इंडियन आर्मीमध्ये अविवाहित पुरुष व अविवाहित महिला लॉ ग्रॅज्युएट्सना शॉर्ट सर्व्हिस कमिशन ‘जज अॅडव्होकेट जनरल ब्रँच’ ( JAG Entry Scheme tu th Course ( January २०२५)) साठी प्रवेश. रिक्त पदे – पुरुष – ५, महिला – ५. पात्रता – एलएल.बी. पदवी किमान सरासरी ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि CLAT PG-२०२४ स्कोअर सर्व उमेदवारांसाठी अनिवार्य आहे ( LL. M. उत्तीर्ण आणि LL. M. परीक्षेस बसलेल्या उमेदवारांनासुद्धा). उमेदवार बार काऊंसिलकडे रजिस्ट्रेशन करण्यास पात्र असावा.
वयोमर्यादा – दि. १ जानेवारी २०२५ रोजी २१ ते २७ वर्षे. (उमेदवाराचा जन्म २ जानेवारी १९९८ ते १ जानेवारी २००४ दरम्यानचा असावा.)
निवड पद्धती – शॉर्ट लिस्ट केलेल्या उमेदवारांना ई-मेल द्वारा अलाहाबाद, भोपाळ, बंगलोर आणि जालंदर यापैकी एक परीक्षा केंद्र अलॉटमेंट कळविली जाईल.
त्यानंतर उमेदवारांनी इंडियन आर्मीच्या वेबसाईटवर लॉगइन करून एसएसबीची तारीख (प्रथम येणाऱ्यास प्रथम पसंती) निवडावयाची आहे. एसएसबी इंटरह्यूचे स्टेज-१ उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवारांना स्टेज-२ साठी पाठविले जाईल. एस्एस्बी इंटरह्यूचा कालावधी ५ दिवसांचा असेल. त्यानंतर निवडलेल्या उमेदवारांची वैद्याकीय तपासणी केली जाईल.
हेही वाचा : UPSC ची तयारी : भारताचे संविधान (भाग ३)
कार्यकाळ – शॉर्ट सर्व्हिस कमिशन १४ वर्षांसाठी असेल. सुरुवातीला १० वर्षे जो आणखीन ४ वर्षांनी वाढविला जाऊ शकतो. १० वर्षांच्या कमिशननंतर ऑफिसर्सना परमनंट कमिशन मिळविता येईल.
ट्रेनिंग – निवडलेल्या उमेदवारांना ४९ आठवड्यांचे प्री-कमिशनिंग ट्रेनिंग ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी (OTA) चेन्नई येथे दिले जाईल. प्री-कमिशनिंग ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिफेन्स मॅनेजमेंट अँड स्ट्रटेजिक स्टडीज’ हा डिप्लोमा मद्रास विद्यापीठाकडून दिला जाईल. अर्ज केल्याच्या दिनांकानंतर लग्न केलेले उमेदवार निवड झाली असले तरी ते ट्रेनिंगसाठी अपात्र ठरतील. ट्रेनिंग दरम्यान लग्न केल्यास उमेदवारांना परत पाठविले जाईल. जेंटलमेन आणि लेडी कॅडेट्सना ट्रेनिंग दरम्यान रु. ५६,१००/- दरमहा स्टायपेंड दिले जाईल. ट्रेनिंग दरम्यानच्या देय भत्त्यांची थकबाकी कॅडेट्सना ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर दिली जाईल.
प्रबोशन – निवडलेले उमेदवार ६ महिन्यांच्या प्रोबेशनवर असतील. उमेदवारांना १ कोटी रुपयांचा विमा संरक्षण असेल.
प्रमोशन – ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर उमेदवारांना लेफ्टनंट पदावर कमिशन दिले जाईल. त्यानंतर २ वर्षांनी कॅप्टन पदावर, ६ वर्षांच्या सेवा काळानंतर मेजर पदावर पदोन्नती दिली जाईल.
वेतन – दरमहा रु. ५६,१००/- (पे-लेव्हल – १०) रु. १५,५००/- मिलिटरी सर्व्हिस पे इतर भत्ते. अंदाजे रु. १.२५ लाख.
ऑनलाइन अर्ज www. joinindianarmy. nic. in या संकेतस्थळावर दि. १३ ऑगस्ट २०२४ (१५.०० वाजे) पर्यंत करावेत. ( Officer Entry Appln/ Login & gt; Registration & gt; Apply Online & gt; Officers Selection & gt; Eligibility & gt; Apply Short Service Commission JAG Entry Course)
हेही वाचा : Success Story: योगा मॅटपासून के फिटनेस प्रोडक्ट्सपर्यंत, ‘या’ उद्योजकाने दोन वर्षांत केली ३० कोटींची उलाढाल
शंकासमाधानासाठी www. joinindianarmy. nic. in या संकेतस्थळावर k Feedback/ Queriesl ऑप्शन उपलब्ध आहे.
आवाहन
यूपीएससी द्यायची आहे. तर मनात हजारो प्रश्न उभे राहतात. मार्गदर्शनाची गरज भासते. अर्थात प्रश्न तिथे उत्तरही असतेच, करिअरशी निगडित देशातील सर्वोच्च परीक्षांविषयीच्या शंकांचे निरसन होईल, असे एकच ठिकाण म्हणजे करिअर वृत्तांतमधील करिअर मंत्र. म्हणूनच विद्यार्थ्यांनो, लेखणी उचला आणि प्रश्न विचारा. प्रश्न विचारताना आवश्यक तेथे आपली शैक्षणिक, वैयक्तिक माहिती सविस्तर लिहावी. जेणे करून योग्य प्रकारे शंका समाधान होईल. आमचा ई-पत्ता : careerloksatta@gmail. com