डॉ. श्रीराम गीत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मूल्यविचार आणि व्यवहार या सदराच्या शेवटाकडे आपण येत आहोत. शिकण्यासाठी, पदवी घेण्यासाठी व नोकरी करता लागणाऱ्या कौशल्यांवर भर देऊन कोणकोणत्या स्पर्धाना कसे तोंड द्यावे लागते, ती तयारी कशी करावी याविषयी आजवरचे सारे विवेचन होते. मात्र, एखाद्या यशामागे चार गोष्टींची पायाभूत गरज असते. चार खांबांवर करिअरचा डोलारा उभा राहतो. मूल्य विचार व व्यवहार याखेरीज मिळणाऱ्या यशाला किंवा त्यातून निर्माण होणाऱ्या उत्तम करिअरला स्थायी स्वरूप मिळत नाही. त्याला जोड द्यावी लागते ती सचोटीची व नैतिकतेची. मगच सारे तुमचेकडे आदर्श म्हणून पहायला सुरुवात करतात. या दोनातील मूल्य विचार व व्यवहाराबद्दल आज..  वाचायला आवडेल पण पटेल न पटेलसे.

व्यवहाराचा सोपा अर्थ

’ सहसा कोणतीही गृहिणी भाजी विकत घेतल्यानंतर कडीपत्ता फुकट मागते. तो तिचा हक्क समजते. भाजी घेताना सुद्धा घासाघीस झालेली असते. तरीही भाजीवाला सूज्ञ असेल तर तो कडीपत्ता आनंदाने देतो. खरतर काही वेळा न मागताही पिशवीत टाकतो. दोघेही हसतात आनंदाने.

’ मोबाइल विकत घ्यायला गेलेला तरुण वा तरुणी पंधरा हजार रुपयांच्या आतील मोबाइल बद्दल शंभर प्रश्न विचारून विक्रेत्याला सतावतात. ही कंपनी चांगली का ती कंपनी चांगली? हे मॉडेल कधी आले, यानंतरचे कधी येणार? याचे भारतात काय बनते, चीनमधून काय तर कोरियातून काय आले? अशा विविध प्रश्नांनी भंडावून मग तो तासाभरानंतर मोबाइल निवडतो. पण जेव्हा त्याला विक्रेता मोबाइलला स्क्रीन गार्ड बसवून फुकटचे कव्हर देतो तेव्हा फोन घेणारा खूष असतो.        

’ चौकोनी कुटुंबाला घेऊन एखादा लाखोनी कमावता पुरुष मोठय़ा रेस्तारॉमधे पाच सहा हजाराचे बिल होणारे जेवण जेवल्यानंतर एखादेच मूस मुलांच्या हट्टास्तव मागवतो आणि वेटर मात्र समजदारपणे एकाच डिश बरोबर चार चमचे घेऊन येतो तेव्हा त्याला नक्कीच सढळपणे टीप मिळते. देवाण घेवाणीतला हा असतो आनंद.

मूल्यविचार मात्र दोन्ही बाजूंना सांभाळतो

’ याच गोष्टींबद्दल आता उलटा विचार केला तर? फक्त कडीपत्ता विकत घ्यायचा गेलेल्या गृहिणीला तो केवढय़ाला पडेल? ती तो घेईल का? किंवा केवळ कढीपत्ता घ्यायला कोणी जाईला का? असे सगळे माहीत असूनही भाजीवाला कढीपत्ता का ठेवतो? इतकेच काय अनेकदा त्याचेकडे नसेल तर तो उद्या आणून देतो असे आश्वासनही का देतो?

’ मोबाइल विकत घ्यायला गेलेल्या तरुणाला लाखभर रुपयांचा अ‍ॅपलचा फोन घ्यायचा असेल तर त्या फोन बरोबर चार्जर मिळतोच असे नाही. मिळाला तर त्याच्या जोडीला गरजेच्या केबल विकत घ्याव्या लागतात. त्या महागडय़ा फोनच्या आकर्षक बॉडीला कव्हर घालण्याची इच्छाही त्याला होत नाही. तरीही महागडय़ा खरेदीच्या मानसिक दडपणाखाली तो लाखभर रुपयांचा फोन घेऊन मोठय़ा रुबाबात दुकानाबाहेर पडतो.

’ हेच चौकोनी कुटुंब त्याच हॉटेलमध्ये सहज गेले, त्यांनी फक्त एकच मूस ऑर्डर केले तर वेटर सहसा दोनापलीकडे जास्त चमचे आणून देणारच नाही. मागितले तरी तो द्यायला खळखळ पण करेल. कारण त्याला इथे टीपची अपेक्षाच नसते. घरी जाता जाता मुलांच्या हट्टाकरता मूस खायला हा माणूस आला आहे. हे त्याला न सांगता कळलेले असते. एखाद्या गोष्टीचे मूल्य नकळत मनात ठसलेले असते नाही काय?

दोनाशिवाय करिअर नाही

करिअरची निवड करून शिक्षण झाले, पदवी हाती आली की नंतरची किमान चाळीस वर्षे या दोनावर आधारित वाटचाल करावी लागते. यातील व्यवहाराबद्दल सकाळपासून नोकरी वा व्यवसाय करून घरी येईपर्यंत सारेच विचार करतात. पण मूल्य विचार जागता ठेवणाऱ्यांची करिअर वेग घेते. दमदारपणे वाटचाल करू लागते. माझ्या कामाचा भाग नसला तरी सुद्धा गरजेनुसार समोर येईल ते मी आनंदाने स्वीकारतो. हा झाला व्यवहार. याची शिकवण पालकांनी स्वत:च्या दैनंदिन वागणुकीतून करून द्यायची असते. स्वत:ची कौशल्ये आणि कामा करता दिला जाणारा वेळ यावर मिळणाऱ्या पगाराची सांगड न घालता माझे काम पूर्ण कौशल्याने ठरावीक आणि अपेक्षित वेळात पूर्ण करून देण्याची ‘जबाबदारी समजणे’, तशी वर्तणूक स्वत:हून ठेवणे, एवढेच नव्हे तर ती आयुष्यभर जोपासणे हा झाला मूल्यविचार. मार्क मिळवण्याकरता, प्रवेशा करता किंवा पदवीसाठी नेमलेला अभ्यास करणारे मूल्य विचार करत नाहीत. त्यांना पहिल्या नोकरीत निवडले गेले म्हणून नक्कीच उत्तम यश मिळते. कौतुक होते. मात्र त्यातील सातत्य टिकवण्यासाठी मूल्य विचाराची गरज राहते. नाहीतर करिअरच्या दुसऱ्या दशकापासून प्रगती थांबते वा घसरणही सुरू होते.

नैतिकता व सचोटी पुढच्या मंगळवारी.