डॉ. श्रीराम गीत

माझा सोनगाव, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी इथे जन्म आणि इथेच शिक्षण. १० वी सेमी इंग्लिश ८९ टक्के, १२वी कॉमर्स ८९ टक्के २०२२ मध्ये बी.कॉम. ९.६७ सीजीपी. सीएफए प्रथम सेमिस्टर परीक्षा मे २०२३ ला दिली. रिझल्ट लागायचा आहे. मी फक्त क्लास करून शिकू की बाकी सेमिस्टर पूर्ण करताना एखादी त्याच क्षेत्रातील नोकरी करू? नोकरी न करता शिक्षण पूर्ण करण्यास वडील समर्थ आहेत. तसेच हे पूर्ण केल्यानंतर असणाऱ्या संधी याबद्दल देखील सांगा. तुमच्या मार्गदर्शनाची वाट पाहते. – अदिती बामणे

CET registration, students, Ticket facility, CET ,
सीईटी नोंदणीदरम्यान विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘तिकीट सुविधा’
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
upsc exam preparation tips,
यूपीएससीची तयारी : सीसॅट पेपर
OBC Hostels, OBC , OBC Monthly Allowance ,
‘लाडक्या बहिणी’ तुपाशी, ओबीसी विद्यार्थी उपाशी, चार महिन्यांपासून…
online exam for post of Clerk and Constable of Cooperative Bank canceled due to technical glitches
चंद्रपूर : परीक्षार्थ्यांना ऑनलाइन उत्तरपत्रिका मिळताच जिल्हा बँकेचे संचालक मंडळ अस्वस्थ; भरती प्रक्रिया…
graduates Phd Mumbai University, Mumbai University,
मुंबई विद्यापीठातून यंदा ४०१ स्नातकांना पी.एचडी, मुंबई विद्यापीठाचा मंगळवारी पदवी प्रदान सोहळा
nagpur university indicate of increase in examination fees during the senate meeting
विद्यापीठाच्या परीक्षा शुल्कात मोठी वाढ होणार,विद्यार्थ्यांवर भूर्दंडाची ही आहेत कारणे
mpsc exam result list announced social welfare category
वादात सापडलेल्या एमपीएससीच्या या परीक्षेची उत्तरतालिक जाहीर, हरकतीसाठी मुदत…

तुझी शैक्षणिक प्रगती सगळी चांगली आहे. तुझा प्रश्न आहे की सीएफए करत असताना नोकरी करू का फक्त अभ्यास करू त्यासाठी क्लासची गरज पडेल का या सगळय़ाचे उत्तर होकारार्थी आहे. म्हणजेच मिळेल ती पार्ट टाइम-फुल टाइम नोकरी करत व क्लासेस शनिवारी करत सीएफएस अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. कारण मुख्यत: हा अभ्यासक्रम अनुभवावर आधारित असल्याने कामाशी संबंधित गोष्टी शिकायला मिळतात. जसे सीए करत असताना आर्टिकलशिप अनुभव घेणे अत्यावश्यक असते तसेच फायनान्स क्षेत्रातील व अकाउंटिंगमधील अनुभवाचा फायदा होतो. क्लासमध्ये परीक्षेचे तंत्र शिकवले जाते त्याचाही उपयोग होतो. नंतर फायनान्स मॅनेजमेंटमधे कामे सुरू होतात.

आपले रोजचे मार्गदर्शन मी वाचत असते. गोंधळलेल्या मनस्थितीत निश्चितच त्याची फार मोठी मदत होते. खूप खूप आभार. माझी मुलगी यंदा १० वी ला आहे. तिचे ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण कायम असून गणितात पैकीच्या पैकी गुण घेणारी आहे. तिलाही इंजीनिअरींग करावयाचे असून याच मार्गाने जावे का याबाबत मार्गदर्शन करावे. ११वी, १२वी आणि प्रवेश परीक्षेला लागणारी मेहनत डिप्लोमाच्या अभ्यासात घेतली तर? हा माझा विचार योग्य आहे का? याबाबत दिशा दाखवावी. डिप्लोमाला प्रवेश घेताना कॉम्प्युटरचा आणि एआयचा अट्टाहास असावा का? पुढे इंजीनिअिरग झाल्यावर नोकरीच्या संधी कशात जास्त आहेत किंवा मिळेल त्यात प्रवेश घेऊन वेगवेगळे कोर्सेस करून आयटी क्षेत्रात जावे? माझ्या मुलींसाठी हा प्रश्न आहे. एक डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्समध्ये करते आहे आणि दुसरी यंदा १० वी ला आहे. तिलाही इंजीनिअिरगच करायचे आहे. – मनिषा हजारे

आपण करियरमंत्रमधील प्रश्नोत्तरे रोज वाचता याबद्दल धन्यवाद. डिप्लोमा करून इंजीनिअिरग करताना फक्त एकच काळजी घेण्याची गरज असते ती म्हणजे इयत्ता बारावीचे गणित आपण शिकलेलो नसतो. त्याची वैयक्तिकरित्या तयारी करणे. ती केली तर इंजीनिअिरगच्या पदवीच्या दुसऱ्या वर्षांचे विषय सुटतात, सोपे जातात. आपल्या प्रश्नातील एक भाग म्हणजे डिप्लोमाला कॉम्प्युटर सायन्स/ आयटी असे काही विषय घेऊन पदवीकडे जावे काय? महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिप्लोमामध्ये कॉम्प्युटर सायन्स करून पदवीला जाण्यासाठी चांगले कॉलेज मिळणे खूप महत्त्वाचे असते. त्यासाठीचा कट ऑफ ८८ ते ९५ टक्के च्या दरम्यान गेली चार-पाच वर्षे राहत आहे. चांगले कॉलेज मिळाले नाही तर नोकरीच्या संधी उपलब्ध नाहीत. या उलट मोठय़ा मुलीसारखे आपण इलेक्ट्रॉनिक्स हा विषय डिप्लोमासाठी निवडलात तर त्यानंतर त्याच विषयात पदवी घेऊन आयटीत प्रवेश करणे तिला सहज शक्य होईल. बारावीनंतर प्रवेशाची मनातील धांदल, अकरावी, बारावीसाठीच्या क्लासेसचा प्रचंड खर्च व मनावरील दडपण जाऊन अभ्यासाला थेट सुरुवात हे डिप्लोमाचे काही मोजके फायदे नक्कीच आहेत. सर्वात मोठा फायदा म्हणजे शाखेची निवड सुरुवातीलाच करता येते. कॉम्प्युटर सायन्स व आयटीचा आग्रह न धरता इंजीनिअिरगमधील विषय निवडल्यास डिप्लोमाचा रस्ता यशाकडे नेतो. आपण मांडलेल्या विचार योग्य आहे.

मला दहावीला चांगले मार्क होते. बारावी ते कमी झाले पण बीएस्सी ऑरगॅनिक केमिस्ट्री व एमएस्सी पूर्ण केले. त्यात ६५ टक्के मिळाले. एअर फोर्स व शॉर्ट सर्विस कमिशन यासाठी प्रयत्न करत आहे. थोडक्यात दोन-तीन मार्काने यश हुकत आहे. सध्या माझे वय २३ आहे. काय करावे? अन्य नोकरीत जावे काय? – सागर लोहार.

एअर फोर्स किंवा शॉर्ट सर्विस कमिशन दोन्हीच्या लेखी परीक्षेतून निवड झाली तरी एसएसबी इंटरव्यू नावाचा खडतर प्रकार बाकी असतो. पाच दिवस चालणाऱ्या त्या प्रकारातून तावून सुलाखून निवड होणे याचे यशापयशाबद्दल कोणीही सांगू शकत नाही. तुझ्या वयानुसार अजून एखाद दुसरा प्रयत्न करणे शक्य असल्यास तो करावा अन्यथा नोकरीचा शोध घेणे हे श्रेयस्कर ठरेल. केमिस्ट्री विषयात द्वि पदवीधर झालेल्या व्यक्तींना विविध स्वरूपाची केमिकल व पेंट कारखान्यामध्ये कामे उपलब्ध असतात. त्याचीही माहिती घ्यावीस.

Story img Loader