GNM नर्सिंग डिप्लोमा करून करिअर करावयाचे आहे. ठाणे जिह्यातील महिलांना सौ. मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था, ठाणे (ठाणे महानगरपालिका अंतर्गत, इंडियन नर्सिंग काऊन्सिल व महाराष्ट्र शुश्रुषा व परावैद्याक शिक्षण मंडळ मान्यताप्राप्त संस्था) मध्ये जनरल नर्सिंग व मिडवायफरी प्रशिक्षण (GNM) करिता ३० जागांवर शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी फक्त महिला उमेदवारांना प्रवेश. पात्रता – १२ वी परीक्षा किमान ४० टक्के गुणांसह उत्तीर्ण. विज्ञान शाखेच्या (पीसीबी ग्रुप विषयासह) उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
वयोमर्यादा : दि. ३१ जुलै २०२४ रोजी १७ वर्षे पूर्ण.
प्रवेशासाठी एकूण जागा : ३० -१५ जागा ठाणे महानगरपालिका क्षेत्र व १५ जागा ठाणे जिह्यामध्ये कमीत कमी १५ वर्षे रहिवास असलेल्या उमेदवारांसाठी आहेत. तसेच उमेदवाराने १० वीची परीक्षा ठाणे महानगरपालिका व ठाणे, पालघर जिल्हा हद्दीतील शासनमान्य संस्थेतून उत्तीर्ण असणे बंधनकारक.
हेही वाचा >>> UPSC ची तयारी : भूगोल (सामान्य अध्ययन)
प्रवेश अर्ज मिळण्याचे ठिकाण : सौ. मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था, बी-विंग, राजीव गांधी वैद्याकीय महाविद्यालय हॉस्टेल बिल्डींग, हंसनगर, खोपट, ठाणे (प.)
प्रवेश अर्ज स्वीकृतीचा दिनांक व वेळ :- २५ जून २०२४
प्रारूप गुणवत्ता यादी प्रसारण : दि. २ जुलै २०२४ संध्याकाळी ४.०० वाजता संस्थेच्या आवारात प्रसिद्ध केली जाईल.
प्रारूप गुणवत्ता यादीविषयी लेखी आक्षेप स्वीकृती : दि. ३ ते ४ जुलै २०२४ संध्याकाळी ४.०० वाजेपर्यंत.
प्रत्यक्ष मुलाखतीचा दिनांक – १२ जुलै २०२४ सकाळी ८.०० वाजल्यापासून.
निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसारण : २५ जुलै २०२४ संध्या. ४.०० वाजता संस्थेच्या आवारात प्रसिद्ध केली जाईल.
निवड यादी प्रवेश : २६ जुलै ते ३१ जुलै २०२४ सायं. ४.०० वाजेपर्यंत (शासकीय सुट्टीचे दिवस सोडून).
प्रतिक्षा यादी प्रवेश – दि. १ ऑगस्ट २०२४ सकाळी १०.३० वाजेपासून. निवड झालेल्या उमेदवारांनी दि. ३१ जुलै २०२४ संध्याकाळी ४.०० वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.
www.thanecity.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा.