सुहास पाटील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्टेट बँक ऑफ इंडिया, ‘ज्युनियर असोसिएटस (कस्टमर सपोर्ट अॅण्ड सेल्स)’ च्या एकूण ८,२८३ रेग्युलर पदांची भरती(अजा – १२८४, अज – ७४८, इमाव – १९१९, ईडब्ल्यूएस – ८१७, खुला – ३५१५, एकूण – ८२८३) (याशिवाय बॅकलॉगमधील एकूण रिक्त पदे ४९०. अजा – २३, अज – १०१, इमाव – १७, विकलांग – एचआय – २०, व्हीआय – ३३, एल्डी – १६, डी अॅण्ड ई – २३ आणि माजी सैनिक कॅटेगरीमध्ये एकूण २५७ पदे.) (माजी सैनिक (ESM – ९३, विकलांग माजी सैनिक/ माजी सैनिकांवर अवलंबून असलेल्या व्यक्ती (DESM) – १६४)) (Advt. No. CRPD/ CR/ 2023-24/27); महाराष्ट्र सर्कल/ मुंबई मेट्रोमध्ये एकूण १०० पदे भरावयाची आहेत. (अजा – १०, अज – ८, इमाव – २६, ईडब्ल्यूएस – १०, खुला – ४६).

कर्नाटक राज्यातील बेंगळूरु सर्कलमधील एकूण रिक्त पदे – ४५० (अजा – ७२, अज – ३१, इमाव – १२१, ईडब्ल्यूएस – ४५, खुला – १८१) आणि बॅकलॉगची पदे – अजा – १७, अज – २, इमाव – १३ (दिव्यांग कॅटेगरी VI – ३, HI – ३, LD – ३, D & E – २) माजी सैनिक – एकूण १४३ ESM – ७१/ DESM – ७२ (स्थानिय भाषा – कन्नड).

गुजरात राज्यातील अहमदाबाद सर्कलमधील एकूण रिक्त पदे ८२० (अजा – ५७, अज – १२३, इमाव – २२१, ईडब्ल्यूएस – ८२, खुला – ३३७) आणि बॅकलॉगची पदे – अज – ८२, (दिव्यांग – VI – ११, HI – १०, LD – ११, D & E – १० पदे), ESM – १८, DESM – ५४ (स्थानिय भाषा – गुजराती).

मध्यप्रदेश राज्यातील भोपाळ सर्कलमधील एकूण रिक्त पदे २८८ (अजा – ४३, अज – ५७, इमाव – ४३, ईडब्ल्यूएस – २८, खुला – ११७) आणि बॅकलॉगची पदे – अज – ९, अजा – ४, इमाव – १, (दिव्यांग – HI – १, LD – १, D & E – १), DESM – ३ (स्थानिय भाषा – हिंदी).

छत्तीसगड राज्यातील भोपाळ सर्कलमधील एकूण रिक्त पदे २१२ (अजा – २५, अज – ६७, इमाव – १२, ईडब्ल्यूएस – २१, खुला – ८७) आणि बॅकलॉगची पदे – अज – ३, (दिव्यांग – HI – १, LD – १, D & E – १), ESM – १, DESM – ५ (स्थानिय भाषा – हिंदी).

वयोमर्यादा : दि. १ एप्रिल २०२३ रोजी २० ते २८ वर्षे (इमाव – ३१ वर्षेपर्यंत, अजा/ अज – ३३ वर्षेपर्यंत, विकलांग – ३८/ ४१/ ४३ वर्षेपर्यंत) (विधवा/ परित्यक्ता महिलांसाठी खुला/ ईडब्ल्यूएस – ३५ वर्षे, इमाव – ३८ वर्षे, अजा/अज – ४० वर्षे).

पात्रता : दि. ३१ डिसेंबर २०२३ रोजी पदवी (कोणतीही शाखा) उत्तीर्ण.

दि. ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत ज्यांनी एसबीआयमधून अॅप्रेंटिसशिप यशस्वीरित्या पूर्ण केली आहे, त्यांना कमाल वयोमर्यादेत सूट – खुला/ ईडब्ल्यूएस – १ वर्ष, इमाव – ४ वर्षे, अजा/ अज – ६ वर्षे, दिव्यांग अजा/ अज – १६ वर्षे, दिव्यांग इमाव – १४ वर्षे, दिव्यांग खुला/ ईडब्ल्यूएस – १ वर्ष.

निवड पद्धती : ऑनलाइन टेस्ट – फेज-१ प्रीलिमिनरी एक्झाम – (जानेवारी २०२४ मध्ये घेण्यात येईल.) ऑब्जेक्टिव्ह टेस्ट – १०० गुणांसाठी वेळ १ तास. (इंग्लिश लँग्वेज – ३० प्रश्न, न्यूमरिकल अॅबिलिटी – ३५ प्रश्न, रिझनिंग अॅबिलिटी – ३५ प्रश्न, एकूण १०० प्रश्न) (प्रत्येक सेक्शनसाठी २० मिनिटांचा कालावधी असेल.)

फेज-२ मुख्य परीक्षा : फेब्रुवारी २०२४ मध्ये घेण्यात येईल. जनरल फिनान्शियल अवेअरनेस – ५० प्रश्न, ५० गुण, वेळ ३५ मिनिटे; जनरल इंग्लिश – ४० प्रश्न, ४० गुण, वेळ ३५ मिनिटे; क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड – ५० प्रश्न, ५० गुण, वेळ ४५ मिनिटे; रिझनिंग अॅबिलिटी अॅण्ड कॉम्प्युटर अॅप्टिट्यूड – ५० प्रश्न, ६० गुण, वेळ ४५ मिनिटे. एकूण १९० प्रश्न. एकूण २०० गुण, वेळ २ तास ४० मिनिटे. सर्व राज्यातील उमेदवारांसाठी परीक्षा हिंदी/इंग्रजी माध्यमातून आणि स्थानिय भाषेतून घेतली जाईल.

लँग्वेज टेस्ट : ऑनलाइन टेस्टमधून उत्तीर्ण उमेदवारांनी १० वी/१२ वी स्तरावर लोकल लँग्वेज अभ्यासलेली आहे, अशांना लँग्वेज टेस्ट द्यावी लागणार नाही. महाराष्ट्रासाठी स्थानिय भाषा मराठी आहे. गुजरातसाठी स्थानिय भाषा गुजराती आहे.

लँग्वेज टेस्टमधून पात्र ठरलेल्या उमेदवारांची रिक्त पदांच्या ५० टक्के राज्यनिहाय प्रतीक्षायादी बनविली जाईल. अंतिम निवड यादी मुख्य परीक्षेतील गुणवत्तेनुसार तयार केली जाईल. (प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी संबंधित प्रश्नाकरिता असलेल्या गुणांच्या १/४ गुण वजा केले जातील.)

पे-स्केल : सुरुवातीला बेसिक पे रु. १९,९००/- इतर भत्ते. क्लेरिकल कॅडरमधील उमेदवारांना अंदाजे वेतन दरमहा रु. ३७,०००/-.

प्री-एक्झामिनेशन ट्रेनिंग : स्टेट बँक ऑफ इंडिया ठराविक केंद्रांवर अजा/ अज/ इमाव/ माजी सैनिक/ अल्पसंख्यांक यांच्यासाठी प्री-एक्झामिनेशन ट्रेनिंग आयोजित करणार आहे. जे उमेदवार स्वखर्चाने प्री-एक्झामिनेशन ट्रेनिंग घेऊ इच्छितात, त्यांनी ऑनलाईन अर्ज करताना तसे नमूद करावे.

महाराष्ट्रातील परीक्षा केंद्र आणि प्री-एक्झामिनेशन ट्रेनिंग सेंटर : अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई / ठाणे/ नवी मुंबई/ MMR, नागपूर, नांदेड, नाशिक, रायगड, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर.

प्रोबेशन कालावधी : ज्युनियर असोसिएट्स पदांसाठी ६ महिन्यांचा प्रोबेशन कालावधी असेल. पूर्व परीक्षेच्या वेळी उमेदवारांसाठी कॉल लेटर्सवर परीक्षा केंद्रावरील स्टाफकडून स्टँप मारून उमेदवारांना परत केले जातील. जे त्यांनी मुख्य परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक असेल.

हेल्प डेस्क नंबर ०२२-२२८२०४२७ वर सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत संपर्क साधावा किंवा शंका समाधानासाठी http:// cgrs. ibps. in च्या ई-मेल आयडीवर मेल करावा. त्यावर सब्जेक्टमध्ये Recruitment of Junior Associates- 2023 असे लिहिणे आवश्यक. ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांनी फोटोग्राफ, सिग्नेचर, left hand thumb impression आणि अनेश्चर- II मध्ये दिलेल्या नमुन्यातील हँड रिटर्न डिक्लेरेशन, SBI Apprentice Certificate ( if applicable) स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक.

अर्जाचे शुल्क : रु. ७५०/- (अजा/ अज/ विकलांग/ माजी सैनिक यांना फी माफ). ऑनलाइन अर्ज https:// bank. sbi/ web/ careers/ current- openings किंवा https:// sbi. co. in/ careers/ current- opening या संकेतस्थळावर दि. ७ डिसेंबर २०२३ पर्यंत करावेत.

शिक्षणाची संधी

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे. (महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागांतर्गत स्वायत्त संस्था) मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीतील ज्या विद्यार्थ्यांनी सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पीएच.डी.) परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी ‘महाराजा सयाजीराव गायकवाड-सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना’ सन २०२३-२४ अंतर्गत रिक्त राहिलेल्या जागांसाठी विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. शाखानिहाय/ अभ्यासक्रमनिहाय शिष्यवृत्तीसाठी रिक्त जागांचा तपशील –

सदर शिष्यवृत्तीसाठी पात्रतेचे निकष :

(१) पदव्युत्तर पदवी/ पदविकेसाठी पदवी परीक्षेत, पीएच.डी.साठी पदव्युत्तर परीक्षेत किमान ७५ टक्के गुण आवश्यक.

(२) उमेदवार व उमेदवाराचे आई-वडील अथवा पालक भारताचे नागरिक तसेच महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असावेत.

(३) शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये प्रवेश घेतलेल्या व प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या परदेशातील शैक्षणिक संस्थेचे अद्यावत (सन २०२३) मधील दर ( Quacquarelli Symonds) World Ranking 200 च्या आत असावे.

(४) उमेदवाराच्या कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणारे मागील आर्थिक (सन २०२२-२३) एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. ८ लाखापेक्षा जास्त नसावे.

(५) परदेशी विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी GRE ( Graduate Record Examination), TOFEL ( Test of English as a Foreign Language) IELTS ( International English Language Testing System) प्रकारच्या परीक्षा जेथे अनिवार्य आहेत, त्या उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे.

कमाल वयोमर्यादा – पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ३५ वर्षे, पीएच्.डी. अभ्यासक्रमासाठी ४० वर्षे.

योजने अंतर्गत विद्यार्थ्यास मिळणारे लाभ – शिक्षण फी, परतीच्या प्रवासासह विमान प्रवास भाडे, निर्वाह भत्ता, वैयक्तिक आरोग्य विमा यावरील विद्यार्थ्याने केलेला प्रत्यक्ष खर्च इ. सर्व मिळून एका विद्यार्थ्यामागे पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या कालावधीसाठी प्रतीवर्षी रु. ३० लाखाच्या मर्यादेत तर पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या कालावधीसाठी रु. ४० लाखाच्या मर्यादेत शाखा/ अभ्यासक्रमनिहाय मार्गदर्शक तरतुदीनुसार परदेशी शिष्यवृत्ती अदा करण्यात येईल.

ऑनलाइन भरलेल्या अर्जाची मूळ प्रत, प्रमाणपत्रे त्यांच्या साक्षांकीत प्रती पडताळणीसाठी पुणे येथील सारथी मुख्यालयास दि. ५ डिसेंबर २०२३ पर्यंत (कार्यालयीन वेळेत) सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत सादर करावीत.

ऑनलाइन अर्ज https:// sarthi- maharashtragov. in/ या संकेतस्थळावर दि. २९ नोव्हेंबर २०२३ पर्यंत करावेत.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Career job opportunity state bank of india recruitment for junior associates posts amy
Show comments