CBSE Board Exam 2025: सीबीएसई बोर्ड परीक्षा २०२५ लवकरच सुरू होणार आहे. सीबीएसई बोर्ड परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. सीबीएसई इयत्ता दहावीच्या परीक्षा १८ मार्चपर्यंत आणि बारावीच्या परीक्षा ४ एप्रिल २०२५ पर्यंत पार पडतील. आतापर्यंत, परिक्षा प्रवेशपत्रे जारी करण्यात आली आहेत, जी परीक्षा पोर्टलच्या मदतीने तपासता येतील. विद्यार्थी सीबीएसई बोर्ड परीक्षांसाठी अंतिम सराव करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, सीबीएसई बोर्डाने अधिकृतपणे जाहीर केलेल्या काही गोष्टी तुमच्या शेवटच्या तयारीसाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. त्यापैकी एक म्हणजे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने जारी केलेली प्रश्नपेढी, ज्याच्या लिंक्स येथे दिल्या आहेत. ही प्रश्नपेढी तुमच्यासाठी उत्तर लेखनाच्या सरावात आणि प्रश्नपत्रिकेतील उत्तरे लिहिण्यात खूप उपयुक्त ठरू शकते.

सीबीएसई बोर्डाने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर इंग्रजी, गणित आणि विज्ञान या तीन विषयांची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिली आहे. जी येथे तपासता येईल.

हेही वाचा – EPFO Recruitment 2025 : कोणतीही परीक्षा न देता मिळवा नोकरी! EPFO मध्ये Young Professionalsची सुरु आहे भरती, मिळेल ६५,००० रुपये पगार

सीबीएसई बोर्ड दहावीसाठी प्रश्नपेढी – https://cbseacademic.nic.in/qbclass10.html

सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या प्रश्न बँकेची लिंक देखील सक्रिय आहे, ज्यामध्ये बिजनेस स्टडीज, शारीरिक शिक्षण(फिजिकल एज्युकेशन), राज्यशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, इंग्रजी, गणित, लेखाशास्त्र(अकांउट), अर्थशास्त्र, रसायनशास्त्र, संगणक विज्ञान(कॉम्प्युटर सायन्स आणि माहितीशास्त्र पद्धतींसाठी प्रश्न बँक आहेत.

हेही वाचा – IOCL Recruitment 2025: इंडियन ऑइलमध्ये ४५६ अप्रेंटिस पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या भरती प्रक्रिया

सीबीएसई बोर्डाच्या बारावीसाठी प्रश्नपेढी – https://cbseacademic.nic.in/qbclass12.html

शिवाय वेबसाइट 10वी आणि 12वी साठी एक आणि लिंक सीबीएसईची cbse.gov.in वर उपलब्ध आहे. या लिंकवर सीबीएसईतर्फे दहावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमाची प्रश्नपेढी विद्यार्थ्यांसाठीसुरू केल्या आहेत.

सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता १०वी आणि १२वीच्या प्रश्नपेढी – https://cbseacademic.nic.in/additionalPQ.html

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १०वी आणि १२वीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र जारी केले आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्रावर दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा.