डॉ श्रीराम गीत

मुलांनी काही आगळं वेगळं करायचं ठरवलं की, अनेक कंगोरे एकदम टोकदारपणे समोर येतात. हे कंगोरे खरे किती, का खोटे याच वास्तव दाखवण्याचा हा आरसा’. सारं खरच छान चालले असले, तरी कमर्शियल पायलट बनण्याच्या मुलाच्या हट्टा पायी घर आणि देश तुटला. आणि मुलाने एवढे यश कमावूनही त्यामागची परिस्थिती पाहिली की यश असूनही, सगळे चांगले असूनही त्याच्या आईला आनंदापेक्षा विषादच अधिक.

prarthana behere shares emotional post as demise of her brother
“तू अचानक निघून गेलास…”, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची भावुक पोस्ट
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Schoolboy commits suicide after not getting mobile phone sangli
सांगली: मोबाईल न मिळाल्याने शाळकरी मुलाची आत्महत्या
death of young man walking with a Jain Sadhvi in accident
जैन साध्वी सोबत चालत जाणाऱ्या युवकाचा अपघाती मृत्यू
Interesting story of father-son relationship Shri Ganesha movie Milind Kavade
बापलेकाच्या नात्याची रंजक गोष्ट
Santosh Deshmukh Wife Crying
Santosh Deshmukh : संतोष देशमुख यांच्या पत्नीची साश्रू नयनांनी मागणी, “मुख्यमंत्र्यांनी..”
Santosh Deshmukh Murder Case
Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख यांच्या मुलीचा टाहो; “माझ्या वडिलांना जसं ठार केलं, तशीच कठोर शिक्षा…”
Inquiry into cases in Beed Parbhani through retired judges Nagpur news
बीड, परभणीतील प्रकरणांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा

खात्यापित्या सधन बागायतदाराची मी मुलगी. राहुरी जवळच आमच छोटे गाव. माझ्या जन्माच्या आसपास कृषी विद्यापीठाचा विस्तार सुरू झाला होता. माझे शेतकरी वडील तेव्हापासून मला कायम ऐकवत की आमची मुलगी स्वातीपण विद्यापीठात काम करेल. त्यांचे स्वप्न शब्दश: खरे झाले, पण मी विद्यापीठात फक्त ‘काम करीत’ राहिले. नवीन प्राध्यापक म्हणून दाखल झालेले देखणे अमर जगताप पगारा संदर्भात काहीतरी चौकशी करण्याकरता माझ्यासमोर आले. आणि नंतर काम नसताना सुद्धा मला भेटत राहिले. त्यांनी मला मागणी घालून माझे लग्न झाले आणि जवळच्या छोट्या गावातून मी राहुरीच्या विद्यापीठात कायमची दाखल झाले. यथावकाश मोठा माधव व धाकटा दत्ता अशी जोडी आमच्या घरात आली.

मुले चुणचुणीत असली तरी दोघांच्या स्वभावात खूप फरक होता. दत्ताचे सारे लक्ष अभ्यासात. पहिल्या तीनात नंबर शाळेत कसा राहील या एकुलत्या एक गोष्टीवर असायचे. प्राथमिक शाळा संपल्यानंतर दत्ताचा अभ्यास कधी मी घेतला आहे मला आठवत सुद्धा नाही. या उलट मोठ्या माधवचे. मारून मुटकून अभ्यासाला बसवायचे, वडिलांचा त्यासाठी ओरडा खायचा. हे कमी की काय म्हणून त्याला सातवीपासून गणिताची शिकवणी लावायला लागली. माधवचे एक वैशिष्ट्य म्हणजे डोक्यात एखादी गोष्ट बसली की ती मिळेपर्यंत त्याचा घोषा संपता संपत नसे. लहानपणी अशा एखाद्या हट्टापायी त्याने मारही खाल्ला होता. तरीही त्याचा हट्ट त्याने खराच करून दाखवला होता. दत्ता यात पडत नसे, पण आम्हाला दोघांना मात्र याचा बऱ्यापैकी त्रास होत होता.

हेही वाचा >>> MPSC ची तयारी : पर्यावरण भूगोल, अवकाशीय तंत्रज्ञान आणि सुदूर संवेदन    

मुलं लहान असतानाच अमरना एका प्रकल्पावर कामा करता ऑस्ट्रेलियामध्ये एक वर्ष जाण्याची संधी मिळाली. मुलं लहान होती म्हणून नाहीतर माझीही तिकडे वर्षभर जायची खूप इच्छा होती. सध्या सारखे पटकन फोन करण्याची सोय नसल्यामुळे महिन्यातून जेमतेम एकदा भलं मोठं बिल करून फोन व्हायचा. फोनवर बोलत असताना दर सेकंदाला किती रुपये उडले याचाच हिशोब संवादापेक्षा जास्त होत असे. पाहता पाहता तेही वर्ष संपले आणि आमची श्रीनगरची ट्रीपही त्याच्या खर्चातून झाली. तेव्हा माधवच्या डोक्यात विमान इतके घट्ट बसले असेल याची आम्हाला दोघांनाही कल्पना आली नाही. राहुरी कुठे आणि विमान कुठे? विसरेल शाळा संपली आणि कॉलेज सुरू झालं की, असे आमच्या मनात होते. पण माधवचा हट्टीपणा याबाबतीतही टोकाचा ठरला आणि साऱ्या घराची कायमची शांतता घालवून गेला.

तुला जेमतेम मार्क आहेत कॉमर्सला जा. असे शास्त्राचे प्राध्यापक असलेल्या वडिलांनी सांगूनही त्यांनी ऐकले नाही, तेव्हाच मला जरा भीती वाटली होती. दोन वर्ष अभ्यास तसा यथातथाच होता. बारावी निम्मी झाली असताना एकदा पुढे काय करणार हा विषय आला आणि जेव्हा त्याने सांगून टाकले बनलो तर कमर्शियल पायलट, नाही तर मी पुढे शिकणारच नाही. तेव्हा या प्रश्नाचे गांभीर्य अमरना चांगलेच जाणवले. बारावी सायन्सचा निकाल लागला. त्याचे जेमतेम मार्क पाहून या मुलाचे पुढे काय होणार असा प्रश्न आमच्या दोघांच्या मनात होता. भारतातील ३२ उडान अकॅडमी मध्ये माधवने अर्ज पाठवले. प्रत्येक ठिकाणी बारावीचे कमी मार्क आडवे येत होते. या साऱ्या प्रकरणात जून महिना संपत आला. अमरने त्याचे पुढे एक प्रस्ताव ठेवला. तू प्रथम बीएससीची पदवी हाती घे. मग त्यानंतर पुन्हा प्रयत्न कर. पण त्याने काहीही इतर शिकायला ठाम नकार दिला.

हेही वाचा >>> आयडीबीआय बँकेत नोकरीची संधी; महिन्याला पगार एक लाखांपेक्षा जास्त, जाणून घ्या कसा करायचा अर्ज

मी जरी प्राध्यापकाची बायको असले तरी एका सधन बागायतदाराची मुलगी होते. यावेळी माझे बाबा एक रात्रभर मुक्कामाला माझ्याकडे होते. ‘अगं माझ्या नातवाकरता जमिनीचा एक तुकडा विकून मी पन्नास लाख तुला देतो ना. माधव एकदा पायलट झाला की धोधो पैसे कमावेल. वाटलं मला परत दे. नाही दिलेस तरी काही बिघडणार नाही.’ एवढे सांगून दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करून ते परत गेले. वडिलांच्या बोलण्याच्या जोरावर पण त्यांचा उल्लेख न करता मी माधवची बाजू घेऊन अमरशी वाद घालायला सुरुवात केली. प्रश्न काय ५० लाखाचाच आहे ना, करू उभे आपण. घर गहाण टाकून सहज कर्ज मिळेल असेही माझ्या तोंडून गेले. मुलांच्या मागण्या पूर्ण करता येत नाहीत याने आधीच दुखावलेले अमर या गहाण टाकण्याच्या माझ्या मागणीला बळी पडले…

फरपट आयुष्याची

माधवची रवानगी ऑस्ट्रेलियाला झाली. पहिले वर्ष आनंदाचे व खूप आशा लावणारे होते. दुसऱ्या वर्षी कमर्शियल पायलट लायसन्स च्या परीक्षेत नापास झाल्यावर सुरू झालेली तारांबळ मात्र संपता संपली नाही. पुढचा सारा इतिहास आयुष्यात कधीच न विसरण्याजोगा आहे. कर्जाचे हप्ते थकू नयेत म्हणून घर विकून ते फेडले. अमरनी नंतर जणू काही माधव हे नाव टाकूनच दिले, आपल्याला एक मुलगा दत्ता असल्याप्रमाणे ते वागू लागले. सुदैवाने आमच्या दोघांच्या साऱ्या इच्छा आकांक्षा दत्ताने पूर्ण केल्या. मात्र, तो नोकरी लागल्यावर पुन्हा एकदा माझ्या पदरी घोर निराशा आली. त्याने अमेरिकन मुलीशी लग्न केल्याची बातमी मी ऐकली आणि जसे अमरनी माधवचे नाव टाकले होते, तसे दत्ता हे नाव पण माझ्या मनातून पुसले गेले. कोणी विचारले तर सांगण्यापुरते उरले. मैत्रिणी, नातेवाईक विचारतात मुलं काय करतात? मग सांगते एक युरोपात वैमानिक आहे, दुसरा अमेरिकेत नोकरी करतो. इथच माझे बोलणे संपते. (क्रमश:)

Story img Loader