CBSE LOC Submission 2023 Last Date: : सीबीएसई बोर्डाने २०२४ ला होणाऱ्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत महत्वाचं परिपत्रक जाहीर केलं आहे. २०२३-२४ या वर्षासाठी शालेय व्यवस्थापनाने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा डेटा वेळेत पूर्ण करावा. या परिपत्रकाद्वारे शाळेतील मुख्याध्यापकांना काही सूचना देण्यात आल्या आहेत. सीबीएसई बोर्डाने त्यांच्या वेबसाईटवर म्हटलंय की, शालेय व्यवस्थापनाने परिपत्रकात दिलेल्या मार्गदशक सूचनांचे पालन करून विद्यार्थ्यांची माहिती भरावी. ही माहिती अचूक असणे आवश्यक आहे. तसंच विद्यार्थी आणि शाळेतील मुख्य अधिकारी यााबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी https://www.cbse.gov.in.या बेवसाईटला भेट देऊ शकतात.
विद्यार्थ्यांबद्दल दिलेली अधिकृत माहिती खूप महत्वाची बाब आहे. कारण या माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांना भविष्यात अडचणींना सामोरं जावं लागणार नाही. विद्यार्थ्यांची माहिती योग्य वेळेत पाठवावी, अशी शालेय प्रशासनाला विनंती करण्यात आली आहे. फॉर्ममध्ये भरलेली माहिती अचूक आहे की नाही, याबाबत त्यांनी एकदा खात्री करून घ्यावी. माहिती पाठवल्यानंतर कोणत्याही विषयासंदर्भातील चूका दुरुस्त केल्या जाणार नाहीत. डेटा अपलोड केल्यानंतर कोणत्याही प्रकारचे बदल करता येणार नाहीत.