किरण सबनीस
‘डिझाइन’ क्षेत्रात करिअर करण्यापूर्वी आपल्याला डिझाइन संस्थामध्ये कशाप्रकारे व कोणते विषय शिकवले जातात हे समजावून घेणे गरजेचे आहे. कारण डिझाइन शिक्षण हे पारंपरिक शिक्षणपेक्षा तुलनेने वेगळे आहे. यामध्ये ‘प्रयोगशील स्वशिक्षणावर’ (Project Based Self- Learning) अधिक भर दिला जातो. अशा प्रकारच्या शिक्षण पद्धतीला ‘अनुभवजन्य शिक्षण’ (experiential learning) असेही संबोधले जाते. अनुभवजन्य शिक्षणाची ढोबळ व्याख्या अशी की – प्रत्यक्ष कृतीचा अनुभव घेऊन त्यावर केलेल्या सखोल चिंतनातून व प्रयोगातून शिकणे.

प्रथम आपण ‘पारंपरिक शिक्षण’ व ‘अनुभवजन्य शिक्षण’ पद्धतीमधील फरक थोडक्यात समजावून घेऊ. पारंपरिक पद्धतीमध्ये शिक्षक स्वत:कडे असलेले व जोपासलेले ज्ञान, माहिती, अनुभव त्यांच्या विद्यार्थ्यांना संभाषणातून, नोट्स मधून व पाठयपुस्तकातून देत असतात, यामध्ये पाठयपुस्तकातील अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नोत्तरे विचारणे, विविध लेखी व तोंडी परीक्षा घेणे यावर भर दिला जातो. बऱ्याच अंशी पाठयपुस्तके किंवा संदर्भ पुस्तके यांच्या कक्षा ठरलेल्या असतात. यामध्ये प्रत्यक्ष प्रयोगातून शिकण्यापेक्षा सिद्धांत व त्याची तात्विक बाजू समजावून घेण्यासाठी विद्याथ्यांना मार्गदर्शन दिले जाते.

What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
Aditya Thackeray
इंडिया आघाडीला सत्ता मिळत नाही या वास्तवाचं भान दाखवणारी आदित्य ठाकरेंची पोस्ट, म्हणाले…
viagra tablet for dimensia
लैंगिक शक्ती वाढवणारी व्हायग्रा मेंदूसाठी ठरणार फायदेशीर? काय सांगतंय नवीन संशोधन?
loksatta editorial on ekanth shinde and ajit camps disappointment over the allocation of cabinet berths
अग्रलेख : उपयोगशून्यांची उपेक्षा!
Rahul Gandhi Lok Sabha Election Result 2024
‘पांढरा टी शर्ट घालण्याचं कारण काय?’ राहुल गांधींनी व्हिडीओ पोस्ट करत दिलं उत्तर; म्हणाले, “मला..”

‘अनुभवजन्य शिक्षण’ हे कसे भिन्न आहे यासाठी आपण त्याचा थोडा इतिहास समजावून घेऊ. १९७० च्या दशकात डेव्हिड कोल्ब (David Kolb) या अमेरिकन मानसशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ज्ञ व्यक्तीने ‘अनुभवजन्य शिक्षण’ पद्धतीचा सिद्धांत मांडला व त्याचे एक मॉडेल जगापुढे सादर केले. यामध्ये चार प्रमुख पैलू मांडले आहेत ते आपण उदाहरणांसाहित पाहूया.

प्रत्यक्ष अनुभव घेणे (Concrete Experience): यामध्ये विद्यार्थी किंवा विद्यार्थीगट एकत्र येऊन काही ठोस कृती स्वहस्ते करतात व त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतात. हे करताना त्यामध्ये मन, बुद्धी व शरीर यांचा सक्रिय सहभाग असतो. उदाहरणार्थ, समजा आपल्याला वृद्ध लोक व त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा अभ्यास करावयाचा असेल तर फक्त लेख वाचून, संदर्भ ग्रंथ अथवा पाठ्य पुस्तकांचा अभ्यास करून त्यांची संपूर्ण उकल होणार नाही. त्यासाठी अनेक वृद्ध लोकांशी बोलणे, संवाद साधणे, वृद्धाश्रमांना भेटी देणे, त्यांच्या बरोबर वेळ व्यतीत करणे – हा प्रत्यक्ष अनुभव घेणे, त्याचप्रमाणे त्यांच्या भावना, विचार, समस्या समजावून घेणे हा ‘अनुभवजन्य शिक्षणाचा’ एक पैलू ठरतो.

चिंतनात्मक निरीक्षण करणे (Reflective Observation): या पैलूंमध्ये स्वत: घेतलेल्या अनुभवावर अधिक समग्र चिंत्तन (reflection) केले जाते. उदाहरणार्थ, वृद्ध लोकांच्या समस्या तरुणांपेक्षा कशा वेगळ्या आहेत? त्या अजून कोणत्या प्रकारे समजावून घेता आल्या असत्या? वृद्ध लोकांना मनातल्या भावना अधिक योग्य प्रकारे व्यक्त करण्यासाठी काय करायला हवे होते? त्यांचे नात्यातील संबंध कसे अधिक चांगल्याप्रकारे वृद्धिंगत होऊ शकतील? या प्रक्रियेमध्ये चिंतन आणि निरीक्षणावर अधिक भर दिला जातो व त्याचप्रमाणे स्वत: घेतलेल्या अनुभवांची मीमांसा करून त्यात काय शिकले गेले यावर लक्ष केंद्रित केले जाते.

नावीन्यपूर्ण संकल्पना मांडणे (Abstract Conceptualization): या पैलूमध्ये विद्यार्थ्यांनी घेतलेल्या अनुभवांचा निरीक्षणातून निष्कर्ष काढणे, आलेल्या अनुभवांचे विविध अंगानी विश्लेषण करणे व त्यामध्ये समन्वय साधणे यांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे जमवलेली माहिती व उमजलेले ज्ञान यांचा तुलनात्मक अभ्यास केला जातो. उदा. बहुतांशी वृद्धांना कोणत्या अडचणी येत असतील? त्यामागची विविध करणे कोणती? त्या कारणांचे पृथक्करण करताना सामाजिक, कौटुंबिक, मानसिक, शारीरिक, सांस्कृतिक असे भाग करता येतील का? अशा प्रकारच्या समस्यांवर इतरत्र कसे उपाय केले आहेत? आपण कोणत्या नवीन संकल्पना मांडल्या पाहिजेत की ज्यामुळे या समस्यांवर पर्याय काढता येतील?

सक्रिय प्रयोग करणे (Active Fxperimentation): हा शेवटचा पैलू आहे, यामध्ये विद्यार्थी पहिल्या तीन टप्प्यात मिळवलेल्या अनुभवाचे, निरीक्षणाचे, चिंतनाचे व ज्ञानाचे परिवर्तन प्रत्यक्ष प्रयोगात व उपयोगात कसे आणायचे यावर काम करतो, त्याचप्रमाणे यात नवीन सुधारणा व दुरुस्त्या कशा करायच्या याचेही नियोजन करतो. अनुभवजन्य शिक्षण हे टप्प्या टप्प्याने केलेल्या सुधारणांच्या पुनरावृत्तीतून शिकण्यावर भर देते (Iterative Approach). या पैलूमध्ये केलेले प्रयोग हे वेगवेगळ्या संदर्भामध्ये (contextualization) व परिस्थितीमध्ये कसे परिणामकारक व समाविष्ट होतात हे पडताळून पहिले जाते. उदा. विविध शहरात राहणाऱ्या समविचारी वृद्ध लोकांना आभासी प्रकारे एकत्र भेटण्यासाठी (virtual meeting) सोप्पे तंत्रज्ञान वापरून एखादे साधन बनवता येईल का? वृद्ध लोकांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा शिक्षणात व समाजात उपयोग करण्यासाठी एखादी संस्था किंवा प्रणाली स्थापन करता येईल का? किंवा त्यांना फ्लॅटमधील हालचालीसाठी व स्वावलंबन वाढवण्यासाठी नावीन्यपूर्ण व्हीलचेअर बनवता येईल का? किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) वापरून काही त्यांना सदैव सोबत करणारी आभासी व्यक्ती तयार करता येईल का?

या चार पैलूंचा सुयोग्य मेळ हा डिझाइन मधील ‘अनुभवजन्य शिक्षणाचा’ गाभा आहे. जगभरातील अनेक डिझाइन शिक्षण संस्थामध्ये अशा पद्धतीचा थोड्याफार फरकाने अवलंब केला जातो. डिझाइन शिक्षणात ठराविक पाठ्यपुस्तके व साचेबद्ध अभ्यासक्रम नसतो, परंतु डिझाइनचे शिक्षण हे रोजच्या जीवनातील अनुभव, सभोवतालची सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय परिस्थिति व त्यातील होणारे बदल यांचा सजग व समग्र विचार यावर आधारित असते.

डिझाइन शिक्षणाचा भाग म्हणून विद्यार्थी खालील गोष्टी करतात –

नवनवीन तांत्रिक व औद्याोगिक क्षेत्रातील प्रकल्प (industry projects) घेतात आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात

वैविध्यपूर्ण पार्श्वभूमी (Interdisciplinary teams) असलेल्या लोकांशी एकत्र येऊन गट चर्चा (Group Discussions) करतात, अभ्यास सहलीत सहभागी होतात.

जगाला भेडसावणारे व समाजासाठी उपयुक्त (Social Impact) संशोधन प्रकल्प (Research Projects) हाती घेऊन त्यावर उपाय शोधण्यासाठी प्रकल्प करतात

सुट्टीच्या काळात सामाजिक किंवा औद्याोगिक संस्थांबरोबर उमेदवारी (Internship) करतात

वेगवेगळ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय डिझाइन स्पर्धांमध्ये सहभाग घेतात व त्यातील डिझाइन आव्हानांवर (Design Challenges) प्रकल्प करतात

अशा प्रकारे डिझाइनचे ‘अनुभवजन्य शिक्षण’ विद्यार्थ्यांना फक्त ‘डिझाइनर’ बनवत नाही, तर त्यांना चांगले विचार करणारे, वापरकर्त्यांच्या समस्या सोडवणारे आणि समाजासाठी उपयुक्त गोष्टी बनवणारे सजग आणि संवेदनशील नागरिक बनवते.