जिल्हा नाशिकची रहिवासी आहे. माझे १२वी पर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेले आहे. मला १० वीत ८७.४० तसेच १२वी वाणिज्य शाखेमध्ये ७६.३३ गुण मिळालेले आहेत. नवीन शैक्षणिक धोरणानुसार सीईटीत ९१.६० परसेंटाइल जुलै २०२४ मध्ये मिळवून पास झालेली आहे. आता मला बीबीए (आय बी) करण्याची इच्छा आहे. बीबीए पूर्वी तीन वर्षांचे तर आता चार वर्षांचे झाले आहे. बीबीएनंतर पुढे एमबीए आयआयएममधून देखील करण्याची इच्छा आहे. तर आता माझ्यासमोर दोन पर्याय आहेत. ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षात कॅट परीक्षा देणे व नामांकित आयआयएममध्ये प्रवेश मिळवून पोस्ट ग्रॅज्युएशनची संधी मिळवणे आणि बीवायके कॉलेज ऑफ कॉमर्स नाशिकमध्ये करणे. दुसरा मार्ग आत्ताच बारावी झाल्यानंतर परीक्षा देऊन फक्त आयआयएम इंदोरचा पर्याय निवडून आय आय एम इंदोरमध्ये ५ वर्षांची संधी मिळवणे. या दोन्ही पर्यायातून कोणता पर्याय माझ्यासाठी योग्य असेल याबाबत मार्गदर्शन करावे. – प्रेरणा जोशी
नाशिकमध्ये बीकॉम करत असताना कॅटची तयारी तीन वर्षे करणे हा सगळ्यात सोयीचा आणि नक्की शक्य असलेला उपाय आहे. इंदूरच्या पाच वर्षाच्या इंटिग्रेटेड कोर्स करता तुला प्रवेश परीक्षा द्यायला हरकत नाही, तिथे प्रवेश मिळाला तर जावे. अन्यथा बीबीए (आयबी) करण्यात तुझ्या प्लॅन प्रमाणे अर्थ नाही. या सर्व प्रवेश परीक्षांसाठी दहावी व बारावीचे गणित खूप महत्त्वाचे असते हे लक्षात घ्यावे.