डॉ. श्रीराम गीत

सर, माझ्या मुलाने यंदा दहावीला ९३ टक्के गुण मिळवून आर्ट्सला रुईया कॉलेजला अ‍ॅडमिशन घेतली आहे. इकॉनॉमिक्स, संस्कृत व गणित हे त्याचे मुख्य विषय आहेत. पुढच्या वर्षी तो बारावीची परीक्षा देईल, नंतर त्याला यूपीएससी, एमपीएससी, क्लॅट, या बरोबरच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स किंवा स्टॅनफोर्ड येथे पदवी, हे आम्हाला माहीत असलेले पर्याय आहेत. कृपया या सगळय़ा संदर्भात मार्गदर्शन करावे, ही नम्र विनंती.-नितीन कासले, मुलुंड

Success Story Of Aditya Srivastava In Marathi
Success Story Of Aditya Srivastava: स्वप्ने सत्यात उतरतात! लाखोंची नोकरी सोडून यूपीएससी परीक्षेत आला पहिला, वाचा अनेकांची प्रेरणा ठरणाऱ्या आदित्य श्रीवास्तवचा प्रवास
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Loksatta lokrang Birth centenary year of Dr Wankhade pioneer of Dalit literary movement
दलित साहित्य चळवळीचे प्रवर्तक
expert answer on career advice questions career advice tips from expert
करीअर मंत्र
upsc exam preparation guidance in marathi
UPSC ची तयारी : नैतिक विचारसरणीच्या विविध चौकटी (भाग-१)
education opportunities admission to master of science programs at radiation medicine centre barc
शिक्षणाची संधी : बीएआरसीमध्ये ‘मास्टर ऑफ सायन्स प्रोग्राम’
Success Story Of Chitraang Murdia
Success Story Of Chitraang Murdia : एकेकाळी होता आयआयटी टॉपर, डॉक्टर होण्यासाठी सगळंच सोडलं; वाचा, चित्रांग मुरडियाची गोष्ट

त्याने सर्वप्रथम अवांतर वाचन वाढविण्याची गरज आहे, त्याकरिता मुलाला त्याने घेतलेल्या विषयाशी संबंधित सर्व बातम्या वाचण्याकरिता प्रवृत्त करा. रोजचे वृत्तपत्र त्यातील अग्रलेख व ठळक बातम्या वाचणे व त्याची टिपणे काढणे ही पहिली व आपल्या मनातील कोणत्याही करिअरची सुरुवात असेल. याचे जोडीला दरमहा एखाद्या त्याच्या आवडीचे गंभीर विषयावरचे एक पुस्तक विकत घेऊन वाचण्याची सवय लावावी. येत्या चार वर्षांत किमान चाळीस अशी वाचून त्यावर नोट्स काढलेली पुस्तके त्याच्या संग्रही असतील.. हा त्याचा माहितीतून ज्ञानाकडे वाटचालीचा पाया सुरू होईल. आता थोडक्यात आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देतो.

१. स्पर्धा परीक्षा या पदवीनंतर द्यायच्या असतात. एमपीएससी तो बीए झाल्यावर देऊ शकतो.

२. यूपीएससीची परीक्षा सामान्यपणे एमएच्या अभ्यासाशी समकक्ष असते. ती द्यायची असेल तर एमए केलेले फायद्याचे ठरेल.

३. बारावीनंतर क्लॅट ही परीक्षा असते. ती बऱ्यापैकी कठीण असते व स्पर्धात्मक असते. तिची तयारी पूर्ण वर्षभर मुले करतात. भारतातील नॅशनल लॉ स्कूलमध्ये प्रवेशा करता ती उपयोगी असते. पाच वर्षांच्या कायद्याच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा का नाही हे मुलाने नीट चौकशी करून माहिती घेऊन ठरवावे.

४. आपण लिहिलेल्या स्टॅनफोर्ड इत्यादी विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी एमए पूर्ण करण्याची गरज आहे. बारावीनंतरच तिकडे शिकायला पदवीसाठी जायचे असेल तर एसएटीची परीक्षा द्यावी लागेल. तो प्रचंड व अवाजवी खर्च असतो.

५. सध्या आपल्या मुलाने दहावीचे मार्क बारावीला टिकवणे हे ध्येय ठेवावे. ते टिकले तर यथावकाश सगळय़ा गोष्टीचे रस्ते उघडतील.

  मी बार्शी तालुक्यात गौडगाव येथे मावशीकडे लहानाची मोठी झाले. लग्नानंतर रायगड जिल्ह्यातील पेण या गावी आले. पतीच्या नोकरी निमित्ताने पेण, पुणे, हैदराबाद येथे वास्तव्य केले. सध्या आम्ही पेण येथे राहत आहोत. माझे आतापर्यंतचे सर्व शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे. मला इंग्रजीची आवड असून इंग्रजीत मला चांगले गुण मिळतात. दहावी २००९ मध्ये ७५ गुण, बारावी २०११मध्ये ७० गुण डीएड २०१३ मध्ये ७५ गुण. माझा विवाह झाला असून मला दोन मुली आहेत. आक्टो. २०२१मध्ये मी मानसशास्त्र या विषयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून बी.ए. केले आहे. तिसऱ्या वर्षी ‘व्यक्तिमत्व विकास’ या विषयात मला पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. सध्या मला ३१वे वर्ष सुरू आहे. आता मी यापुढे काय करावे, याबाबत आपले बहुमोल मार्गदर्शन अपेक्षित आहे. मी बी.एड. करावे की एमबीए करावे की एमए करावे, याबाबत आपण मला सल्ला द्यावा. याव्यतिरिक्त इतर काही पर्याय असल्यास ते देखील सुचवावेत.- सुप्रिया

आपण आपली सारी वाटचाल व शिकण्याची इच्छा सविस्तर लिहिली आहे. मात्र, आपल्या अपेक्षेतील शिक्षणानंतर (बीएड, एमबीए, एमए) फारसे करिअर वयानुसार उपलब्ध नाहीत. मानसशास्त्र व व्यक्तिमत्व विकास या दोन गोष्टीवर अवांतर वाचन भरपूर करून पुढील वर्षी दोन अभ्यासक्रमांचा विचार करावा असे सुचवत आहे. मानसशास्त्राशी सुसंगत असा एमए कौन्सिलिंगचा इग्नूचा अभ्यासक्रम. हा दुरस्थ म्हणून सुद्धा तुम्हाला पूर्ण करता येऊ शकतो. मात्र त्यानंतर कौन्सिलिंगमध्ये आपण काय करणार याबद्दल येथे सहा महिन्यात विविध कौन्सिलर्सना भेटून माहिती घेणे हे अत्यंत गरजेचे व महत्त्वाचे राहील. शैक्षणिक, वैवाहिक, अध्ययन- अक्षम, विवाहापूर्वीचे, करिअर विषयक  अशा विविध पद्धतीत आपण काम करू शकता. दुसरा सहज करता येण्याजोगा अभ्यासक्रम म्हणजे मास्टर्स इन सोशल वर्क. मात्र, यासाठी संस्थेत जाऊन शिकणे जास्त उपयुक्त ठरू शकेल. यानंतर विविध स्वयंसेवी संस्था किंवा एनजीओ मध्ये काम करून अर्थार्जन व करिअर दोन्ही शक्य होते. सुदैवाने येते सात महिने या दोन अभ्यासक्रमांची माहिती घेणे, ते करून काम करणाऱ्यांना भेटणे व अभ्यासाची पुस्तके चाळणे आपल्याला सहज शक्य आहे. वयाच्या ३५ नंतरची २५ वर्षे आपली कामात व अर्थपूर्ण जावीत यासाठी हे दोन्ही रस्ते उपयुक्त ठरतील. आपल्या शिकण्याच्या चिकाटीचे कौतुक वाटते. अभिनंदन.