सध्या माझे वय २२ वर्षे असून २०१७ साली इयत्ता दहावीमध्ये ९२, कला शाखेतून इयत्ता बारावीमध्ये ७८,बीए (संस्कृत) करून बीएड केले. डिस्टन्स लर्निंग या माध्यमातून एम.ए. (संस्कृत साहित्य) करतो आहे. सध्या शाळेत आणि खासगी क्लासमध्ये संस्कृत शिक्षकाची नोकरी करत आहे. अनुभवासाठी एक वर्ष नोकरी करून पुढे यूपीएससी परीक्षेची दिल्लीत जाऊन तयारी करण्याचे ठरवले आहे. त्याचे किमान २ प्रयत्न पूर्ण वेळ देऊन करेन आणि त्यातही यश नाही मिळालं तर तिसरा. त्याच्या पुढचे प्रयत्न एखाद्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करता करता करेन असा विचार आहे. यादरम्यान जर का केंद्र सरकार, राज्य सरकार मार्फत एखादी शिक्षक भरती निघाली तर तिथेही प्रयत्न असेलच. हा एक मार्ग डोक्यात आहे आणि दुसरा मार्ग म्हणजे खरतर शिक्षक म्हणून काम करायला मला आवडतं आहे. आंतरवासितेमध्येही तसेच सध्या शिक्षक म्हणून करत असलेल्या पहिल्या नोकरीत मी अनुभवतो आहे परंतु एकंदरीत भारतातील सध्याची परिस्थिती, कंत्राटी पद्धत पाहता शिक्षकांचे भविष्य थोडे अनिश्चित आहे असे वाटत आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेच्या ३-४ प्रयत्नांनंतर संस्कृत विषयातच शिक्षण असल्यामुळे जर्मनीमध्ये अध्यापनाच्या संधी मिळतील का त्याबद्दल विचार चालू आहे. भविष्याचा विचार करून पुढील महिन्यापासून जर्मन भाषा शिकायला सुरुवात करणार आहे. पण जर्मनीमध्ये संस्कृत अध्यापनाचा रस्ता नेमका कसा आहे, खरंच तिथे संस्कृत अध्यापनाच्या संधी उपलब्ध आहेत का याबद्दल काहीच कल्पना नाही. कृपया त्याबद्दल सांगावे.- सारंग

तुझी शैक्षणिक वाटचाल वाचली. पहिले ध्येय यूपीएससी, दुसरे शिक्षकी पेशातील सरकारी नोकरी, तिसरे जर्मनीत जाऊन संस्कृत शिकवणे. यूपीएस्सी हा प्रकार काय आहे हे समजून घे. त्यासाठी किमान एक वर्ष द्यावे लागेल. तो सगळा अभ्यास तुझ्या वाटचालीशी फारसा संबंधित नाही. वैकल्पिक विषय कोणता घ्यायचा याचा निर्णय त्यादरम्यान घेऊ शकतोस. त्यासाठी लागणारा खर्च, घरच्यांचा पाठिंबा, व किती वर्षे परीक्षा द्यायची या साऱ्या गोष्टींचा कागदावर आराखडा तयार करून मग सुरुवात करावीस. केंद्रीय विद्यालयासाठी किंवा नवोदय विद्यालयासाठी शिक्षकांची भरती केली जाते त्याच्या जाहिरातीवर लक्ष ठेवून त्या निवड प्रक्रियेत यश मिळाले तर तोही रस्ता चांगला आहे. जर्मनीत संस्कृत शिकवण्यासाठी उत्तम जर्मन येणे आवश्यक आहे. त्याकरता सहाव्या पातळीची मॅक्समुल्लर ची परीक्षा पास होणे गरजेचे राहील. कदाचित मॅक्समुल्लर मधून याचे मार्गदर्शन मिळू शकते किंवा डाड या जर्मन सरकारच्या माहिती देणाऱ्या संस्थेतून हे कळू शकेल. या वाटचालीमध्ये स्वत:चे मार्क कृपया विसरून जावे. याचे एकमेव कारण म्हणजे या तिन्ही पातळ्यांसाठी या स्वरूपाचा बायोडाटा असणे ही किमान गरज असते. स्पर्धा त्यांच्यातूनच सुरू होते व यश मिळते.

retail inflation rate at 5 22 percent in december
चलनवाढीचा दिलासा, पण बेताचाच! डिसेंबरमध्ये दर ५.२२ टक्के; चार महिन्यांच्या नीचांकी
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
AIIMS Recruitment 2025
AIIMS Recruitment 2025 : एम्समध्ये २२० पदांची भरती सुरू, MBBS व BDS उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; जाणून घ्या, कसा करावा अर्ज?
OBC Hostels, OBC , OBC Monthly Allowance ,
‘लाडक्या बहिणी’ तुपाशी, ओबीसी विद्यार्थी उपाशी, चार महिन्यांपासून…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Farmers climate smart friend Open source augmented reality headset
मुलाखतींच्या मुलाखत: शेतकऱ्यांचा ‘क्लायमेट स्मार्ट’ मित्र
stock market, fraud with citizen of Dombivli ,
शेअर मार्केटमधील २५ वर्ष अनुभव असलेल्या डोंबिवलीकराची ३१ लाखाची फसवणूक
Manufacturing sector growth rate low
निर्मिती क्षेत्राच्या वाढीचा दर १२ महिन्यांच्या तळाला, डिसेंबर २०२४ मध्ये ५६.४ गुणांकाची नोंद
Story img Loader