ CA/ CFA/ ICWA + ५ वर्षे अनुभव.

वयोमर्यादा –

खुला प्रवर्ग – कृपया जाहिरात बघा.
ओबीसी – ३ वर्षांची सूट.
मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट.

हेही वाचा- रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी! पदानुसार महिना १ लाख ४० हजारांपर्यंत पगार मिळणार

अर्ज फी –

  • खुला/ ओबीसी/ EWS – ११८० रुपये.
  • मागासवर्गीय – ११८ रुपये.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा –

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – २३ ऑक्टोबर २०२३
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ नोव्हेंबर २०२३

अधिकृत बेवसाईट – https://bankofmaharashtra.in/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक – https://ibpsonline.ibps.in/bomcooct23/

भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी (https://drive.google.com/file/d/193G7i9ZaQOZWUsJgwFJdtfH5nZdWq7N0/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bom bharti 2023 job opportunity in bank of maharashtra recruitment for these posts startss know who can apply jap