BSF Bharti 2023 : सीमा सुरक्षा दल अंतर्गत ‘उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल’ पदाच्या १६६ रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करता येणार आहेत. सीमा सुरक्षा दल भरती २०२३ साठी ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पदाचे नाव – उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल.
एकूण पदसंख्या – १६६ जागा
शैक्षणिक पात्रता –
उपनिरीक्षक : केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये ३ वर्षांचा डिप्लोमा.
हेड कॉन्स्टेबल :
- मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून दहावी पास किंवा समकक्ष
- केंद्र किंवा राज्य सरकारच्या विषयाद्वारे मान्यताप्राप्त फर्मकडून संबंधित व्यापारातील तीन वर्षांचा अनुभव असलेले मान्यताप्राप्त संस्थेकडून संबंधित व्यापारातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रमाणपत्र.
कॉन्स्टेबल : मान्यताप्राप्त संस्थेकडून ट्रेडमध्ये प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल.
वयोमर्यादा – ५२ वर्षे.
अर्जाची पद्धत – ऑफलाईन
हेही वाचा- प्रसार भारती अंतर्गत पदवीधरांना नोकरीची संधी! ‘या’ पदासाठी भरती सुरु, सविस्तर माहिती जाणून घ्या
अर्ज पाठविण्याचा पत्ता – महानिरीक्षक (कर्मचारी), महासंचालनालय, बीएसएफ, ब्लॉक क्रमांक ४, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – ११०००३.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात निघाल्यापासून ६० दिवसांच्या आत.
अधिकृत वेबसाईट –
bsf.nic.in
भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.
https://drive.google.com/file/d/1neHVAbNNOYnfHV8qEDeY7RiFeVMAisUR/view