डॉ. श्रीराम गीत

मी बीड जिल्ह्यातून बारावी झालो. आता आयटीआयला दोन वर्षांच्या कोर्सकरिता प्रवेश घेतला आहे. नंतर पदवी घेऊन मला यूपीएससी करण्याची इच्छा आहे. मी आत्तापासून त्यासाठी काय करू?

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

– वैभव नायबळ.

तुझी बारावी कोणत्या विषयातून, कोणत्या शाखेतून, किती मार्काने झाली याचा काहीही उल्लेख नाही. आयटीआयचा कोणता ट्रेड करत आहेस याचाही उल्लेख नाही. तरीही तुझ्या प्रश्नाचे उत्तर देत आहे. राज्य सेवा किंवा केंद्र सेवा या दोन्ही परीक्षांसाठीची पूर्व परीक्षा इयत्ता पाचवी ते बारावी यादरम्यानच्या सर्व विषयांच्या सामान्य ज्ञानावर आधारित असते. आयटीआय प्रथम उत्तम गुणांनी संपवावेस. नंतर मिळणारी नोकरी करत असताना बहिस्थरीत्या बी.ए.ची पदवी घेणे तुला शक्य होईल. त्या पदवीमध्ये किमान ७० टक्के मार्क मिळवण्याची जिद्द ठेव. या साऱ्यासाठी अजून पाच वर्षे लागणार आहेत. तोपर्यंत पाचवी ते बारावीची सर्व विषयांची पुस्तके अधून मधून वाचणे. दररोजची मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्र वाचून दहा मिनिटे तरी त्याचे आकलन आणि समजून घेण्यासाठी प्रयत्न करणे. हे आज तुझ्यासाठी अत्यंत मोलाचा व महत्त्वाचा टप्पा असेल.

————-

 मी कला शाखेत इकॉनॉमिक्स या विषयात पदवीधर पदविका करत आहे. मला एमपीएससी यूपीएससी नेट सेट यामध्ये रस नाही. अन्य कोणत्या क्षेत्रात मी करियर करू शकते याविषयी मार्गदर्शन करावे.

– रोहिणी ठाकरे.

तुझ्या आवडीनिवडी काय आहेत तुला कोणत्या क्षेत्रात काम करायला आवडेल याविषयी उल्लेख सुद्धा न करता मी मार्गदर्शन करावे अशी तुझी अपेक्षा आहे. खेरीज पदवीपर्यंतचा प्रवास कोणत्या माध्यमातून व किती मार्काने झाला याचा उल्लेख नाही. त्यामुळे अगदी मोघम अशा स्वरूपात मला उत्तर देणे भाग पडत आहे. जर्नलिझम, मास कम्युनिकेशन, हेल्थकेअर, रिटेल मॅनेजमेंट, कॉस्मेटोलॉजी, ट्रॅव्हल टुरिझम या क्षेत्रांमधील एखादी पदविका घेऊन एक ते दोन वर्षांची उमेदवारी केल्यावर तुझी करिअर सुरू होऊ शकते. या दरम्यान इंग्रजी संभाषण व कॉम्प्युटरचा उत्तम वापर या दोन गोष्टींची तुला गरज भासेल. मुंबईच्या गरवारे व्होकेशनल इन्स्टिटय़ूटमध्ये किंवा सर्व विद्यापीठांच्या कौशल्य विकास केंद्रांमध्ये हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. अभ्यासात शिकण्याच्या गोष्टींचा नीट विचार केल्यावर मगच प्रवेश घ्यावा. रिसर्च सेक्टरसाठी पीएच.डी. गरजेची आहे.

आवाहन

यूपीएससी द्यायची आहे. तर मनात हजारो प्रश्न उभे राहतात. मार्गदर्शनाची गरज भासते. अर्थात प्रश्न तिथे उत्तरही असतेच, करिअरशी निगडित देशातील सर्वोच्च परीक्षांविषयीच्या शंकांचे निरसन होईल, असे एकच ठिकाण म्हणजे करिअर वृत्तांतमधील करिअर मंत्र. म्हणूनच विद्यार्थ्यांनो, लेखणी उचला आणि प्रश्न विचारा. प्रश्न विचारताना आवश्यक तेथे आपली शैक्षणिक, वैयक्तिक माहिती सविस्तर लिहावी. जेणे करून योग्य प्रकारे शंका समाधान होईल. आमचा ई-पत्ता : 

careerloksatta@gmail.com

Story img Loader