रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड्स, रेल्वे मंत्रालय (सीईएन नं. ०३/२०२४) देशभरातील २१ RRBs मधील पुढील एकूण ७,९५१ पदांची भरती.

(१) ज्युनियर इंजिनिअर (JE)/डेपो मटेरियल सुपरिटेंडंट (DMS)/ केमिकल अँड मेटॅलर्जिकल असिस्टंट (CMA) – ७,९३४ पदे.

Recruitment of various posts in the State Government Service of the State Public Service Commission MPSC
एमपीएससीच्या तेवीस परीक्षांसाठी पुन्हा अर्जाची संधी, तुम्ही अर्ज केला नसेल तर…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
students failed in 5th and 8th standard in maharashtra
राज्यात पाचवी, आठवीचे किती विद्यार्थी अनुत्तीर्ण?
Nagpur Mahanagarapalika Bharti 2025: total 245 vacancy available for these posts Nagpur Mahanagarpalika Bharti Form Apply
नागपूर महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; १ लाख २२ हजारांपर्यंत मिळणार पगार; जाणून घ्या अर्ज कसा करायचा?
Decision to increase maximum age limit by one year for recruitment to various posts of MPSC
‘एमपीएससी’ : ‘या’ परीक्षांसाठी नव्याने अर्जाची संधी, परीक्षेच्या तारखेतही बदल…
Chandrapur district bank loksatta news
चंद्रपूर जिल्हा बँक नोकर भरती : एका जागेसाठी ४० लाख दर; आमदाराचा विधानसभेत आरोप
IAF Agniveervayu Recruitment 2025 Notification out at agnipathvayu cdac in registration begins on January 7
IAF Agniveervayu Recruitment 2024: भारतीय हवाई दलात नोकरीची संधी! अग्निवीर वायू पदासाठी होणार भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया
MPSC recruitment age limit increased by one year Mumbai news
‘एमपीएससी’च्या भरती वयोमर्यादेत एक वर्षाची वाढ; लाखो उमेदवारांना सरकारचा दिलासा

(२) केमिकल सुपरवायझर/ रिसर्च अँड मेटॅलर्जिकल सुपरवायझर (रिसर्च) – १७ पदे. (फक्त RRB गोरखपूरकरिता)
RRB नुसार आणि रेल्वे झोननुसार उपलब्ध असलेली रिक्त पदे ‘ Annexure- B’ मध्ये दिलेली आहेत.
रिक्त पदांचा तपशील आरआरबी झोननुसार पुढीलप्रमाणे :

(१) आरआरबी, मुंबई – १,३७७ पदे (मध्य रेल्वे/ पश्चिम रेल्वे).

(२) आरआरबी, अहमदाबाद – ३८२ पदे (पश्चिम रेल्वे).

(३) आरआरबी, सिकंदराबाद – ७८९ पदे (दक्षिण मध्य रेल्वे/ ईस्ट कोस्ट रेल्वे).

(४) आरआरबी, बिलासपूर – ४७२ पदे (मध्य रेल्वे/ दक्षिण पूर्व मध्य रेल्वे).

(५) आरआरबी, भोपाळ – ४८५ पदे (पश्चिम रेल्वे/ पश्चिम मध्य रेल्वे).

(६) आरआरबी, बंगलोर – ३९७ पदे (दक्षिण पश्चिम रेल्वे/ रेल व्हिल फॅक्टरी) आणि इ.

कॅटेगरी क्रमांकानुसार आरआरबी, मुंबईमधील रिक्त पदांचा तपशील –

(३) जे.ई./ इलेक्ट्रिकल/ डिझाईन अँड ड्राईंग – म.रे. – ४०, प.रे. – ४.

(४) जे.ई./ इलेक्ट्रिकल/ जनरल सर्व्हिसेस – म.रे. – ३५, प.रे. – २६, SCR – ६.

(५) जे.ई./ इलेक्ट्रिकल/ टीआरएस – म.रे. – ४०, प.रे. – ५१.

(७) जे.ई./ इलेक्ट्रिकल/ टीआरडी – म.रे. – ५३, प.रे. – २५, SCR – १२.

(८) जे.ई./ इलेक्ट्रिकल/ वर्कशॉप – म.रे. ३०, प.रे. १८.
पद कॅटेगरी ३ ते ५, ७ व ८ साठी पात्रता : (दि. २८ ऑगस्ट २०२४ रोजी) इलेक्ट्रिकल अँड अलाईड इंजिनीअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण.

(९) ज्युनियर इंजिनिअर(जे.ई.)/ पी.वे. अँड ब्रिज – मध्य रेल्वे (म.रे.) १४१, पश्चिम रेल्वे (प.रे.) ३८.

(१०) जे.ई./ सिव्हिल/ डिझाइन ड्रॉईंग अँड इस्टिमेशन – म.रे. ९०, प.रे. ३३.

(१२) जे.ई. वर्क्स अँड रिसर्च – म.रे. १०३, प.रे. १४.

(१४) जे.ई./ सिव्हिल वर्कशॉप – म.रे. ९.
पद कॅटेगरी क्र. ९, १०, १२ व १४ साठी पात्रता : सिव्हिल अँड अलाईड इंजिनीअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण.

(१५) जे.ई./ ट्रक मशिन – म.रे. ३८, प.रे. ८२.

(१६) जे.ई./ कॅरेज अँड वेगॉन – म.रे. २५, प.रे. १५, द.म.रे. ८.

(१७) जे.ई./ मेकॅनिकल/ डिझाईन अँड वर्कशॉप – म.रे. ८८, प.रे. ५३.

(१८) जे.ई./ डिझेल मेकॅनिकल – म.रे. १५, प.रे. २.

(२४) जे.ई./ डिझेल इलेक्ट्रिकल (मेकॅनिकल) म.रे. ६, प.रे. १.
पद कॅटेगरी क्र. १५ ते १८ व २४ साठी पात्रता : मेकॅनिकल/ मॅन्युफॅक्चरिंग/ मशिनिंग/ ऑटोमोबाइल/प्रोडक्शन/ मेकॅट्रॉनिक्स/ इंडस्ट्रियल/ टूल्स अँड डायमेकिंग/ टूल्स अँड मशिनिंग इंजिनीअरिंग अँड अलाईड डिप्लोमा उत्तीर्ण.

(२६) जे.ई./ एस अँड टी/ डिझाईन अँड ड्रॉईंग – म.रे. २२, प.रे. १६.

(२९) जे.ई./ एस् अँड टी/ सिग्नल – म.रे. २४, प.रे. १२.

(२८) जे.ई./ एस अँड टी/टेलीकम्युनिकेशन – म.रे. ८, प.रे. १४.

(३१) जे.ई./ एस अँड टी/ वर्कशॉप – म.रे. १.
पद कॅटेगरी २६, २८, २९, व ३१ साठी पात्रता : इलेक्ट्रॉनिक्स/ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी/ कम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/ इन्स्ट्रूमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनीअरिंग अँड अलाईड इंजिनीअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण.

(३२) डेपो मटेरियल सुपरिटेंडंट (स्टोअर्स) म.रे. १२५, प.रे. २.
पात्रता : इंजिनीअरिंग डिप्लोमा (कोणत्याही शाखेतील) उत्तीर्ण.

(२३) केमिकल अँड मेटॅलर्जिकल असिस्टंट – म.रे. ३७, प.रे. १५.

पात्रता : बी.एस्सी. (केमिस्ट्री आणि फिजिक्स विषयांसह) उत्तीर्ण.

मेडिकल फिटनेस : उमेदवार ज्या पदासाठी अर्ज करू इच्छितात त्या पदांसाठी ‘ Annexure- A’ मध्ये विहीत वैद्याकीय मानक (Medical Standards) पूर्ण करतात की नाही ह्याची खात्री करून घ्यावी.

वेतन श्रेणी : (i) JE/ DMS/ CMA पदांसाठी पे-लेव्हल – ६, मूळ वेतन रु. ३५,४००/-, अंदाजे वेतन दरमहा रु. ६८,०००/-.
(ii) केमिकल सुपरवायझर (रिसर्च) आणि मेटॅलर्जिकल सुपरवायझर (रिसर्च) पदांसाठी पे-लेव्हल – ७, मूळ वेतन रु. ४४,९००/-, अंदाजे वेतन दरमहा रु. ८४,८००/-.

आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग (EBC) साठी उमेदवाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. ५०,०००/- पेक्षा कमी असावे आणि त्यांना ‘ Annexure- IIIA’ मध्ये विहीत नमुन्यातील दाखला सादर करावा लागेल. (तहसीलदार किंवा त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱयाने जारी केलेला) किंवा BPL कार्ड सादर करावा.

निवड पद्धती : स्टेज-१ – कॉम्प्युटर बेस्ड् टेस्ट (सीबीटी), स्टेज-२ सीबीटी, आणि कागदपत्र पडताळणी/वैद्याकिय तपासणी.

परीक्षेचे माध्यम : CBT मधील प्रश्न हिंदी /इंग्रजीसोबत १३ रिजनल लँग्वेजेस (जसे की मराठी, गुजराती, कोंकणी इ.) मध्ये दिले जातील. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करताना १३ रिजनल लँग्वेजेसपैकी एक भाषा निवडायची आहे.

उमेदवारांना परीक्षा केंद्राच्या शहराचे नाव परीक्षेपूर्वी १० दिवस अगोदर कळविले जाईल. ई-कॉल लेटर CBT परीक्षा दिनांकाच्या ४ दिवस अगोदर RRB वेबसाईटवर उपलब्ध करून दिले जाईल. त्यांना तसे ई-मेल आणि SMS द्वारे कळविले जाईल.

स्टेज-१ सीबीटी (सर्व पदांसाठी कॉमन टेस्ट) कालावधी – ९० मिनिटे. एकूण १०० गुण/ १०० प्रश्न (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे) (मॅथेमॅटिक्स – ३० प्रश्न, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग – २५ प्रश्न, जनरल अवेअरनेस – १५ प्रश्न, जनरल सायन्स – ३० प्रश्न).

स्टेज-२ सीबीटी – स्टेज-१ सीबीटीतील कामगिरीवर आधारित स्टेज-२ सीबीटीसाठी उमेदवार निवडले जातील. स्टेज-२ सीबीटी कालावधी – १२० मिनिटे – १५० प्रश्न/ १५० गुण (जनरल अवेअरनेस/ १५ प्रश्न, फिजिक्स अँड केमिस्ट्री – १५ प्रश्न, बेसिक्स ऑफ कॉम्पयुटर्स अॅप्लिकेशन्स – १० प्रश्न, बेसिक्स ऑफ एर्व्हिरॉनमेंट अँड पोल्युशन कंट्रोल – १० प्रश्न, टेक्निकल अॅबिलिटीज – १०० प्रश्न)

चुकीच्या उत्तरासाठी प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/३ गुण वजा केले जातील. स्टेज-२ – सीबीटीसाठी उमेदवारांना कॉम्प्युटरवर Virtual कॅलक्युलेटर उपलब्ध असेल.

(स्टेज-२ सीबीटीसाठी पात्रतेनुसार एक्झाम ग्रुप बनविले आहेत.) ग्रुप-१ मेकॅनिकल अँड अलाईड इंजिनीअरिंग, ग्रुप-२ इलेक्ट्रिकल अँड अलाईड इंजिनीअरिंग, ग्रुप-३ इलेक्ट्रॉनिक्स अँड अलाईड इंजिनीअरिंग (यात कॉम्प्युटर सायन्स/आयटी यांचा समावेश) ग्रुप-४ सिव्हील अँड अलाईड इंजिनीअरिंग.

ग्रुप-५ – सीएमए (बीएस्सी केमिस्ट्री/ फिजिक्स). ग्रुप-६ – केमिकल टेक्नॉलॉजी/ मेटॅलर्जिकल इंजिनीअरिंग पदवी. (केमिकल अँड मेटॅलर्जिकल सुपरवायझर) प्रत्येक ग्रुपसाठीचा अभ्यासक्रम जाहिरातीत अनेक्स्चर- VIIA मध्ये दिलेला आहे.

वयोमर्यादा : (दि. १ जानेवारी २०२५ रोजी) १८ ते ३३(३६) वर्षे (इमाव – ३६(३९) वर्षे, अजा/ अज – ३९(४१) वर्षे, दिव्यांग – ४३/ ४६/ ४८ (४६/ ४९/ ५१) वर्षे). (३ वर्षांची रेल्वेमधील सेवा केलेले उमेदवार – खुला/ ईडब्ल्यूएस – ४० वर्षे, इमाव – ४३ वर्षे, अजा/ अज – ४५ वर्षे.) (विधवा, घटस्फोटीत, कायद्याने विभक्त पुनर्विवाह न केलेल्या महिला – खुला/ ईडब्ल्यूएस – ३५ वर्षे, इमाव – ३८ वर्षे, अजा/अज – ४० वर्षे.)

कोविड-१९ पॅनडेमिकमुळे रेल्वे रिक्रूटमेंटला मुकलेल्या उमेदवारांचे वय कमाल वयोमर्यादेच्या पुढे गेले असल्यास त्यांना फक्त या जाहिरातीकरिता कमाल वयोमर्यादेत ३ वर्षांची सूट देण्यात आली आहे.

परीक्षा शुल्क : (१) रु. ५००/- (जे उमेदवार स्टेज-१ सीबीटीला बसतील, त्यांना रु. ४००/- बँकिंग चार्जेस वगळता परत केले जातील.) (२) अजा/ अज/ माजी सैनिक/ दिव्यांग/ महिला/ ट्रान्सजेंडर/ अल्पसंख्यांक/ आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग (ईबीटी) यांना रु. २५०/- (जे उमेदवार स्टेज-१ सीबीटीला बसतील त्यांना रु. २५०/- बँकिंग चार्जेस वगळता परत केले जातील.) भरलेल्या परीक्षा शुल्काचा परतावा मिळविण्यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात आपल्या बॅंकेचे नाव, खातेधारकाचे नाव, खाते क्रमांक आणि IFSC कोड भरावयाचे आहे.

सर्व पदांसाठी फक्त एकच अर्ज करावयाचा आहे. एकापेक्षा अधिक RRBs मध्ये अर्ज केल्यास सर्व अर्ज बाद ठरविले जातील. निवडलेल्या RRB मधील रिक्त पदांसाठी उमेदवारांनी आपला पसंतीक्रम ऑनलाइन अर्जात नोंदणे आवश्यक.
अर्जात काही बदल/ सुधारणा करावयाची असेल तर आवश्यक ती मॉडिफिकेशन फी भरून ‘ Modification Window for Correction’ दि. ३० ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०२४ पर्यंत उपलब्ध असेल. (ऑनलाइन अर्ज करताना create an Account मध्ये भरलेली माहिती आणि (Chosen RRB) मध्ये बदल करता येणार नाही.)

ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांना ‘ Create an Account’ असे सूचित केले जाईल, तर उमेदवारांनी २०२४ मध्ये जाहीर झालेल्या CENs नुसार ‘ Account Create’ केलेले असेल तर त्यांना तीच Credintials लॉगइन करताना वापरता येतील.
शंकासमाधानासाठी हेल्पलाईन फोन नं. ९५९२००११८८, ०१७२५६५३३३३; ई-मेल – rrb. help@csc. gov. in
ऑनलाइन अर्जासोबत उमेदवाराचा साधी पांढरी पार्श्वभूमीवर काढलेला पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटोग्राफ आणि उमेदवाराची सही (JPEG image size ३०-७० KB), अपलोड करणे आवश्यक. उमेदवाराकडे पुढील भरती प्रक्रियेवेळी ऑनलाइन अर्जासोबत अपलोड केलेल्या फोटोग्राफच्या १२ प्रती असणे आवश्यक.

अजा/अजच्या उमेदवारांना ई-कॉल लेटर सोबत मोफत रेल्वे प्रवास पास मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्जासोबत अजा/ अज सर्टिफिकेट (Pdf format upto ५०० KB) अपलोड करणे आवश्यक.

उमेदवार ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी देशभरातील कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) ची मदत घेवू शकतात. CSC ची यादी http://www.csc.gov.in या वेबसाईटवर (https:// findmycsc.nic.in/csc/) या लिंकवर उपलब्ध आहे.

उमेदवारांनी फक्त एकच एक्झाम ग्रुप ऑप्ट करावयाचा आहे. आपल्या पसंतीचे आरआरबी मंडळ निवडून त्या मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज दि. २९ ऑगस्ट २०२४ (२३.५९ वाजे)पर्यंत करावा. उदा. आरआरबी, मुंबई -www.rrbmumbai.gov.in; आरआरबी, अहमदाबाद – http://www.rrbahmedabad.gov.in

Story img Loader