Bombay High Court Recruitment 2024 : मुंबई उच्च न्यायालयात विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. उच्च न्यायालयात मुख्य संपादक, संपादक, उपसंपादक, सहायक संपादक या पदाच्या एकूण १३ रिक्त जागा आहेत. या भरतीत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी त्यांचा ऑनलाईन अर्ज ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमा करायचे आहेत. कंत्राटी पद्धतीने ही भरती प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे तुम्हीही या भरतीसाठी अर्ज करणार असाल, तर आधी शैक्षणिक पात्रता, वय, पगार यांसह इतर आवश्यक गोष्टींची माहिती करून घ्यावी.
मुंबई उच्च न्यायालयातील रिक्त पदांची संख्या (Post Name and Vacancies for High Court of Bombay Recruitment 2024)
१) मुख्य संपादक – १ •
२) संपादक – २ (इंग्रजी आणि मराठी भाषेसाठी प्रत्येकी)
३) उपसंपादक – ४
४) सहायक संपादक – ६
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (Bombay High Court Recruitment 2024 Educational Qualification )
उमेदवारांकडे कायद्याची पदवी (LLB) असणे गरजेचे आहे. त्यासह अनुभव किंवा निवृत्त जिल्हा न्यायाधीश (Retired District Judge)
१) मुख्य संपादक (Chief Editor)
कायद्याची पदवी (Degree in Law) + अनुभव किंवा निवृत्त जिल्हा न्यायाधीश (Retired District Judge)
२) संपादक (Editor)
कायद्याची पदवी (Degree in Law) + अनुभव किंवा निवृत्त जिल्हा न्यायाधीश (Retired District Judge)/ निवृत्त सचिव (विधिमंडळ) (Retired Secretary – Legislation)/ निवृत्त प्राचार्य/प्राध्यापक (कायदा महाविद्यालये)/ निवृत्त अधिकारी (कायदा आयोग).
३) उपसंपादक (Deputy Editor)
कायद्याची पदवी (Degree in Law) + अनुभव किंवा निवृत्त न्यायिक अधिकारी (Retired Judicial Officer).
४) सहायक संपादक (Assistant Editor) कायद्याची पदवी (Degree in Law) किंवा LL.M. अंतिम वर्ष उत्तीर्ण (किमान 55% गुणांसह) + अनुभव किंवा निवृत्त जिल्हा न्यायाधीश (Retired District Judge).
पगार (Salary for High Court of Bombay Recruitment 2024)
या पदभरतीत अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ६० हजार ते दीड लाखापर्यंत पगार दिला जाईल.
१) मुख्य संपादक – रु. १,५०,००० / दरमहा
2) संपादक – रु. १,००,००० / दरमहा
३) उपसंपादक – रु. ८०,०००/- दरमहा
४) सहायक संपादक – रु. ६०,०००/- दरमहा
वयोमर्यादा (Age Limit for High Court of Bombay Recruitment 2024)
१) मुख्य संपादक : ४५ ते ६९ वर्षे
२) संपादक : ३५ ते ४४ वर्षे
३) उपसंपादक : ३५ ते ४४ वर्ष
४) सहायक संपादक – २१ ते ४० वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख
इच्छुक उमेदवार ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज पाठवू शकतो.
कसा करायचा अर्ज? (How to Apply for High Court of Bombay Recruitment 2024)
मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत अधिसूचनेमध्ये दिल्याप्रमाणे या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार अंतिम तारखेपर्यंत किंवा त्यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात किंवा ऑफलाइन पद्धतीनेही अर्ज करू शकतात.
अर्ज करण्यासाठी पत्ता – सेंट्रल प्रोजेक्ट को-ऑर्डिनेटरचे कार्यालय, मुंबई उच्च न्यायालय, सहावा मजला, जी. टी. बिल्डिंग कम्पाउंड कॉम्प्लेक्स, मुंबई– ४०० ००१.
(टीप- अर्जासंबंधीची लिंक खाली दिलेली आहे.)
मुंबई उच्च न्यायालय भरती २०२४ – अधिकृत अर्जाची लिंक
मुंबई उच्च न्यायालय भरती २०२४ – भरतीची अधिकृत नोटीस
मुंबई उच्च न्यायालय भरती २०२४- अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा