डॉ. श्रीराम गीत

मी २०१५ ला ८४.८० टक्के घेऊन १० वी, ६२ टक्के १२वी तर २०२० मध्ये ८१ गुणांनी बीएस्सी झालो. यानंतर आरोग्य विभाग सोलापूर येथे नोकरी केली. येथेच असताना मास्टर्स पण केले. सध्या जॉब नाही पण नेटसाठी प्रयत्न करत आहे. पण आत्ता मन खूप अस्थिर आहे. काय करावं समजत नाही? घरची परिस्थिती खूप बेताची आहे. मार्ग सुचत नाही. मला संशोधन क्षेत्रात जायचं आहे आणि अपुर राहिलेलं यूपीएससीचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. वडील शेतमजूर आहेत. आर्थिक चणचण सतत बेचैन करते. अभ्यासात मन पण रमत नाही. कृपया मार्गदर्शन करावे.      – प्रशांत सोमवंशी.

portfolio, investment , Alphaportfolio Concept ,
चला अल्फापोर्टफोलिओ तयार करूया
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Correlation between geological events and their time
कुतूहल : भूवैज्ञानिक कालमापन
Fund Jigyaza Wealth Creation Through SIP
फंड जिज्ञासा – ‘एसआयपी’च्या माध्यमातून संपत्ती निर्मिती
Portfolio With Alpha
अल्फा पोर्टफोलिओ कसा तयार करायचा?
Prime Minister Narendra Modi  statement on the occasion of Pravasi Bharatiya Diwas
भविष्य हे युद्धाचे नसून, बुद्धांचे! प्रवासी भारतीय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
Information from District Collector Kumar Ashirwad that efforts are being made to start Solapur air service
सोलापूर विमानसेवेला लवकरच मुहूर्त; प्रशासनाकडून आवश्यक बाबींची पूर्तता
delegation met the Governor on Monday
मुंडेंना अजितदादांचे अभय; पुरावा मिळेपर्यंत कारवाई न करण्याची भूमिका

आपल्या वाटचालीबद्दल व प्रश्नातील साऱ्या अडचणी बद्दल नीट विचार केला. नेमके उत्तर सुचवणे कठीण आहे. मात्र, माझ्या माहितीप्रमाणे आपल्या भागातील एखाद्या साखर कारखान्याची संबंधित आपले काम कदाचित असू शकते. वस्त्रोद्योगात किंवा रंग निर्मिती कारखान्याशी संबंधित नोकरी आपल्याला मिळू शकते. काम शिकण्यासाठी उमेदवारीचा काळ कदाचित गरजेचा असेल. मात्र, या दिशेने प्रयत्न केले तर प्रगतीचा रस्ता सुरू होऊ शकतो. स्पर्धा परीक्षांचा व संशोधनाचा विचार पूर्णपणे मनातून आत्ता बाजूला ठेवावा. आर्थिक ओढाताण असताना त्यात यश मिळणे कठीण. कळवलेल्या माहितीच्या आधारे मोजके रस्ते सुचवत आहे.

 मी बदलापूर येथे राहते. मी २०२३ मध्ये दहावी ७४ टक्यांनी पास झाले. मला आर्टमधून पदवी घ्यायची आहे. परंतु १२वी पास झाल्यावर मला गुजरात येथील राष्ट्रीय डिजाइन संस्थेमधून डिझायनिंग पदवीमध्ये प्रोडक्ट डिझायनिंगचा तीन वर्षांचा कोर्स पूर्ण करायचा आहे. याविषयी मार्गदर्शन करावे ही विनंती. – कस्तुरी खांदारे

तुला एन.आय.डी.मधून डिझाईनचा कोर्स पूर्ण करायचा आहे. त्यांची प्रवेश परीक्षा सहसा जानेवारी महिन्यात असते. त्या परीक्षेतून निवड झाल्यानंतर प्रवेश मिळतो. चित्रकला उत्तम असणे व अवकाश बोधन क्षमता २डी वा ३डी याची चांगली जाण असणे यासाठी गरजेचे असते. शालेय जीवनात तू चित्रकलेच्या परीक्षा दिल्या असल्यास व त्यात ए किंवा बी ग्रेड असली तर जरूर प्रयत्न करावास.

 मी विज्ञान शाखेच्या तृतीय वर्षांमध्ये प्रवेश केला आहे. पदवीनंतर मला एमपीएससीची परीक्षा द्यायची आहे. त्याअनुषंगाने मी पदवीच्या प्रथम वर्षांपासून तयारी करत आहे. मला दहावीला ९०.२० टक्के आहेत व बारावीला ९० टक्के आहेत. परंतु स्पर्धा परीक्षा हे खूप अनिश्चिततेचे क्षेत्र आहे. त्यामुळे पदवीनंतर प्लॅन बी म्हणून मी एम.एस.सी करावे की एल.एल.बी. करावे की अजून दुसरे काही करावे? हा संभ्रम माझ्या मनात आहे.   – प्राजक्ता मोरे

एम.एस्सी. करू का कायद्यातील पदवी घेऊ? या संदर्भात तुलाच निर्णय घ्यायचा आहे. त्याची कारणे फक्त मी तुला इथे सांगत आहे. तुझा आजपर्यंतचा शैक्षणिक प्रवासात चांगल्या मार्काने झालेला आहे. तो प्रवास एमएस्सी केल्यानंतर शास्त्र विषयातून नोकरी, काम, किवा शालेय प्रशिक्षण या तिन्ही करता वापरता येऊ शकतो. लॉची पदवी घेतल्यानंतर त्याचा उपयोग थोडाफार एमपीएससीमध्ये होऊ शकेल. पण ती पदवी घेतानाचे सर्व विषय हे तुझ्या आजवरच्या प्रवासाशी असंबंधित असतील. पहिल्या वर्षांची लॉची पुस्तके बघून योग्य तो निर्णय घ्यावा. दोनातील कोणताही निर्णय तू घे, मात्र एमपीएससीसाठी किती प्रयत्न करायचे, किती वर्षे द्यायची? याची सविस्तर चर्चा घरच्यांशी करून त्यांच्या संमतीने हा निर्णय घ्यावा.

 मी सध्या वीज मंडळामध्ये अडीच वर्षांपासून उपकेंद्र सहाय्यक म्हणून कार्यरत आहे. मला १० वी मध्ये ८७.८०  टक्के आहेत. त्यानंतर आय.टी.आय. केले. २०१८ पासून मी वीज मंडळामध्ये उमेदवारी केली. ओपन युनिव्हर्सिटी मधून २०२२ मध्ये बीए. पास झालो. तर आता राज्यसेवा करावी का कंबाईन? सध्या माझे वय २६ आहे. – अविनाश मोरडे

आपण शिकताना, काम करताना केलेल्या उत्तम प्रगती बद्दल प्रथम अभिनंदन करतो. तुमच्या प्रश्नाचे उत्तर देताना तुमच्या वयाचा विचार मनात ठेवला तर येती दोन वर्षे एमपीएससी कम्बाईनसाठी आपण अभ्यास करत राहावे. दोन वर्षांत बाराशे तासाचा अभ्यास नक्की होईल. रोज एक तास व रविवारी सहा तास चिकाटीने अभ्यास कर केला तर कम्बाईनची कोणतीतरी परीक्षा आपल्याला पदाचे यश देऊन जाऊ शकेल. मात्र यानंतर समजा त्या परीक्षेत यश नाही मिळाले तर पुन्हा पुन्हा प्रयत्न करणे ऐवजी कामातून प्रगती करत राहावी. त्यासाठी डिस्टन्स डिप्लोमा उपलब्ध आहे.

Story img Loader