विवेक वेलणकर
सध्या देशभरातील सरकारी अथवा खासगी शैक्षणिक संस्थामधील अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षांचा टप्पा हा पार करावाच लागतो. प्रत्येक अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश परीक्षांची पात्रता, अभ्यास, तारखा या वेगवेगळ्या असतात. त्याबद्दलची माहिती या सदरात दर पंधरा दिवसांनी…
पदवीनंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या शाखा म्हणजे एमबीए, एमसीए आणि लॉ. या प्रत्येक शाखेसाठी स्वतंत्र सीईटी महाराष्ट्र सरकार घेते, या तीनही सीईटींसंदर्भात माहिती घेऊ.
एमबीए सीईटी
मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतून किमान पन्नास टक्के गुण मिळवून पदवी उत्तीर्ण झालेल्या तसेच यंदा पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षात असणाऱ्या विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध आहे. या परीक्षेच्या गुणांवर विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील अनुदानित व विनाअनुदानित एमबीए संस्थांमध्ये प्रवेश मिळतो.
हेही वाचा >>> माझीस्पर्धा परीक्षा : प्रत्येकाने स्पर्धा परीक्षा देणे आवश्यक
यासाठी ९ व १० मार्च रोजी राज्यस्तरीय सीईटी परीक्षा होईल. परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार असून विद्यार्थ्यांना अडीच तासात दोनशे प्रश्न सोडवावे लागतात. यामध्ये लॉजिकल रीझनिंग ७५ प्रश्न, अॅबस्ट्रॅक्ट रीझनिंग २५ प्रश्न, अंकगणित ५० प्रश्न व इंग्रजी ५० प्रश्न असतील. परीक्षा ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची असते आणि चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा होत नाहीत. या परीक्षेसाठीचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने cetcell. mahacet. org/ cet या संकेतस्थळावर दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी आहे. या परीक्षेच्या मार्कांवर पुढील प्रवेश प्रक्रियेचे राऊंड होतील.
एमसीए सीईटी
मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतून किमान पन्नास टक्के गुण मिळवून पदवी उत्तीर्ण झालेल्या तसेच यंदा पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षात असणाऱ्या विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध आहे. १२ वी किंवा पदवी स्तरावर गणित हा विषय असणे महत्त्वाचे आहे. या परीक्षेच्या गुणांवर विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील अनुदानित व विनाअनुदानित एमसीए संस्थांमध्ये प्रवेश मिळतो.
हेही वाचा >>> महाविद्यालयांसाठी मोठी बातमी, नॅक मूल्यांकनातून आता श्रेणी पद्धत हद्दपार
यासाठी १४ मार्च रोजी राज्यस्तरीय सीईटी परीक्षा होईल. परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार असून विद्यार्थ्यांना नव्वद मिनिटांत दोनशे प्रश्न सोडवावे लागतात. यामध्ये लॉजिकल रीझनिंग /अॅबस्ट्रॅक्ट रीझनिंग ३० प्रश्न, गणित व संख्याशास्त्र ३० प्रश्न, इंग्रजी २० प्रश्न व कॉम्प्युटर कन्सेप्टसवर २० प्रश्न असतील. परीक्षा ऑब्जेक्टिव्ह स्वरुपाची असते आणि चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा होत नाहीत. या परीक्षेसाठीचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने cetcell. mahacet. org/ cet या संकेतस्थळावर दाखल करण्याची अंतिम तारीख १ फेब्रुवारी आहे. या परीक्षेच्या मार्कांवर पुढील प्रवेश प्रक्रियेचे राऊंड होतील.
लॉ सीईटी
मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतून किमान पंचेचाळीस टक्के गुण मिळवून पदवी उत्तीर्ण झालेल्या तसेच यंदा पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षात असणाऱ्या विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध आहे. या परीक्षेच्या गुणांवर विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील अनुदानित व विनाअनुदानित लॉ संस्थांमध्ये प्रवेश मिळतो. यासाठी १२ व १३ मार्च रोजी राज्यस्तरीय सीईटी परीक्षा होईल. परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार असून विद्यार्थ्यांना दोन तासात दीडशे प्रश्न सोडवावे लागतात. यामध्ये लॉजिकल रीझनिंग ३० प्रश्न, लीगल रीझनिंग ३० प्रश्न, सामान्यज्ञान ४० प्रश्न व इंग्रजी ५० प्रश्न असतील. परीक्षा ऑब्जेक्टिव्ह स्वरुपाची असते आणि चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा होत नाहीत. या परीक्षेसाठीचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी आहे. या परीक्षेच्या मार्कांवर पुढील प्रवेश प्रक्रियेचे राऊंड होतील.