GNM नर्सिंग डिप्लोमा करून करिअर करावयाचे आहे. ठाणे जिह्यातील महिलांना सौ. मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था, ठाणे (ठाणे महानगरपालिका अंतर्गत, इंडियन नर्सिंग काऊन्सिल व महाराष्ट्र शुश्रुषा व परावैद्याक शिक्षण मंडळ मान्यताप्राप्त संस्था) मध्ये जनरल नर्सिंग व मिडवायफरी प्रशिक्षण (GNM) करिता ३० जागांवर शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी फक्त महिला उमेदवारांना प्रवेश. पात्रता – १२ वी परीक्षा किमान ४० टक्के गुणांसह उत्तीर्ण. विज्ञान शाखेच्या (पीसीबी ग्रुप विषयासह) उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वयोमर्यादा : दि. ३१ जुलै २०२४ रोजी १७ वर्षे पूर्ण.

प्रवेशासाठी एकूण जागा : ३० -१५ जागा ठाणे महानगरपालिका क्षेत्र व १५ जागा ठाणे जिह्यामध्ये कमीत कमी १५ वर्षे रहिवास असलेल्या उमेदवारांसाठी आहेत. तसेच उमेदवाराने १० वीची परीक्षा ठाणे महानगरपालिका व ठाणे, पालघर जिल्हा हद्दीतील शासनमान्य संस्थेतून उत्तीर्ण असणे बंधनकारक.

हेही वाचा >>> UPSC ची तयारी : भूगोल (सामान्य अध्ययन)

प्रवेश अर्ज मिळण्याचे ठिकाण : सौ. मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था, बी-विंग, राजीव गांधी वैद्याकीय महाविद्यालय हॉस्टेल बिल्डींग, हंसनगर, खोपट, ठाणे (प.)

प्रवेश अर्ज स्वीकृतीचा दिनांक व वेळ :- २५ जून २०२४

प्रारूप गुणवत्ता यादी प्रसारण : दि. २ जुलै २०२४ संध्याकाळी ४.०० वाजता संस्थेच्या आवारात प्रसिद्ध केली जाईल.

प्रारूप गुणवत्ता यादीविषयी लेखी आक्षेप स्वीकृती : दि. ३ ते ४ जुलै २०२४ संध्याकाळी ४.०० वाजेपर्यंत.

प्रत्यक्ष मुलाखतीचा दिनांक – १२ जुलै २०२४ सकाळी ८.०० वाजल्यापासून.

निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसारण : २५ जुलै २०२४ संध्या. ४.०० वाजता संस्थेच्या आवारात प्रसिद्ध केली जाईल.

निवड यादी प्रवेश : २६ जुलै ते ३१ जुलै २०२४ सायं. ४.०० वाजेपर्यंत (शासकीय सुट्टीचे दिवस सोडून).

प्रतिक्षा यादी प्रवेश – दि. १ ऑगस्ट २०२४ सकाळी १०.३० वाजेपासून. निवड झालेल्या उमेदवारांनी दि. ३१ जुलै २०२४ संध्याकाळी ४.०० वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.

www.thanecity.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Career opportunities diploma in nursing course zws