CBSE Class 10th Result 2024: दहावी बारावीच्या निकालाची विद्यार्थ्यांसोबतच पालक, शिक्षक सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. दहावी आणि बारावीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. संपूर्ण राज्यात परीक्षा सुरळीत पार पडल्या आहेत. मंडळाकडून कित्येक महिन्यांपासून परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी काम सुरू होते. आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे या परीक्षेच्या निकालाची. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून लवकरच हा निकाल जाहीर केला जाऊ शकतो. सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकालही या महिन्यात जाहीर होणार आहे, मात्र त्याआधी दिशाभूल करणारी एक नोटीस सध्या व्हायरल होत आहे. त्या नोटीसमध्ये सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल आज म्हणजेच १ मे रोजी दुपारी १ वाजता लागणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, ही माहिती खोटी असून सीबीएसई पीआरओ रमा शर्मा यांनी बोर्डाच्या अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे स्पष्ट सांगितलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा