BSF Recruitment 2023: सीमा सुरक्षा दलामध्ये (BSF) नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. यासाठी बीएसएफने हेड कॉन्स्टेबल(HC) पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. उमेदवार जे या पदावर अर्ज करु इच्छितात ते बीएसएफ च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन rectt.bsf.gov.in ला भेट देऊन अर्ज करु शकतात या भरतीसाठी एकूण २४७ पदांवर भरती केली जाणार आहे. यामध्ये २१७ हेड कॉन्स्टेबल रेडिओ ऑपरेटर (RO)साठी आहेत तर बाकी ३० हेड कॉन्स्टेबल रेडिओ मॅकेनिक्स( RM) साठी आहे. या पदांवर (BSF Bharti 2023) साठी अर्ज करण्यासाठी आज म्हणजेच १२ मे २०२३ ही शेवटची तारीख आहे.
बीएसएफ भरतीसाठी वयोमर्यादा
या पदांसाठी कोणतेही उमेदवार अर्ज करत असतील, त्यांचे वय १२ मे २०२३ रोजी १८ ते २५ वर्षे दरम्यान असावे. यासोबतच, सरकारी आदेशानुसार, SC/ST/OBC श्रेणी आणि इतर विशेष श्रेणीतील कर्मचाऱ्यांना वयात सवलत मिळेल.
हेही वाचा- भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये ‘या’ पदांसाठी होणार भरती, निवड प्रक्रिया आणि अर्जाची पद्धत जाणून घ्या
बीएसएफ भरतीसाठी आवश्यक तारखा
अर्जाची प्रक्रिया सुरू झालेली तारीख २२ एप्रिल २०२३
अर्ज जमा करण्याची शेवटची तारिख – १२ मे २०२३
बीएसएफ भरतीसाठी पदांचा तपशील
हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर)-२१७
हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक)-३०
एकूण पदांची संख्या- २४७
बीएसएफ भरतीसाठी
उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून किमान ६०% गुणांसह भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितसह इयत्ता १२वी (१०+ २ पॅटर्न)/ मॅट्रिक उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, उमेदवारांकडे दोन वर्षांचे आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
हेही वाचा – सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे येथे नोकरीची संधी! लवकरच ‘या’ ३१३ पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या सविस्तर
सूचना आणि अर्ज लिंक पहा
बीएसएफ भरती २०२३ अर्जाची लिंक – https://bsf.gov.in/
बीएसएफ भरती २०२३ अर्जाची लिंक – https://d3t79nicn48uzj.cloudfront.net/bsf/custom/1683782703Corrigendum-11May23.pdfौ
BSF भरतीद्वारे निवड झाल्यावर मिळणारा पगार
या पदांवर उमेदवार निवडल्यास, त्यांना मॅट्रिक्स लेव्हल-४ अंतर्गत पगार म्हणून २५५०० ते ८११०० रुपये दिले जातील.