प्राध्यापक होण्याचे स्वप्न पाहत ते सत्यात उतरविण्यासाठी झटणाऱ्या मीनलच्या गोष्टीतून गेल्या चार भागात आपण प्राध्यापक या करिअरची माहिती घेतली. राज्यात कनिष्ठ महाविद्यालयांपासून पदवी महाविद्यालयांपर्यंत प्राध्यापक या पेशाची सद्यास्थिती पाहता ही वाट बिकटच म्हणायची… ही परिस्थिती काय हे या मालिकेतल्या या अखेरच्या भागात जाणून घेऊ…

‘महाविद्यालय’ असा एक मोठा शब्द वापरला जातो. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर ज्युनिअर कॉलेज इथेच असते. शेजारी असते सीनियर कॉलेज म्हणजे पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीची सोय असलेले. काही जुन्या कॉलेजमध्ये पदव्युत्तरची सोय मोजक्या खास विषयांवरती केलेली सापडते ती सुद्धा शहरी भागातच. या तिन्हीसाठी प्राध्यापक लागतात. पण त्यासाठी प्राध्यापक बनण्यासाठीची गरज पूर्णत: वेगवेगळी असते. ज्युनिअर कॉलेज म्हणजे अकरावी-बारावीमधील विद्यार्थ्यांना विविध शाखात दिले जाणारे शिक्षण. या मुलांना शिकवण्यासाठी पदव्युत्तर पदवी अधिक बीएड असणे गरजेचे मानले जाते. पदवीसाठी असलेल्या सीनियर कॉलेजमध्ये हायर सेकंड क्लास वा फर्स्ट क्लासची पदव्युत्तर पदवी गरजेची तर असतेच पण शिवाय सेट किंवा नेट ही राज्यस्तरीय किंवा केंद्रीय स्तरावरची परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे असते. हिचा निकाल कायम दोन ते पाच टक्क्यांवर अडकतो. कॉलेजमध्ये पदव्युत्तर वर्गाला शिकवण्यासाठी डॉक्टरेट असणे गरजेचे राहते. विभाग प्रमुख किंवा प्राचार्य पदासाठीही हीच अट घातली गेली आहे. यातून एक गमतीची गोष्ट घडते. ती शैक्षणिक क्षेत्रात खूप प्रसिद्ध असली तरी वाचकांना नवीन वाटेल म्हणून विस्ताराने लिहीत आहे. संस्थाचालकांची मर्जी असेल तर दहा-बारा वर्षे घड्याळी तासांवर नेमणुका झालेले असंख्य प्राध्यापक महाराष्ट्रात कार्यरत आहेत. चालकांची मर्जी फिरली तर त्यांना निरोप दिला जातो. कायम नेमणूक झालेल्या कोणत्याही लेक्चररचा पगार सरकारी नियमाप्रमाणे किमान दहा लाख वर्षाला असला तर घड्याळी तासावर काम करणाऱ्याला वर्षाला तीन ते चार लाखांवर राबवून घेण्याची पद्धत आता रुळली आहे.

mpsc 1333 post exam
नोकरीची संधी: लोकसेवा आयोगामार्फत परीक्षेद्वारे भरती
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
row over ajit ranade removed as gokhale institute vc
अजित रानडे प्रकरणाने दाखवून दिली आपल्या शैक्षणिक प्रशासनाची इयत्ता…
china leftover men reason
‘या’ देशात लग्नासाठी मुलांना मुलीच मिळेनात; ३.५ कोटी मुलांवर एकटे राहण्याची वेळ? कारण काय?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
mharashtra total registered voters
अग्रलेख : अवघा हलकल्लोळ करावा…
devendra fadnavis reaction on harshwardhan patil about join ncp sharad pawar group
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: “आर. आर. आबा आता हयात नाहीत, पण एवढंच सांगतो की…”, देवेंद्र फडणवीसांचं अजित पवारांच्या दाव्यावर उत्तर!

हेही वाचा :MPSC मंत्र : अर्थव्यवस्थेतील गतिमान क्षेत्रे

सीनियर कॉलेजमध्ये म्हणजेच पदवी अभ्यासक्रमात एक वेगळीच गंमत गेल्या पंधरा वर्षात सुरू झाली आहे. कॉलेजमध्ये शिकवायला सुरू केल्यानंतर कायम नोकरी असली तरी सेट वा नेट परीक्षा पास झाली नाही म्हणून टांगती तलवार असलेले अनेक महाभाग जीव मुठीत धरून काम करताना सापडतात. गेल्या पंधरा वर्षात विविध व्यावसायिक अभ्यासक्रम अनेक नवीन संस्थांनी सुरू केले. खास विद्यापीठात तर याचे पेवच फुटले आणि सर्व शहरी भागातील सीनियर कॉलेजमधली कॉमर्स व सायन्सची विद्यार्थ्यांची संख्या ढासळत गेली. कला शाखेत ग्रामीण भागात भरभरून प्रतिसाद मिळत असला तरी शहरी भागातील मराठी माध्यमाची रडकथा फारच वाढली आहे. आकड्यातून सांगावयाचे झाले तर साठ विद्यार्थी क्षमतेचा वर्ग असेल तर वर्गात ३०-३५ विद्यार्थी असले तरी नशीब असे म्हणण्याची अनेक महाविद्यालयांवर वेळ आली आहे. बीए, बीकॉम, बीएस्सी या अत्यंत फालतू पदव्या आहेत अशा गैरसमजाची एक त्सुनामी महाराष्ट्रात आली आहे. त्यामुळे यात विद्यार्थी नसलेल्या विषयांच्या जास्तीच्या प्राध्यापकांचे करायचे काय हा प्रशासनापुढे सरकार पुढे यक्ष प्रश्न पडतो.

ज्या मोजक्या कॉलेजात पदव्युत्तर विषयात पदवी घेण्याची सोय केलेली आहे तिथे मोजके विषय सोडून मुलांच्या शोधात प्राध्यापक अशी अवस्था सापडते. मग या साऱ्यांमध्ये खरा प्राध्यापक बनण्याचा प्रवास कसा असतो? प्रथम दोन पदवींनंतर बीएड. ते करून एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी ज्युनियर कॉलेजमध्ये अनुभव घेणे ही सुरुवात जवळपास ९० टक्क्यांच्या नशिबी येते. इंग्रजी, फिजिक्स, गणित हे कायम मागणी असलेले विषय. इतिहास ,भूगोल, मराठी, हिंदी, समाजशास्त्र, राज्यशास्त्र हे कायमच अडगळीत टाकलेले विषय. मानसशास्त्र व अर्थशास्त्राला इंग्रजीत मागणी तर मराठी मध्ये शिकवण्यासाठी प्राध्यापक आहेत पण मुले नाहीत अशी स्थिती. संस्कृत, तत्त्वज्ञान अशा विषयात काही उत्साही मुले अजूनही येतात. पण शिकवणाऱ्यांबद्दल त्यांचे समाधान फारसे होत नाही. या सगळ्या करता अपवाद असतातच. मनापासून काम करूनसुद्धा १५ ते २० वर्षानंतर टांगती तलवार घेऊन मोजक्या पगारावर काम करावे लागणारे सारेच जण मानसिक खच्चीकरण होऊन नाईलाज म्हणून येथे राबत राहतात. त्यातून काही जण वयाच्या चाळीशी मध्ये डॉक्टरेट करण्याचा ध्यास घेतात. त्यासाठी वेळ काढणे, मार्गदर्शक मिळवणे, त्याच्या नाकदुऱ्या काढून प्रबंधाची तयारी करणे, एक वर्षाची बिनपगारी रजा घेऊन प्रबंध लेखन करणे असा पाच सहा लाख रुपयांचा खटाटोप झाल्यावर त्यांच्या नावामागे डॉक्टर हे बिरुद लागते. मग एखाद्या नवीन निघालेल्या महाविद्यालयाकडून मागणी येऊन त्यांची कायम नेमणूक होण्याची शक्यता निर्माण होते.

हेही वाचा :नोकरीची संधी: लोकसेवा आयोगामार्फत परीक्षेद्वारे भरती

या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी प्राध्यापकांची अनेक आंदोलने महाराष्ट्राने कायम पाहिली आहेत. पण शिक्षण व्यवस्था नावाचा अजगर ढिम्मच बसून आहे.

हाती पदवी आली आणि अन्य ठिकाणी नोकरी लागली तर ठीकच. नाहीतर गेला बाजार आपण शिकलो त्या कॉलेजात शिकवावे अशी एक निराशेची भावना घेऊन प्राध्यापक बनणारे खूप. मीनलसारखी एखादी भाबडी मुलगी एखाद्या विषयातून खूप शिकून प्राध्यापक बनण्याचे जेव्हा स्वप्न बघते, तेव्हा हा अजगर एक तर तिला गिळून टाकतो किंवा त्यापासून जीव वाचवून तिला दुसरा रस्ता शोधावा लागतो…
(समाप्त)