Success Story of Sandeep Aggarwal: भारतातील उद्योजक क्षेत्रात अलीकडे मोठी क्रांती होत आहे. ही भारतीय तरुणांची जिद्द, आवड व मानसिकता आहे; जी २१ व्या शतकातील अर्थव्यवस्थेत इतिहास घडवत आहे. आजकाल तरुण स्टार्टअप्स, व्यवसाय करण्यासाठी आपणहून पुढाकार घेत असले तरी उद्योजक क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी जीवनातील अनुभव तुम्हाला खूप मोठी मदत करतो. असाच अनुभव गाठीशी घेऊन प्रसिद्ध उद्योजक म्हणजे संदीप अग्रवाल यांनी Shopclues आणि Droom या दोन स्टार्टअप्सची यशस्वी सुरुवात केली आणि आता संदीप अग्रवाल जगातील सर्वांत प्रभावशाली उद्योजकांपैकी एक आहेत.
जुलै २०११ मध्ये संदीप अग्रवाल यांनी Shopcluesची स्थापना केली. Shopclues चं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना जवळपास चार वर्षं लागली. त्यानंतर एप्रिल २०१४ मध्ये अग्रवाल यांनी Droom ची स्थापना केली. यादरम्यान त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
व्यवसायापूर्वीचे शिक्षण
शाळेनंतर अग्रवाल यांनी बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदवी आणि इंदूरमधून पदव्युत्तर पदवी मिळवली. मास्टर्स करताना त्यांनी कोटक महिंद्रा, मुंबई येथे इंटर्नशिपदेखील केली.
व्यावसायिक जगतातील पहिले पाऊल
१९९५ मध्ये कोटक महिंद्रा येथे इंटर्नशिप केल्यावर त्यांनी पहिल्यांदा व्यावसायिक जगात पाऊल ठेवलं. या मुंबईतील इंटर्नशिपमध्ये त्यांना अनेक लोकांशी संवाद साधण्याची आणि त्यांच्याकडून खूप काही शिकण्याची संधी मिळाली. या इंटर्नशिपनं त्यांना जगाला सामोरं जाण्यासाठी आणि व्यावसायिक कामासाठी उत्तम प्रकारे तयार केलं. आपल्यापैकी बहुसंख्य लोकांकडे आवश्यक कौशल्य आणि ज्ञान असू शकतं; परंतु फार कमी लोकांकडे त्या कौशल्याचा व्यावसायिक स्तरावर यशस्वीपणे सादर करण्याची हातोटी असते. अग्रवाल यांनी एका मुलाखतीत सांगितले की, या इंटर्नशिपमुळे त्यांना व्यावसायिक संवादाव्यतिरिक्त त्यांची विश्लेषणात्मक कौशल्ये आणि धोरणात्मक विचार विकसित करण्यास मदत झाली.
Shopclues ची स्थापना होण्यापूर्वीची कामगिरी
संदीप अग्रवाल यांनी पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतर गुंतवणूक बँकिंगमध्ये काम केले. अमेरिकेत जाण्याचा त्यांचा निर्णय हा तिथे काम करीत असताना घडलेल्या एका गोष्टीचा परिणाम होता. अमेरिकेतील सेंट लुईस येथील वॉशिंग्टन विद्यापीठातून एमबीएची पदवी घेतल्यानंतर त्यांनी दोन वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम केले. काही वर्षांनंतर ते वॉल स्ट्रीटमध्ये सामील झाले आणि ॲमेझॉन, गूगल, मायक्रोसॉफ्ट, याहू इत्यादी कंपन्यांना कव्हर करत त्यांनी आठ वर्षे विश्लेषक म्हणून काम केले. अग्रवाल हे TiE सिलिकॉन व्हॅलीचे चार्टर सदस्यदेखील आहेत.
अग्रवाल यांच्या काळात इंटरनेट विश्लेषक म्हणून त्यांनी MakeMyTrip चे संशोधन कव्हरेज लाँच करण्यासाठी २०१० मध्ये भारताला भेट दिली. ऑनलाइन मार्केटप्लेस सुरू करण्याची कल्पना त्यावेळी त्यांच्या मनात होती. खरे तर त्यांना DealsClues.com सुरू करायचे होते परंतु, त्यांनी Shopclues.com स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
Shopclues ची स्थापना
त्यांनी राधिका घई अग्रवाल (संदीप अग्रवाल यांची पूर्वाश्रमीची पत्नी), मृणाल चटर्जी व संजय सेठी यांच्याबरोबर ‘डेलावेअर’मध्ये त्यांचा नवीन व्यवसाय सुरू केला. सप्टेंबर २०११ मध्ये ही टीम भारतात गेली आणि कायमची गुरगावमध्ये स्थायिक झाली. अग्रवाल यांनी ‘शॉपक्लूज’च्या सुरुवातीला त्यांच्या सोशल सर्कलमधून $1.95 दशलक्ष जमा केले.
Droom ची स्थापना
एप्रिल २०१४ मध्ये स्थापित झालेले Droom हे ऑटोमोबाइल्स आणि संबंधित सेवा विक्री आणि खरेदीसाठी असणारे पहिले ऑनलाइन प्लॅटफॉर्म होते. Droom च्या संस्थापकांना ७५ वर्षांहून अधिक अनुभव होता. कंपनीने स्थापनेपासून एका वर्षानंतरच लाइटबॉक्सच्या नेतृत्वाखालील मालिका A निधीमध्ये $16 दशलक्ष जमा केले.
आजही हा भारतातील सर्वांत विश्वसनीय ऑटोमोबाईल प्लॅटफॉर्म आहे.
दोन यशस्वी भारतीय स्टार्टअप्सचे संस्थापक संदीप अग्रवाल हे एक सुप्रसिद्ध उद्योगपती व गुंतवणूकदार आहेत.
पूर्ण नाव
नेट वर्थ (भारतीय रुपयांमध्ये)
स्टार्टअप्सची स्थापना
पूर्वीचे जीवन
जन्मस्थळ
लिहिलेले पुस्तक
पूर्वाश्रमीची पत्नी
सध्याची पत्नी
मुले
शाळा
पदवी
पोस्ट ज्युएशन
स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक
संदीप अग्रवाल
अंदाजे ३,००० कोटी
२०१० मध्ये Shopclues, २०१४ मध्ये Droom
सॅन फ्रान्सिस्कोमधील वॉल स्ट्रीट विश्लेषक
चंदिगड
फॉल अगेन. राइज अगेन (संदीप अग्रवाल यांचे आत्मचरित्र)
राधिका घई
उपासना एस. अग्रवाल
हान अग्रवालव अरिजित अग्रवाल (२ मुले)
कर्नालमधील एस. डी. मॉडर्न स्कूल
कुरुक्षेत्र विद्यापीठ
मास्टर्स इन फायनान्स- देवी अहिल्या विद्यापीठ इंदूर / वॉशिंग्टन विद्यापीठातून एमबीए
Dekoruma, Wydr, Shopsity, Data Guise, Give Club, Duriana, Curo Healthcare, WittyFeed, Junoon आणि influencer marketing startup ClanConnect.ai