Bombay High Court Recruitment 2023: मुंबई उच्च न्यायालयाने लॉ क्लर्क पदांसाठी ५० पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. मुंबई उच्च न्यायालय भरती २०२३ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज करण्याचा पत्ता याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया. मुंबई उच्च न्यायालयात जाहीर करण्यात आलेल्या भरतीचा जाहिरात क्रमांक 1502/2019-20/(Law Clerks)/2459 असा आहे. तर ही भरती एकूण ५० पदांसाठी केली जाणार आहे.
पदाचे नाव – लॉ क्लर्क
शैक्षणिक पात्रता –
५५ % गुणांसह विधी पदवी (LLB) किंवा पदव्युत्तर पदवी (LLM) + संगणकाचे ज्ञान.
वयोमर्यादा –
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ ते ३० वर्षादरम्यान असावे.
अर्जाचे शुल्क –
या भरतीसाठी अर्ज करण्यास कसलेही शुल्क भरावे लागणार नाही.
हेही वाचा- IT क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ पाच कंपन्यांमध्ये मोठी नोकरभरती
नोकरी ठिकाण –
मुंबई उच्च न्यायालया अंतर्गत केल्या जाणाऱ्या या भरतीमधील पात्र उमेदवारांना मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद या ठिकाणी काम करता येणार आहे.
अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://bombayhighcourt.nic.in/index.php
महत्वाच्या तारखा –
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख २ मार्च २०२३ आहे तर अर्ज करण्याची शेवटची मुदत ही २० मार्च २०२३ पर्यंत असणार आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता –
रजिस्ट्रार (Personnel), उच्च न्यायालय, Appellate Side , मुंबई, ५ वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जी.टी. हॉस्पिटल कंपाऊंड, अशोका शॉपिंग सेंटरच्या मागे, क्रॉफर्ड मार्केट जवळ, एल.टी. मार्ग, मुंबई – ४००००१
जाहिरातीची PDF पाहण्यासाठी पुढील लिंकला भेट द्या. https://drive.google.com/file/d/133UsSvlqZ-q-dBXzSgkiRKMmN0b3SjW3/view
उमेदवारांनी आपला उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.