किरण सबनीस
‘डिझाइन’ क्षेत्रात करिअर करण्यापूर्वी आपल्याला डिझाइन संस्थामध्ये कशाप्रकारे व कोणते विषय शिकवले जातात हे समजावून घेणे गरजेचे आहे. कारण डिझाइन शिक्षण हे पारंपरिक शिक्षणपेक्षा तुलनेने वेगळे आहे. यामध्ये ‘प्रयोगशील स्वशिक्षणावर’ (Project Based Self- Learning) अधिक भर दिला जातो. अशा प्रकारच्या शिक्षण पद्धतीला ‘अनुभवजन्य शिक्षण’ (experiential learning) असेही संबोधले जाते. अनुभवजन्य शिक्षणाची ढोबळ व्याख्या अशी की – प्रत्यक्ष कृतीचा अनुभव घेऊन त्यावर केलेल्या सखोल चिंतनातून व प्रयोगातून शिकणे.

प्रथम आपण ‘पारंपरिक शिक्षण’ व ‘अनुभवजन्य शिक्षण’ पद्धतीमधील फरक थोडक्यात समजावून घेऊ. पारंपरिक पद्धतीमध्ये शिक्षक स्वत:कडे असलेले व जोपासलेले ज्ञान, माहिती, अनुभव त्यांच्या विद्यार्थ्यांना संभाषणातून, नोट्स मधून व पाठयपुस्तकातून देत असतात, यामध्ये पाठयपुस्तकातील अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नोत्तरे विचारणे, विविध लेखी व तोंडी परीक्षा घेणे यावर भर दिला जातो. बऱ्याच अंशी पाठयपुस्तके किंवा संदर्भ पुस्तके यांच्या कक्षा ठरलेल्या असतात. यामध्ये प्रत्यक्ष प्रयोगातून शिकण्यापेक्षा सिद्धांत व त्याची तात्विक बाजू समजावून घेण्यासाठी विद्याथ्यांना मार्गदर्शन दिले जाते.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Career design experiential learning design institute amy
First published on: 28-06-2024 at 08:24 IST