Bombay High Court Recruitment 2024 : मुंबईतील उच्च न्यायालयाच्या अंतर्गत नागपूर शहरात ‘लिपीक’ [क्लार्क] या पदासाठी भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता, पात्रता निकष, वयोमर्यादा व वेतन यासंबंधीची माहिती उमेदवारांनी जाणून घ्या. तसेच, अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ते पाहा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

BHC Bharti Recruitment 2024 : पद आणि पदसंख्या

नागपूर शहरातील उच्च न्यायालयात क्लार्क या पदासाठी ४५ रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे. तसेच, ११ पदांसाठी वेटिंग लिस्ट म्हणजेच प्रतीक्षा यादी काढण्यात येणार आहे.

म्हणजेच क्लार्कपदी एकूण ५६ जागांवर नोकरीसाठी भरती होणार आहे.

BHC Bharti Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

क्लार्क या पदासाठी नोकरीचा अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे खालील शिक्षण असणे आवश्यक आहे.

कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. कायदा [Law] विषयातील पदवी असणाऱ्या उमेदवारास अधिक प्राधान्य देण्यात येईल.

उमेदवार सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा अथवा सरकारी बोर्डने घेतलेल्या बेसिक टायपिंग [GCC-TBC] किंवा I.T.I. इंग्रजी टायपिंगमध्ये ४० w.p.m वेग असणारे सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : HUDCO Mumbai Recruitment 2024 : गृहनिर्माण आणि नागरी विकास वित्त निगम येथे भरती! माहिती पाहा

BHC Bharti Recruitment 2024 : वेतन

क्लार्क या पदावर उमेदवाराची निवड झाल्यानंत, उमेदवारास २९,२००/- रुपये ते ९२,३००/- रुपये वेतन देण्यात येईल.

BHC Bharti Recruitment 2024 – मुंबई उच्च न्यायालय अधिकृत वेबसाईट लिंक –
https://bombayhighcourt.nic.in/index.php

BHC Bharti Recruitment 2024 – अधिसूचना –
https://bombayhighcourt.nic.in/writereaddata/recruitment/PDF/recruitbom20240513104040.pdf

BHC Bharti Recruitment 2024 – अर्ज पाठविण्याची लिंक –
https://bhc.gov.in/nagclerkrecruit/home.php

BHC Bharti Recruitment 2024 : अर्ज आणि अर्ज प्रक्रिया

क्लार्क या पदासाठी उमेदवारास नोकरीचा अर्ज करायचा असल्यास, त्याने तो ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करताना उमेदवाराने फॉर्ममध्ये आपली संपूर्ण आणि अचूक माहिती भरावी.
तसेच, अर्जासह सर्व आवश्यक कागदपत्रे योग्य क्रमाने जोडावी.
नोकरीचा अर्ज पाठविल्यानंतर उमेदवारास परीक्षेत किमान ४५ गुण मिळविणे आवश्यक आहेत.
नोकरीचा अर्ज उमेदवारांनी अंतिम तारखेआधी पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख ही २७ मे २०२४ अशी आहे.

क्लार्क या पदासंबंधी उमेदवारास अधिक माहिती हवी असल्यास, मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. अथवा नोकरीची अधिसूचना वाचावी. वेबसाइट, अधिसूचना आणि नोकरीचा अर्ज पाठविण्याची लिंक वर नमूद केलेली आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bombay high court recruitment 2024 hiring in nagpur city check out job details in marathi dha