डॉ. श्रीराम गीत
मी बीएस्सी आयटी करून स्पर्धा परीक्षा, राज्यसेवा तयारी करत होतो. २०२२ मधे एसटीआय ७ मार्काने गेली. २०२२-मेन्स आणि आत्ता तलाठीसाठीची परीक्षा दिली. आता आयटीमध्ये परत यायचा विचार करून मित्राच्या सांगण्यावरून २ महिने मित्राने पाठवेली तयारी यू-टय़ूबवरून करतोय. मित्राच्या ओळखीने उमेदवारी करणार आहे. मित्र तिथे गेली ५ वर्षे डॉट नेट डेव्हलपमेंट मध्ये आहे. जिकडे मिळेल तिकडे नोकरी करायचं ठरवल आहे. घरची परिस्थिती बेताची होती आता बिकट झाली मी मोठा मुलगा आहे आणि लहान बहीण १२ वीला. सध्या कशी तयारी करू? पुढे कुठे नोकरी करू? आपले मार्गदर्शन लाभले तर फार बरे होईल. – मंगेश गायकवाड.
मंगेश, एक महत्त्वाचं वाक्य लक्षात ठेवायचं, हातचे सोडून पळत्याचे मागे लागू नये. आत्ताचे तुमचे वय २८ आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तुमचे वय अजून दहा वर्षांनी वाढले तरी सुद्धा बिघडत नाही. घरची परिस्थिती बिघडत चाललेली असताना काहीही न मिळवता मी स्पर्धा परीक्षांची तयारी करतो हा खूप चुकीचा रस्ता ठरतो. घरची जबाबदारी घ्यायची की नाही हा नंतरचा मुद्दा. पण स्व खर्चाचे दर महिना लागणारे पैसे मिळवणे हे तुमचे पहिले ध्येय राहील. मी कोणाचाही क्लास न लावता तीन प्रयत्न केले व मोजक्या मार्काने अ-यशस्वी झालो हे म्हणणे पण खूप चुकीचे आहे. एकेक मार्काला किमान शंभर उमेदवार मागे पडतात. वरवर पाहता माझे फक्त सात मार्क कमी पडले असे मानसिक समाधान आपल्याला चुकीच्या रस्त्याला नेते. म्हणून हा उल्लेख आपल्याला आवडत नसला तरी करत आहे.
सध्या आयटीमध्ये प्रवेश करणे सोपे नाही. मिळाला तर फारच उत्तम. तेथील नोकरीसाठीच्या गरजा आणि तुमची पदवी यात सध्या फार तफावत आहे. म्हणून यू टय़ूब वरून प्रशिक्षण करणे थांबवले तर उत्तम. मात्र उत्तम कॉम्प्युटर वापरणारा, इंग्रजी जाणणारा, काम शिकण्याची तयारी असणारा पदवीधर सहाय्यक या कामासाठी अनेक क्षेत्रात गरजेचा असतो. त्या स्वरूपाच्या नोकरीचा शोध घ्या. महिना दहा हजार ते वीस हजार या दरम्यान पगार मिळू शकेल. तीन वर्षे नोकरी केल्यानंतर वाटल्यास पुन्हा स्पर्धा परीक्षा करता नोकरी चालू ठेवून प्रयत्न करू शकता.
मी लोकसत्तामधील तुमचे मार्गदर्शन वाचतो. माझी मुलगी आहे. तिला मी २०२० नंतर बेंगळूरुमध्ये बीएस्सी (नर्सिग) साठी पाठवले. तिला १२ वी मध्ये पीसीबीमध्ये सरासरी गुण होते, पण तिचे इंग्रजी विषयात ७९ गुण होते. पुढील वर्षी ती नर्सिगचा अभ्यासक्रम पूर्ण करणार आहे. मला विचारायचे आहे की बीएस्सी नंतर तिच्यासाठी आणखी कोणते कोर्स उपलब्ध आहेत. जर तिने कॉलेजमध्ये नर्सिग प्रोफेसर म्हणून काम करायचे ठरवले तर कोणते कोर्स अनिवार्य आहेत? किंवा इतर कोणतेही क्षेत्र? तिचे दहावीपर्यंतचे शिक्षण कॉन्व्हेंट शाळेत झाले.- अरिफ सय्यद
कॉलेजमध्ये शिकवण्यासाठी मास्टर्स कम्प्लीट करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. तो कोर्स कठीणही आहे. आयसीयुमधील अनुभव जर घेतला तर मोठय़ा कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये चांगल्या पगाराचे काम मिळू शकते. त्या अनुभवानंतर परदेशी काम करण्याच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. अन्यथा जीएनएम कोर्ससाठी व्याख्याता म्हणून त्यांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. खरे तर पुढे काय करायचे यावर विचारपूर्वक निर्णय एक वर्ष अनुभव घेतल्यावर तिने स्वत: घेतला तर उत्तम.