डॉ. मिलिंद आपटे

सर, मी सद्या शासकीय कृषी महाविद्यालय येथे शिक्षण घेतोय. मी प्रथम वर्षात शिकत आहे. मला एमपीएससी परीक्षा द्यायची आहे तर मी केव्हापासून व कसा अभ्यास सुरू करायला पाहिजे? की ही पदवी सोडून देऊन दुसऱ्या कोणत्या पदवीसाठी प्रवेश घेऊ?

– श्रीधर बोडके

– सद्या शासकीय कृषी महाविद्यालय येथे शिक्षण घेतोय ते उत्तम आहे त्या मध्ये कोणताही बदल करण्याची आवश्यकता नाही, एमपीएससीच्या परीक्षेची तयारी ही एक प्रोसेस आहे, त्यामध्ये चौफेर वाचन आवश्यक आहे. तसेच सर्वात प्रथम राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमाचे सखोल वाचन करावे. दर्जेदार अध्ययन साहित्य जमवणे, अभ्यास नियोजन, पाठांतर, सराव प्रश्नपत्रिका सोडवणे. केवळ बाजारात उपलब्ध असलेल्या गाइड्सवर अवलंबून न राहता विषयांची संदर्भ पुस्तके मुळातून वाचली पाहिजेत. जसे विज्ञान, भूगोल या विषयांसाठी आठवी ते दहावीपर्यंतच्या शालेय पाठ्यपुस्तकांचे वाचन इ. तसेच निवड झालेल्या उमेदवारांच्या मार्गदर्शनानुसार संदर्भ पुस्तके खरेदी केल्यास ते अधिक उपयुक्त ठरते.

– डॉ. मिलिंद आपटे

मला यूपीएससी द्यायची आहे, सध्या माझी आयटीआयवर माझगाव डॉक शिप बिल्डरमध्ये इंटर्नशिप सुरू आहे आणि ग्रॅज्युएशन बीएससी मध्ये पहिल्या वर्षाला शिकत आहे . तर मी सध्या वेळेत यूपीएससी अभ्यास कसा आणि ऑप्शन कोणता निवडू , मला यूपीएससी मराठीतून द्यायची आहे तर शक्य आहे का?

– कार्तिक बोटेवाड

– अभ्यासक्रम समजून घे पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या यूपीएससी अभ्यासक्रमाशी परिचित होणे हे गरजेचे आहे. यामुळे कोणत्या विषयांवर लक्ष केंद्रित करायचे हे कळेल आणि व्यर्थ बाबींवर वेळ वाया घालवण्याचे टाळता येईल. इतिहास, भूगोल, राजकारण, अर्थव्यवस्था, पर्यावरण, सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडी यासह प्रत्येक विषयासाठी मानक पाठ्यपुस्तके, संदर्भ पुस्तके आणि यूपीएससी अभ्यास साहित्य गोळा कर.

दररोज एक विश्वासार्ह वर्तमानपत्र वाचण्यास सुरुवात कर आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांसाठी मासिक चालू घडामोडी मासिके वाच. सुरुवातीस फक्त बातम्या वाच. संपादकीय वाचणे टाळा, भारतीय राजकारण आणि अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया तयार करण्यासाठी मूलभूत पुस्तकांपासून सुरुवात कर. इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र यासारख्या विषयांसाठी एनसीईआरटीची पाठ्यपुस्तके (सहावी ते बारावी) वाच, कारण ती एक भक्कम पाया प्रदान करतात.

ऑप्शन कोणता निवडावा याचे उत्तर म्हणजे वरील वाचन बऱ्यापैकी झाल्यावर तुलाच त्यातील एक विषय निवडताना मदत होईल. कारण हे विषय आवडीवर अवलंबून आहेत ४८ विषयांमधून तुला निवडायचे आहे , पण कोणत्या पर्याय विषयामधील यशस्वी होण्याचे प्रमाण जास्त आहे याचा विचार करावास. परीक्षा मराठीतून देता येते. शुभेच्छा.

careerloksatta@gmail.com