CBSE Recruitment 2025: सरकारी नोकरी हवीये? मग आता नो टेन्शन. थेट सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. इच्छुक उमेदवारांनी वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, CBSEने अधीक्षक आणि कनिष्ठ सहाय्यक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार CBSE च्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेद्वारे संस्थेतील २१२ पदे भरण्यात येणार आहेत.
रिक्त पदांच्या जाहिरातीनुसार नोंदणी प्रक्रिया २ जानेवारी २०२५ रोजी सुरू होईल, तर तपशीलवार अधिसूचनेनुसार, नोंदणी प्रक्रिया आज, १ जानेवारी, २०२५ पासून सुरू होईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२५ आहे.
रिक्त जागा तपशील
अधीक्षक: १४२ पदे
कनिष्ठ सहाय्यक: ७० पदे
पात्रता निकष
शैक्षणिक पात्रता
अधीक्षक: मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी किंवा समकक्ष.
कनिष्ठ सहाय्यक: मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठाकडून १२ वी उत्तीर्ण
वयोमर्यादा
अर्जाच्या शेवटच्या तारखेला म्हणजेच ३१.०१.२०२५ रोजी उमेदवार(चे) किमान वय १८ वर्षे पूर्ण झालेले असावे.
हेही वाचा >> १०वी पास उमेदवारांना BMC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल २७७१ जागांवर होणार भरती, अर्ज कसा व कुठे करायचा? जाणून घ्या
अर्ज शुल्क
या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना ८०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. मुळात, ही रक्कम सामान्य श्रेणीतून येणाऱ्या उमेदवारांसाठी निश्चित करण्यात आली आहे. तर OBC आणि EWS या आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना देखील ८०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तसेच SC, ST तसेच PEBD या आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरतीची प्रक्रिया अगदी निशुल्क ठेवण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जाहीर अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.