Success Story of Dilip Shanghvi: अनेकदा उच्च शिक्षण घेऊन, मोठ्या पगाराच्या नोकरीची ऑफर येऊनही काही लोक स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतात. बऱ्याचदा हा प्रयत्न फसतो. पण, काही जण समोरील आव्हाने स्वीकारून पुढे जाताना येणाऱ्या अडीअडचणींवर यशस्वीपणे मात करतात. ‘ज्याची इच्छाशक्ती प्रबळ, त्याच्या कामाला येई बळ’ असे म्हटले जाते. जर तुमच्यात काही करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला ते करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. जर तुम्ही हार मानली नाही आणि सतत प्रयत्न करत राहिले तर यश निश्चित आहे.

यश मिळवण्यासाठी जोखीम घेणे आवश्यक आहे. तसेच प्रचंड कष्ट करण्याबरोबरच सातत्य ठेवले तर एक दिवस तुम्ही नक्कीच यशाच्या शिखरावर पोहोचता. आज आपण अशाच एका उद्योगपतीची गोष्ट पाहणार आहोत, ज्यांनी आपल्या मेहनतीनं यशाचं शिखर गाठलं आहे. देशातील सर्वात मोठी फार्मा कंपनी सन फार्मास्युटिकलचे संस्थापक आणि एमडी दिलीप संघवी यांनी असेच काहीसे केले आहे.

success story of utham gowda started his own startup owner of captain fresh company
जास्त पगाराची नोकरी सोडली अन् घेतली ‘ही’ जोखीम, आता आहेत कोटींचे मालक; वाचा उथम गौडा यांचा प्रेरणादायी प्रवास
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Success Story Of Chitraang Murdia
Success Story Of Chitraang Murdia : एकेकाळी होता आयआयटी टॉपर, डॉक्टर होण्यासाठी सगळंच सोडलं; वाचा, चित्रांग मुरडियाची गोष्ट
Terrifying Railway accident of railway employee due to train driver at barauni junction in bihar video viral
बापरे! चालकाच्या चुकीमुळे घडला मोठा अनर्थ, ट्रेन सुरू करताच झाला रेल्वे कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडल? पाहा VIDEO
cash seized south mumbai ahead of assembly elections in maharashtra
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत कारवाई ; सव्वा दोन कोटींची रोख जप्त
western railway recovers 80 crore fine from ticketless passengers
विनातिकीट प्रवाशांकडून ८० कोटींची दंडवसुली; सात महिन्यांतील पश्चिम रेल्वेची कारवाई
Romita Majumdar
फेनाम स्टोरी: टेलिंग हर ‘फॉक्स’टेल
IAS Ramesh Gholap Success Story
Success Story: वडिलांच्या निधनानंतर आईबरोबर विकल्या बांगड्या आणि मेहनतीच्या जोरावर झाले IAS अधिकारी

पायपीट करत औषधं विकली

एक काळ असा होता, जेव्हा दिलीप संघवी हे औषध वाटपाचे काम करायचे. ते फिरून-फिरून औषध कंपन्यांची औषधं विकायचे. एके दिवशी अचानक त्यांच्या मनात विचार आला की, जर मी इतरांनी बनवलेली औषधं विकू शकतो, तर माझी स्वतःची का नाही.

२००० उधार घेऊन सुरू केली कंपनी

दिलीप संघवी यांचा जन्म गुजरातमधील अमरेली येथे झाला होता. १९८२ मध्ये त्यांनी वडिलांकडून दोन हजार रुपये कर्ज घेतले आणि त्यांच्या मित्रासोबत गुजरातमधील वापी येथे त्यांची फार्मास्युटिकल कंपनी सन फार्मा सुरू केली. सुरुवातीला कंपनीने अनेक प्रकारची औषधं तयार करण्याऐवजी चांगल्या दर्जाच्या औषधांवर भर दिला. कंपनीच्या मार्केटने चांगली कामगिरी केली.

हेही वाचा >> Success Story: पुणेकर जगात भारी! परदेशातील अडीच लाखांची नोकरी सोडून सुरु केला स्वत:चा व्यवसाय; आता करोडोंची उलाढाल

त्यानंतर १५ वर्षांनंतर, १९९७ मध्ये दिलीपने तोट्यात चालणारी अमेरिकन कंपनी कार्को फार्मा विकत घेतली, जेणेकरून ते अमेरिकन बाजारात पोहोचू शकतील. यानंतर २००७ मध्ये कंपनीने इस्रायली कंपनी तारो फार्मा खरेदी केली. २०१२ मध्ये संघवी यांनी चेअरमन आणि सीईओ पदाचा राजीनामा दिला होता. या युनिटमध्ये ते मानसोपचाराशी संबंधित औषधे बनवत असत. एक क्षण असाही होता, जेव्हा ते देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक बनले. २०१५ मध्ये फोर्ब्सच्या यादीत दिलीप संघवी यांनी मुकेश अंबानींना मागे टाकून देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले होते.