Bombay High Court Bharti 2023: मुंबई उच्च न्यायालय (BHC) औरंगाबाद खंडपीठ येथे स्वयंपाकी (कुक) या पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार http://www.bombayhighcourt.nic.in या वेबसाइटवर अर्ज करु शकतात. महत्वाची बाब म्हणजे ही भरतीसाठी शैक्षणिक पात्रता केवळ चौथी पास आहे. याबाबतची माहीती उच्च न्यायालय (BHC) भरती बोर्डाने एप्रिल २०२३ च्या जाहिरातीमध्ये दिली आहे.

भरती अंतर्गत एकूण किती जागा भरल्या जाणार तसेच भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा, अर्ज करण्याची मुदत याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया. मुंबई उच्च न्यायालय (BHC) औरंगाबाद खंडपीठाकडून स्वयंपाकी पदासाठीच्या ३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही २ मे २०२३ असणार आहे. भरतीबाबतची सविस्तर माहिती आणि जाहिरात पाहण्यासाठी उमेदवारांनी http://www.bombayhighcourt.nic.in या अधिकृत बेवसाईटला अवश्य भेट द्यावी.

NEET Postgraduate Exam Schedule Announced Wardha news
नीट पदव्युत्तर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; वैद्यक आयोग म्हणतो…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
NIACL Recruitment 2024: Notice Out For 500 Assistant Vacancies; Check Salary, Eligibility & More
NIACL Bharti 2024: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ५०० जागांसाठी भरती; ४० हजारांपर्यंत पगार, अर्ज कसा करायचा? जाणून घ्या
DoT recruitment 2024 Apply for Sub Divisional engineer salary up to Rs 151100
DoT recruitment 2024: सब-डिव्हिजन इंजीनिअरच्या पदासाठी होणार भरती;१,५१,१०० रुपयांपर्यंत मिळेल पगार, आताच करा अर्ज
upsc released announced annual time table
‘यूपीएससी’कडून विविध परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कोणती परीक्षा कधी होणार?
UPSC CSE Mains Result 2024 : यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षा 2024 चा निकाल जाहीर; ‘येथे’ ऑनलाइन पाहा निकाल
Both exams held statewide school registration and student applications were open from October 17 to December 7
विद्यार्थ्यांनो अंतिम मुदतवाढ, अन्यथा,,
SBI Clerk Recruitment 2024 Notification 2024 released for recruitment of Junior Associates at sbi.co.in
SBI Recruitment 2024: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती; इच्छुक उमेदवारांनी लगेच करा अर्ज; अर्जाची लिंक बातमीत

हेही वाचा- पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरीची मोठी संधी! ‘या’ पदाच्या १५४ जागांसाठी भरती, सविस्तर माहिती जाणून घ्या

एकूण रिक्त पदे – ३

पदाचे नाव -स्वयंपाकी (कुक)

शैक्षणिक पात्रता –

चौथी पास त्यासोबत स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान व अनुभव आणि मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता व बोलता येणं आवश्यक.

वयोमर्यादा –

हेही वाचा- तरुणांसाठी महत्वाची बातमी! TCS कडून तब्बल ४० हजार फ्रेशर्सना नोकरी देण्याची घोषणा, अधिक माहिती जाणून घ्या

खुला प्रवर्ग – १८ ते ३८ वर्षे.

मागासवर्गीयांना ५ वर्षांची सूट देण्यात आली आहे.

अर्ज शुल्क

खुला प्रवर्ग आणि मागासवर्गीय दोघांनाही २०० रुपये अर्ज शुल्क आहे.

नोकरीचे ठिकाण – औरंगाबाद

महत्वाच्या तारखा –

अर्ज करण्याची सुरवात – १० एप्रिल २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ मे २०२३

अर्ज करण्याचा पत्ता – प्रबंधक (प्रशासक), मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद, जालना रोड, औरंगाबाद – ४३१००९

भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1AVpe3G6zl_WCHJRvxgZfntsNSt9Dzf5M/view) या लिंकला भेट द्या.

अर्ज पाहण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1J-_BR0W3OlRxV5arz8a8iikJp08U-X8t/view) या लिंकला अवश्य भेट द्या.

तसेच उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Story img Loader