CBSE Board 10th Result Update : CBSE Board 10th Result Update : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १२ वीनंतर आता इयत्ता १० वीचा निकाल जाहीर केला आहे. या वर्षी सीबीएसई बोर्डाचे इयत्ता १० वीतील ९३.१२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.२५ टक्के तर मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९२.२७ टक्के आहे. मुलांपेक्षा मुलींनी १.९८ टक्क्यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे सीबीएसईच्या इयत्ता १२ वीच्या निकालाप्रमाणे इयत्ता १० वीच्या निकालात यंदा मुलींनीच बाजी मारल्याचे दिसतेय. विद्यार्थी cbseresults.nic.in, cbse.nic.in आणि cbse.gov.in वरून आपला निकाल पाहू शकतील. विद्यार्थी रोल नंबर, शाळा क्रमांक आणि प्रवेशपत्र आयडी सबमिट करू आपला निकाल पाहू शकतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in