CBI Recruitment 2023: सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे मॅनेजर स्केल २च्या पदांवर भरती निघाली आहे. या भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. अर्जाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जे उमेदवार या भरतीमध्ये सहभागी होऊ इच्छितात ते ऑनलाईन माध्यामातून अर्ज करू शकतात. अर्ज सीबीआयच्या अधिकृत वेबसाईट centralbankofindia.co.in वर उपलब्ध आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०२३ निश्चित केली आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवार निश्चित तारखेपूर्वी अर्जाची प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Central Bank of India Recruitment 2023 : भरतीसाठी पात्रता

या भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांना मान्यता प्राप्त संस्थेमधून कोणत्याही शाखेतून पदवी मिळवणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवारानी CAIIB देखील उतीर्ण असावे. त्यासाठी उमेदवारचे वय ३१ मे २०२३ नुसार ३२ वर्षापेक्षा जास्त नसले पाहिजे. नियमानुसार वयोमर्यादेत सुट दिली जाईल. अधिक माहितीसाठी अधिसुचना सविस्तर वाचा.

हेही वाचा – यूपीएससी CSE शिवाय मंत्रालयात जॉइंट सेक्रेटरी होण्याची संधी, आजच करा अर्ज

CBI Recruitment 2023 भरतीची अधिसूचना नोटिफिकेशन – https://centralbankofindia.co.in/sites/default/files/_Notification%20_RECRUITMENT-OF-MANAGERS-IN-MMGS-II-IN-MAINSTREAM.pdf
CBI Recruitment 2023 भरतीसाठी अर्जाची थेट लिंक – https://ibpsonline.ibps.in/cbimmjun23/

CBI Recruitment 2023 : कसा करू शकता अर्ज

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मॅनेजर भरती २०२३मध्ये अर्ज करण्यासाठी सर्वात आधी ऑफिशिअल वेबसाईट centralbankofindia.co.in ला भेट द्यावी लागेल. आता तुम्हाला या भरतीसंबधीत लिंक दिसेल त्यावर क्लिक करा. आता एक नवीन वेबसाईट ibpsonline.ibps.in/cbimmjun23 दिसेल. या वेबसाईटवर Click here for New Registration वर क्लिक करा आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा. त्यानंतर लॉग इनच्या स्वरुपात अर्जाची प्रक्रिया पूर्ण करा.

हेही वाचा – BPNLमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदाच्या ३४४४ जागांसाठी होणार भरती; महिना २४ हजार मिळू शकतो पगार

CBI Recruitment 2023 अर्जाचे शुल्क

अर्जाचा फॉर्म भरण्यासाठी उमेदवार अर्जाची फी जमा करणे आवश्यक आहे. जे अर्ज शुल्क न भरता जमा केले जातील ते स्विकारले जाणार नाही. अर्ज शुल्क वर्गानुसार वेगवेगळी निश्चित केले आहे.

अनुसुचित जाती, अनुसुचित जनजाती, पीडब्ल्यूबीडी आणि महिला वर्गासाठी अर्ज शुल्क १७५ रुपयेसह जीएसटी
इतर सर्व वर्गातील उमेदवार अर्ज शुल्क ८५० रुपये सह जीएसटी

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cbi recruitment 2023 vacancy on the posts of manager in central bank of india apply on centralbankofindia co in snk
Show comments