डॉ. श्रीराम गीत

मी शिक्षिका असून माझे एम.ए. हिंद झालेल आहे. मला पीएचडी करायची आहे. तर त्यासाठी मला कोण कोणत्या पुस्तकांचे अभ्यास करावा लागेल? मला मार्गदर्शन करावे. तो अभ्यास करत करत सेट/ नेट पण द्यायची इच्छा आहे

union minister pratap rao jadhav meet cm devendra fadnavis in buldhana
प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्र्याना दिला हा प्रस्ताव, फडणवीस म्हणाले नक्कीच विचार करू
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Santosh Deshmukh Murder Case
Devendra Fadnavis : संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा
Tejswini Pandit
“लवकर बरं व्हायचं आहे”, तेजस्विनी पंडितला नेमकं झालंय तरी काय? पोस्टवर स्वप्नील जोशी, सिद्धार्थ जाधवने केल्या कमेंट्स
assistant professor without NET-SET
सहायक प्राध्यापक होणे नेट-सेटशिवायही शक्य?
Loksatta lokrang Publisher obsessed with words
शब्द-सुरांत रमलेला प्रकाशक
Amitav ghosh,
बुकबातमी : लेखकाच्या सर्व छटा…
Maharashtra will continue to move forward with the thoughts of Warkaris says Devendra Fadnavis
महाराष्ट्र वारकऱ्यांच्या विचाराने पुढे जात राहील- देवेंद्र फडणवीस

दीपा गिरी

गिरी मॅडम आपल्या निमित्ताने पीएचडी बद्दलच्या अनेक गोष्टी मी ‘लोकसत्ता’च्या सर्व वाचकांसाठी सविस्तर देत आहे. सर्वप्रथम लक्षात घेण्याची बाब म्हणजे पीएचडी ही एक पदवी नसून संशोधन करण्याची पद्धती, शिकण्याची एक वृत्ती आहे. अनेकांना पीएचडी म्हणजेच आपल्या नावामागे डॉक्टर लागावे ही एक सुप्त इच्छा असते. काहींना व्यावसायिक प्रगतीसाठी, पदासाठीची गरज असते. उदाहरणार्थ ट्रेनिंगमध्ये असलेल्या व्यक्तींना मागे डॉक्टर असले तर उपयोगी होते. प्राध्यापक व प्राचार्य पदासाठी ती एक आवश्यक गरजेची बाब मानली जाते. पदवीला वा पदव्युत्तर पदवीला फस्र्ट क्लास नसेल तर डॉक्टरेट केल्यानंतरच एखाद्या महाविद्यालयामध्ये आपल्याला प्राध्यापक म्हणून कामाची शक्यता निर्माण होऊ शकते. अशा विविध कारणांकरिता पीएचडी करणाऱ्यांची एक मोठीच फौज शिकत राहते. आपल्याला पीएचडी का करायचे आहे? यावर विचार करणे गरजेचे राहील. कारण यासाठीचा किमान चार ते पाच लाखाचा खर्च व पाच वर्षांचा कालावधी व भरपूर वेळ देणे गरजेचे राहील. ते सारे माध्यमिक शिक्षिकेची जबाबदारी व संसारिक जबाबदारी पार पाडून शक्य आहे वा नाही यावरही आपण विचार करावा. सहसा प्रबंध लेखनाच्या वर्षांमध्ये रजा घेतात ते शक्य आहे वा नाही याचाही विचार करावा. सेट/ नेट परीक्षा देणे प्रथम गरजेचे आहे. अन्यथा एम.फिल करणे व त्यासाठीची प्रवेश परीक्षा देणे हे आपणास करावे लागेल. आपला एक प्रश्न पीएचडीसाठी कोणती पुस्तके वाचायला लागतात? असा कोणताही अभ्यासक्रम नसतो. पुस्तके नसतात. मात्र पीएचडी साठीचा विषय निवडणे व मार्गदर्शकाची निवड करणे व त्याने तुम्हाला विद्यार्थी म्हणून स्वीकारणे असे टप्पे असतात. आपण कोणत्याही विद्यापीठात जाऊन हिंदी विषयात पीएचडी केलेल्यांचे प्रबंध चाळावेत म्हणजे विषयाची व्याप्ती आपल्याला सहज कळेल. मग योग्य तो निर्णय घ्याल.

माझा मुलगा आता बारावीत आहे. दहावीमध्ये त्याला ९६टक्के मार्क्‍स मिळाले होते. त्याला डेटा सायन्समध्ये करियर करायची आहे. त्या संदर्भात मार्गदर्शन हवे आहे. डाटा सायन्सच्या पोस्ट ग्रॅज्युएशन करता इंजीनिअरिंगच करायला हवे का? ते ही आयआयटी वगैरे मोठय़ा इन्स्टिटय़ूट मधून? जर तिथे प्रवेश नाही मिळाला तर साध्या कॉलेजातून डिग्री घेऊन पुढचे मास्टर्स चांगल्या ठिकाणाहून करता येणे शक्य नाही का? इंजीनियरिंगऐवजी बीएस्सी काँप्युटर सायन्स वा आय टी चांगल्या कॉलेजातून १२ वीच्या मार्कावर आधारित केल्यास ते ही योग्य ठरू शकते का? कित्येक ठिकाणी अंडर ग्रॅज्युएट साठी डाटा सायन्स, एआय, एमएल वगैरे कोर्सेस आहेत. ते करणे योग्य आहे का? विषय तसा नवीन असल्याने त्यांच्याकडे खरोखरीच तसा टीचिंग स्टाफ व सुविधा असण्याची शक्यता आहे का? चांगल्या नामांकित कॉलेजात मिळाल्यास डायरेक्ट ते कोर्सेस करावेत की बेसिक डिग्री वेगळी असावी? कृपया मार्गदर्शन मिळावे.

– डॉ.नितीन मोरे

आपल्या प्रश्नाचे एकत्रित उत्तर मी येथे देत आहे. डेटा सायन्स ही मूलत: कॉम्प्युटर सायन्सची एक शाखा आहे असे म्हणायला हरकत नाही. काही इंजीनिअरिंग संस्थांमध्ये एआय, एमएल, डेटा सायन्स, डेटा अनालिटिक्स, बिग डेटा अशा विविध नावांनी नवीन नवीन कोर्सेस सुरू केलेले आहेत. कॉम्प्युटर क्षेत्रांमध्ये प्रथमत: नोकरी मिळणे हाच खूप मोठा अडथळा असतो. तो अडथळा दूर न झाल्यास मी काय शिकलो हे सगळेच्या सगळे निरर्थक ठरते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कॉम्प्युटर सायन्स व आयटी विषय घेऊन इंजीनिअर झालेल्या विद्यार्थ्यांपैकी जेमतेम दहा टक्के विद्यार्थ्यांना गेल्या तीन वर्षांत नोकऱ्या मिळाल्या आहेत. तरीही या वास्तवाकडे दुर्लक्ष करून साऱ्यांचा ओढा कॉम्प्युटर सायन्सकडे असतो. ज्याप्रमाणे दहावीला ८० टक्के पडले की आयआयटीचा क्लास लावायचा, जेईईची परीक्षा द्यायची तसाच काहीसा प्रकार येथे होत आहे. सीईटीमध्ये ९५ परसेंटाइल मार्क मिळवणे त्या मानाने सोपे असते. जेईईमध्ये ९५ परसेंटाइल मिळून सुद्धा फारसे काही हाती लागत नाही हे वास्तवसुद्धा लक्षात घेतले जात नाही. मुला मुलींची विनाकारण दमछाक होते व नैराश्य येते ते वेगळेच. आपलेच वाक्य घेऊन सांगायचे झाले तर असाध्य नाही पण कठीण आहे. नवीन स्वरूपाचा अभ्यासक्रम घेण्याऐवजी कॉम्प्युटर सायन्ससाठी उत्तम कॉलेजातून चांगल्या मार्काने पदवी मिळवणे हे ध्येय ठेवावे. केवळ डेटा सायन्सची पदवी घेऊन पुढची पदवी घेतली तरी नोकरीची शाश्वती नाही. त्यातील उमेदवारीचा काळ मोठा असू शकतो. थोडक्यात सारांशाने उत्तम कॉलेज म्हणजे जिथे कॅम्पस इंटरव्यू होतात असे घेऊन तेथे कॉम्प्युटर किंवा आयटीमधील पदवी तीही नऊ सीजीपी कायम राखून असेल तर मनातील व स्वप्नातील सर्व वाटा उघडतात.

Story img Loader