डॉ. श्रीराम गीत

नमस्कार सर, माझे वय ६३वर्षे आहे. मी सर्व सरकारी आस्थापनांत आकाशवाणी, दूरदर्शन, पीआयबी इ. अनुवादक म्हणून काम केले आहे. माझी निवड परीक्षा घेऊन झाली असली तरी यातली डिग्री मला नव्हती, ती मी एमएस (ट्रान्सलेशन स्टडीज) या इग्नूमधील कोर्स करून पूर्ण केली. यापुढे मला पीएचडी करण्याची इच्छा आहे पण दिल्लीत रहाता येणार नाही. तरी मी पुढे पीएचडी कुठून करावे? सांगाल का? तसेच पीएचडी करून काही नोकरी सदृश्य लाभ होतील का? तसेच मला विमेन स्टडीज हा विषय सुद्धा आकर्षित करत आहे. हे शिक्षण मला मुंबईत राहून शक्य आहे. मला भाषांतराची छोटी, मोठी कामे मिळतात. पण मला एखाद्या मासिकाचे संपादन अशा प्रकारचे साहित्य विषयक काम करून नाव कमवायची इच्छा आहे. तरी कृपया मला मार्गदर्शन कराल का?   – अनामिका

mp dr amol kolhe
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलण्यास विरोध- लढा उभारण्याचा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा इशारा
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी
Portfolio With Alpha
अल्फा पोर्टफोलिओ कसा तयार करायचा?
Suresh Dhas on Dhananjay Munde
Suresh Dhas : “मी धनंजय मुंडेंचा राजीनामा….”, अजित पवारांच्या भेटीनंतर काय म्हणाले सुरेश धस?
Tejswini Pandit
“लवकर बरं व्हायचं आहे”, तेजस्विनी पंडितला नेमकं झालंय तरी काय? पोस्टवर स्वप्नील जोशी, सिद्धार्थ जाधवने केल्या कमेंट्स
Ajit Pawar
Ajit Pawar : “तुम्ही मला मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात…”, अजित पवार भर सभेत संतापले, नेमकं काय घडलं?

निवृत्तीनंतरच्या काळामध्ये शिकणे व त्याचा वापर करणे हा एक रस्ता असतो. दुसरा रस्ता शिकणे व त्याचा समाजसेवेसाठी वापर करणे हा असतो. वुमेन एम्पॉवरमेंट वा महिला सबलीकरणमध्ये अनेक छोटे मोठे अभ्यासक्रम विविध विद्यापीठात उपलब्ध आहेत. भाषांतराची कामे चालू ठेवून यातील एखाद दुसरा कोर्स जर आपण पूर्ण केला तर एखाद्या समाजसेवी संस्थेबरोबर आपल्याला कामाच्या संधी मिळू शकतात. कोणाच्याही विषयांमध्ये आपण पीएचडी केली तर ती पूर्ण व्हायला जवळपास आपले सत्तरी उजाडेल. त्यातून नोकरी व अर्थार्जनाच्या शक्यता संपूर्णपणे वयामुळे संपतात. संपादनाची कामे भाषांतरित पुस्तके प्रसिद्ध करणारी संस्था देऊ शकते. त्यांचेशी संपर्क करावा. आपण दिलेल्या माहितीनुसार व व्यक्त केलेल्या इच्छेनुसार मी एवढेच सुचवू शकतो. जरूर एखादा रस्ता निवडावा. त्यासाठी माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा.

हेही वाचा >>> करिअर मंत्र

नमस्कार, सर मी दररोज आपल्या लोकसत्ता पेपर मधील करिअर वृत्तान्त मी वाचतो. आपल्या मार्गदर्शनामुळे  गोर गरीब विद्यार्थ्यांचे यूपीएससीमधून अधिकारी होणाची स्वप्न आहे आणि त्याची जी खडतर मार्ग आहे. तो या वृत्तान्तमुळे सोपा झाला आहे. त्या बद्दल मी आपले प्रथम आभार मानतो. सर सध्या मी बी.ए. प्रथम वर्षमध्ये माझे शिक्षण घेत आहे. माझे बीए प्रथम वर्षांचे विषय पुढील आहेत. राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इंग्रजी असे आहेत. सर मला १० वी मध्ये ८६ टक्के आहेत. १२ वी विज्ञान शाखेत झाले असून त्यात मला ५४ टक्के आहेत. सर मी ३ महिने झाले आहे. यूपीएससीची तयारी चालू केली आहे. सध्या मी फक्त एनसीआरटीईच वाचू की अन्य? सर मी यूपीएससीही हिंदी मीडियममधून देणार आहे. तर हिंदी भाषा कशी सुधारता येईल या विषयी आपले मार्गदर्शन करावे? – मंगेश पवार

तुझा सगळा प्रश्न नीट वाचला. सोप्या सोप्या शब्दात तुला सहज लक्षात येईल असे काही सांगत आहे. अमलात आणलेस तर खूप उपयोग होईल. निदान त्यावर गंभीरपणे विचार कर येत्या दिवाळीपर्यंत.

एक)   दहावीचे मार्क लवकरात लवकर विसरून जा.

दोन)   यूपीएससी द्यायची आहे हे आत्ता मनातून बाजूला ठेव.

तीन)   हिंदी मधून यूपीएससी देण्याचा विचार नक्की नको.

चार)   एनसीईआरटीची पुस्तके वाचणे मात्र चालू ठेव.

पाच) दररोज एक नवीन वृत्तपत्र अग्रलेखाकरता वाचणे व करिअर वृत्तांतचे नियमित वाचन हे सामान्य ज्ञान करता आवश्यक.

सहा) घसरलेले बारावीचे ५६ टक्के ६५ मध्ये रूपांतरित करण्याचे हवे. यथावकाश का यश मिळेल.

हेही वाचा >>> नोकरीची संधी

नमस्कार, मी यावर्षी दहावीला आहे. मला वाचनाची आवड आहे. मला इस्रो विषयी आवड आहे. त्यामुळे  माझे ध्येय शास्त्रज्ञ  बनणे आहे. परंतु घरची परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे मला माझ्या पुढील वाटचालीस मार्गदर्शन करावे.   – लक्ष्मण ढाकरगे

मी दहावीत आहे आणि मला वाचनाची आवड आहे, हे तुझे वाक्य. ज्या मिनिटाला मी शास्त्र विषयातील वाचन व अभ्यास सखोल करत आहे व त्याला गणिताची जोड देत आहे यात रूपांतरित होईल त्या मिनिटाला तुझी खरी वाटचाल सुरू होईल. प्रत्येक बाबतीत शास्त्रीय दृष्टीने का, कसे, कोठे, कोणी, कधी या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणारा चौकस विद्यार्थी या रस्त्याला सर्व अडचणींवर मात करतो. घरची परिस्थिती वगैरे गोष्टी आपोआप बाजूला राहतात. हुशारी, मार्क यापेक्षा अभ्यासातील चिकाटी आणि सातत्य याची अशा संशोधनासाठी गरज असते. बारावीत सायन्स घेऊन ६५ ते ७० टक्के मिळव. जमल्यास इंजिनिअरिंग, न जमल्यास एमएससी पूर्ण केल्यावर या रस्त्याची सुरुवात होते. चांद्रयानाच्या यशानंतर इस्रोमध्ये जाण्याच्या प्रश्नांचा ओघ सुरू होण्यापूर्वी त्याचे हे सविस्तर उत्तर देत आहे.

Story img Loader