सध्या माझे वय २२ वर्षे असून २०१७ साली इयत्ता दहावीमध्ये ९२, कला शाखेतून इयत्ता बारावीमध्ये ७८,बीए (संस्कृत) करून बीएड केले. डिस्टन्स लर्निंग या माध्यमातून एम.ए. (संस्कृत साहित्य) करतो आहे. सध्या शाळेत आणि खासगी क्लासमध्ये संस्कृत शिक्षकाची नोकरी करत आहे. अनुभवासाठी एक वर्ष नोकरी करून पुढे यूपीएससी परीक्षेची दिल्लीत जाऊन तयारी करण्याचे ठरवले आहे. त्याचे किमान २ प्रयत्न पूर्ण वेळ देऊन करेन आणि त्यातही यश नाही मिळालं तर तिसरा. त्याच्या पुढचे प्रयत्न एखाद्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करता करता करेन असा विचार आहे. यादरम्यान जर का केंद्र सरकार, राज्य सरकार मार्फत एखादी शिक्षक भरती निघाली तर तिथेही प्रयत्न असेलच. हा एक मार्ग डोक्यात आहे आणि दुसरा मार्ग म्हणजे खरतर शिक्षक म्हणून काम करायला मला आवडतं आहे. आंतरवासितेमध्येही तसेच सध्या शिक्षक म्हणून करत असलेल्या पहिल्या नोकरीत मी अनुभवतो आहे परंतु एकंदरीत भारतातील सध्याची परिस्थिती, कंत्राटी पद्धत पाहता शिक्षकांचे भविष्य थोडे अनिश्चित आहे असे वाटत आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेच्या ३-४ प्रयत्नांनंतर संस्कृत विषयातच शिक्षण असल्यामुळे जर्मनीमध्ये अध्यापनाच्या संधी मिळतील का त्याबद्दल विचार चालू आहे. भविष्याचा विचार करून पुढील महिन्यापासून जर्मन भाषा शिकायला सुरुवात करणार आहे. पण जर्मनीमध्ये संस्कृत अध्यापनाचा रस्ता नेमका कसा आहे, खरंच तिथे संस्कृत अध्यापनाच्या संधी उपलब्ध आहेत का याबद्दल काहीच कल्पना नाही. कृपया त्याबद्दल सांगावे.- सारंग
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा