BPNL Bharti 2023: दहावी आणि बारावी पास उमेदावारांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची संधी. भारतीय पशुपालन निगम लिमिटेडमध्ये सर्वेयर आणि सर्वेयर इन चार्जसाठी भरती निघाली आहे. जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छूक आहेत ते निश्चिक तारखेच्या पूर्वी अर्ज करू शकतात. अर्जासाठी नोंदणीची प्रक्रिया १९ जून पासून सुरू झाली आहे आणि या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ जुलै आहे. शेवटच्या तारखेच्याआधी फॉर्म भरा अन्यथा अर्जाचा स्वीकार केला जाणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पदभरती तपशील
या भरती मोहिमेंतर्ग एकुण ३४४४ पदांवर भरती होणार आहे. यामध्ये २८७० पदे सर्वेयरसाठी आहेत ५७४ पदे सर्वेयर इन चार्जकरिता आहे. या पदांसाठी केवळ ऑनलाईन अर्ज केला जाऊ शकतो. इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्वीकार केले जाणार नाही. अर्ज करण्यासाठी तुम्हाला भारतीय पशुपालन निगमच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल ज्याचा पता आहे.bhartiyapashupalan.com.

हेही वाचा – ठाणे महानगरपालिकेत ७० जागांसाठी होणार भरती, मिळू शकतो १ लाखांपेक्षा जास्त पगार; परीक्षेचं टेन्शन नाही, थेट मुलाखतीला जा!

कोण करू शकते अर्ज
या पदांवर अर्ज करणअयासाठी उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी -बारावी पास असला पाहिजे. वयोमर्यादेबाबत सांगायचे झाल्यास. या पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवारचे वय २१ ते ४० असले पाहिजे. अर्जाची लिंक अॅक्टिव्ह वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क आणि पगार
या पदासाठी अर्ज करण्यासाठी सर्वेयर पदासाठी अर्ज शुल्क ८२६ रुपये आहे तर सर्वेयर इन चार्ज पदासाठी अर्ज शुल्क ९४४ रुपये निश्चित केले आहे. दोन्ही पदांसाठी मिळणारा पगार वेगळा आहे. सर्वेयर इन चार्ज पदासाठी २४ हजार रुपये महिना सर्वेयर पदासाठी २० हजार रुपये महिना पगार मिळेल.

हेही वाचा – ​IBPS क्लार्क पदासाठी तब्बल ६ हजार जागांसाठीची भरती जाहीर, १ जुलैपासून करु शकता अर्ज, जाणून घ्या सविस्तर

उमेदवाराची निवड कशी होईल
या पदावर उमेदवाराची निवड लेखी परिक्षा आणि इंटरव्हूच्या माध्यमातून होईल. जे उमेदवार लेखी परिक्षा पास करणार आहे त्यांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल. दोन्ही परिक्षा पास करणारे उमेदवारांची निवड अतिंम असेल.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bpnl recruitment 2023 notification out for mega vacancies check posts monthly salary eligibility and how to apply snk